तुम्ही सोयीच्या डबलढोलक्या

By admin | Published: August 6, 2015 04:52 PM2015-08-06T16:52:16+5:302015-08-06T16:52:16+5:30

भाबडय़ा वाटणा:या मुली कसल्या लबाड, आप्पलपोटय़ा असतात आणि मुलांना झुलवतात असं सांगणारं हे एका मित्रचं पत्र! ‘कंधा’कथेची दोन आणखी वेगळी चित्रं!

What are you double the convenience | तुम्ही सोयीच्या डबलढोलक्या

तुम्ही सोयीच्या डबलढोलक्या

Next
सोयीनं तर तुम्ही हवं तेव्हा हुकमी रडता! डोळ्यात वॉटरसप्लाय चोवीस तास! आपण रडलो की पोरं हेल्पलेस होतात हेच तुम्हाला पक्कं माहिती आहे!
 
आपलं सारं जगच ना, एका गैरसमजावर चाललंय!
आपलं म्हणजे आमचं, कॉलेजात शिकणा:या, तरुणबिरुण असलेल्या मुलांचं!
त्यांना अजूनही वाटतं, मुली भोळ्याभाबडय़ा असतात. त्यांना राजकारण जमत नाही. त्या कुणाला मुद्दामून त्रास देत नाहीत, माणसं वापरत नाहीत, आपला फायदा उचलत नाहीत!
बोगस, अगदी बोगस आहे हा समज!
मुली मुळीच भोळ्याभाबडय़ा नसतात, त्या पक्क्या राजकारणी असतात. मुलं वापरायची कशी, मुलांना कामाला लावायचं कसं हे त्यांना पक्कं कळतं!
पुन्हा डबलढोलकी!
एरवी यांना बरोबरीचं स्थान द्या. समान हक्क, त्यांची स्पेस इत्यादि कौतुकं असतातच. एरवी त्यांना डोकं असतं, त्या इंडिपेंडण्टही असतात. पण कुठल्या क्षणी त्या ‘बायकी’ होतील नी कुठल्या क्षणी आपल्याकडून स्त्रीदाक्षिण्याची अपेक्षा ठेवतील सांगता येत नाही. मग त्यांना स्पेस नको असते, पॅम्परिंग हवं असतं. त्यांना हरकाम्या तर हवा असतोच, उलट एक इमोशनल सपोर्टही हवा असतो. त्यांना आपलं ऐकून घेणारा माणूस हवा असतो. सतत रडायला त्यांना रुमाल घेऊन कुणीतरी हवंच असतं!
मी म्हणतो, बायांनो ठरवा ना, ठरवाच एकदाचं, की तुम्ही इंडिपेण्डंट आहात का? तुम्हाला पुरुषी आधार हवा आहेच का?
तुम्हाला गर्लीशच वागायचं आहे का? तुम्हाला तुमच्यासाठी हरकाम्याच हवा आहे का?
ठरवा ना एकदाचं!
पण का ठरवाल तुम्ही! सतत दोन डगरींवर चाललेलंच बरं! जे सोयीचं ते आपलं. सोयीसोयीनं जे मिळेल ते सारं आपलं!
याच सोयीनं तर तुम्ही हवं तेव्हा हुकमी रडता! डोळ्यात वॉटरसप्लाय चोवीस तास! आपण रडलो की पोरं हेल्पलेस होतात हेच तुम्हाला पक्कं माहिती आहे!
हीच तुमची ताकद!
म्हणून तर मग मुलं तुमच्यासाठी, सहानुभूतीपोटी, माणुसकीपोटी मदतीला धावतात. वाट्टेल ते करतात. जमेल ती मदत करतात.
आणि अशा पोरांना तुम्ही हसतात. कारण ती पोरं तुमच्यासाठी कुणीही नसतात. कुणीच नसतात.
अशा फाटक्या पोरांचा तुम्ही पार कंधा करून टाकता!
तेव्हा बायांनो, जरा तरी स्वत:शी खरं बोला आणि म्हणा की, आम्ही करतो माकडं मुलांची!
आणि ती बिचारी मग माकडं म्हणूनच लटकतात कुठंही, माणसात येतच नाही कधीच!!
- एक मित्र
स्वत:च्याही नकळत जो कंधा झाला आणि कायमचा गळ्यात पट्टा बांधून फिरू लागला!

Web Title: What are you double the convenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.