मेकअपच्या दुनियेवर यंदा कोणते रंग स्वार होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 07:56 AM2021-01-07T07:56:32+5:302021-01-07T08:00:07+5:30
२०२१ आता मेकअप करायची संधी देईल, अशी आशा आहे. म्हणूनच कदाचित या वर्षी मेकअप स्टेटमेंट जास्त गडद राहील, अशी चिन्हं आताच मेकअप ट्रेण्ड सांगत आहेत.
२०२० तर काय घरात बसूनच गेलं आणि बाहेर पडलं, तरी चेहऱ्याला मास्क. मेकअप केला काय, नाही काय... फरक इल्ले!
काय असेल ट्रेण्डी येत्या वर्षात...
१. पापण्यांना नेव्ही आणि डार्क ग्रे कलर कुणी लावतं का एरव्ही, पण यंदा तसे मस्कारा डोळ्यांच्या स्मोकी लुकसाठी वापरले जातील. मास्क लावला तरी डोळे बोललेच पाहिजेत ना...
२. टीव्ही मालिकांतही बघा लाल डार्क लिपस्टिक आता दिसू लागली आहे. या वर्षात लिपस्टिक हो तो लाल हो, असा फंडा तरुण मुलींच्या जगात भारी चर्चेत आहे.
३. मेकअप न करताही आपली त्वचा तेजस्वी दिसली पाहिजे, हेल्दी दिसली पाहिजे, हा गेल्या वर्षांचा धडा त्यामुळे यंदा हेल्दी, ब्राइट स्किनचे दिवाणे, दिवाण्या बरेच असतील. त्यासाठी प्रयत्न करतील. एक्सरसाइज ग्लोचे तसेही चर्चे आहेतच.
४. ८०च्या दशकातील मेकअप ट्रेण्ड डोळ्यासमोर आणा, भडक रंगच आठवतील. यंदाही गुलाबी, पिवळा, नारंगी हे ‘फील गुड’असणारे डार्क, वार्म कलर्स चेहऱ्यासह कपड्यांच्या दुनियेवरही राज्य करतील.
५. ग्लिटर्स अनेकींना आवडतात, पण आता ते ग्लिटर्स पापण्यांवर नाही, तर डोळ्याखाली रॉक ग्लिटर्सच्या रूपात चमकतील.