काय वाट्टेल ते घालताय का?

By admin | Published: April 10, 2015 01:28 PM2015-04-10T13:28:19+5:302015-04-10T13:28:19+5:30

ऑफिसात घालण्याच्या कपडय़ांचे काही नियम आहेत, त्याला म्हणतात प्रोफेशनल वॉर्डरोब. ते कपडेच सांगतात, तुम्ही किती मॅनर्सवाले आहात!

What do they wear? | काय वाट्टेल ते घालताय का?

काय वाट्टेल ते घालताय का?

Next

 

आपण कॉलेजात असतो तेव्हा कसेही कपडे घातले तरी चालतात!
पण कार्पोरेट जगात फॉर्मल वातावरणात कुठले कपडे घालावेत याचेही काही संकेत असतात. ते संकेत जर माहिती नसतील तर शिष्ट-अशिष्टच्या पलीकडे ‘असभ्य’ टप्प्यात आपण जातो. इतर लोक आपल्या माघारी आपल्या ‘चीप’ राहणीमानाची चेष्टाही करतात.
असं होऊ नये म्हणून फॅशनच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या कपडय़ांचा आणि राहणीमानाचा विचार केला पाहिजे.
हल्ली तर एक नवीनच ट्रेण्ड आहे, नोकरी लागली रे लागली की अनेकजण आणि अनेकजणीही आपला ‘ऑफिशियल वॉर्डरोब’ सज्ज करण्याच्या तयारीला लागतात.
मुख्य म्हणजे तो परफेक्ट वॉर्डरोब एका रात्रीत तयार होत नाही, त्यासाठी काही गोष्टी नियमित कराव्या लागतात आणि सांभाळाव्याही लागतात.
कार्पोरेट जगात या नव्या ट्रेण्डचं नाव आहे,  प्रोफेशनल वॉर्डरोब!
मुख्य म्हणजे हे असे कपडे हवेत म्हणून लगेच काही हजार रुपयांचं शॉपिंग करायची गरज नाही.
‘प्रोफेशनल’ म्हणून ज्या गोष्टी तुमच्या कपाटात आवश्यक आहेत, त्या फक्त विकत आणून उपयोगाच्या नाहीत, त्या वापरताही यायला हव्यात!
अशाच वस्तूंची ही एक लिस्ट.
 
1) ब्लेझर
तुम्ही कापरेरेट जगात काम करत असाल तर ब्लेझर तुमच्याकडे हवंच! मात्र त्याचं ‘फिटिंग’ अत्यंत काटेकोर हवं. लूज, ढगळं, फार घट्ट ब्लेझर अत्यंत असभ्य मानलं जातं. खांद्यावर घट्ट बसलेलं कंबरेर्पयत येणारं ब्लेझर परफेक्ट मानलं जातं. ब्लेझर पारंपरिक रंगाचंच घ्या. ब्राईट कलर्स, निऑन कलर्स ब्लेझरसाठी वापरू नका.
2) बूट
एक उत्तम हिल्सवाला जोड, एक फ्लॅट जोड तुमच्याकडे हवाच. शक्यतो पॉइण्टेड असावा बोटांच्या दिशेनं. घोटय़ार्पयतचा भाग पूर्ण झाकला जाईल असेच फॉर्मल बूट किंवा हिल्स असावेत. मात्र उंची जरा सांभाळून. उंच दिसण्याच्या नादान अति उंच हिल्स वापरू नका. हिल्स घालून चालणं जमत नसेल तर घालू नका. 
3) पॅण्ट्स
फॉर्मल ट्राऊझरचं शॉपिंग तरुण मुलं सरसकट करतात; मात्र त्यात कायम एक चूक होते. खूप घट्ट ट्राऊझर विकत घेतल्या जातात. मापात पॅण्ट आणि तीही फक्त घोटय़ार्पयत असं गणित जमवा. पॅण्ट ऑफिसभर लोळणं, घालून मळणं अत्यंत अशिष्ट.
4) दागिने
एखादा सुंदर स्कार्फ, तो गळ्याभोवती उत्तम गुंडाळलेला, ही तुमची ओळख ठरू शकते. घडय़ाळ मस्टच. एखादं सिल्व्हर किंवा गोल्डन पट्टय़ाचं मनगटावरचं घडय़ाळ आजही अत्यंत प्रोफेशनल लूकवालं मानलं जातं. प्लॅस्टिकचे पट्टे असलेल्या घडय़ाळावर फुली.
5) बॅग
बॅग हा सोफिस्टिकेटेड असल्याचा उत्तम पुरावा. तुमच्या एरव्हीच्या डल फॉर्मल लूकमधे या बॅगा रंग भरू शकतात. बडय़ा मीटिंगला जाताना शक्यतो रंगीत बॅग नेऊ नका. बाकी कुठल्याही रंगाची पण अतीच मोठी नसलेली बॅग बिंधास्त वापरा.    
- मृण्मयी सावंत                                  

Web Title: What do they wear?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.