सुटीत काय करू?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 08:24 PM2018-04-27T20:24:28+5:302018-04-27T20:24:28+5:30

सुटीत करायचं काय? या घ्या काही मस्त आयडिया, बोअर तर होणार नाहीतच, पुन्हा पैसे कमवण्याची संधीही

What do you do | सुटीत काय करू?

सुटीत काय करू?

Next

- निकिता महाजन
उन्हाळा सुरू झाला. सुट्याही लागल्या. आता भटकणं, गप्पा, रिझल्टची वाट पाहणं, करिअरची काळजी, आंब्यांवर ताव असं सारं सालाबादाप्रमाणे सुरू होईलच. त्यात लग्नसराई. म्हणजे मिरवणंही आलंच. पण उन्हाळा इतका की भरजरी कपड्यांत जीव उकडून जावा. त्यात लोक उन्हाळा असा सुसह्य करा वगैरे सांगतात, मेसेज फिरवतात. असा उन्हाळा सुसह्य वगैरे झाला असता तर त्याला उन्हाळा का म्हटलं असतं?
पण करतात बिचारे लोक प्रयत्न. त्यात आपणही काही प्रयत्न केले तर आपल्यालाही उन्हात काही भन्नाट रंग सापडू शकतील. त्यासाठी फॅशन ट्रेण्ड वगैरे पहायला नको. जरा डोकं चालवलं ना तरी अनेक गोष्टी सुचतील.

१) गो लोकल
आताशा फेसबुक-इन्स्टावर फोटो टाकून लाइक्स मिळवणं कुणाला आवडत नाही. त्यातलाच एक भाग म्हणून जरा मस्त वाळवणांचा हात धरा. काय त्यातले रंग, गंध, आणि वाळवणांचे एकसेएक फोटो. बटाट्याचा किस ते पळीपापड्या ते कुरडाया ते मसाले कुटण्यापर्यंत जरा मस्त काम करून पहा. भरपूर कलर्स सापडतील. खाता खाता हे फोटो सोशल मीडियातही कौतुक मिळवून देतील.
हे सगळं कशासाठी? सुटीचा टाइमपास व्हावा म्हणून.. नाहीतर बोअर व्हायचंच..

२) मेसेज टी-शर्ट
पैसे कमावण्याची ही फुकट आयडिया आहे. यंदाच्या उन्हाळ्यात फन मेसेज लिहिलेल्या टी-शर्टचा भरपूर मोठा ट्रेण्ड आहे. आपणच आपल्यासाठी मस्त टी शर्ट रंगवावेत आणि घालून मिरवावेत. ते जमलंच तर चार मित्रांनाही करून विकावेत. एकदम उद्योग सुरू केल्याचा अनुभव येईल.

३) गो ग्रीन
बाकी फॅशन वगैरे आवडत असेल तर सध्या हिरव्या रंगाच्या विविध वस्तूंची फॅशन आहे. म्हणजे काय तर क्रोशाचे हिरव्या रंगाचे कानातले, ब्रेसलेट, दोऱ्यांचे, क्विलिंगचे दागिने असं सारं बनवता येईल. घालता येईल, विकता येईल. ट्राय करून पहा.

४) नो टू सोडा
यंदाच्या उन्हाळ्यातली ही अजून एक संधी. म्हणजे काय तर आता पुन्हा सारे कोकम नि लिंबू सरबताकडे नि ताकाकडे वळताहेत. नो टू सोडा असा एक ट्रेण्ड आहे. सरबतांच्या झटकेपट पावडरी बनवून विकणे किंवा सरबतांचे सिरप करून विकणे हेपण भारी काम आहे. पुन्हा भरपूर सरबत पिण्याची संधी.

५) डेनिम डिझाईन
म्हणजे काय तर आता जीन्स, जॅकेटवर एम्ब्रॉयडरी करण्याची फॅशन आहे. मग काय आपल्याला येत असेल असं काही भरतकाम, एम्ब्रॉयडरी तरी आपल्यासाठी मस्त काम आहे.

Web Title: What do you do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.