आपण खातो काय ?
By admin | Published: April 26, 2017 01:24 PM2017-04-26T13:24:51+5:302017-04-26T13:25:53+5:30
हा एक लघुपट आहे. तो पाहिल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न येईलच की जर आपण खातो ते अन्न ते इतकं वाईट असेल तर खावं काय? आणि ते मिळवावं कसं? तर असे प्रश्न पडणाऱ्या लोकांसाठी हे संकेतस्थळ आहे.
Next
>- प्रज्ञा शिदोरे
हा एक लघुपट आहे. तो पाहिल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न येईलच की जर आपण खातो ते अन्न ते इतकं वाईट असेल तर खावं काय? आणि ते मिळवावं कसं? तर असे प्रश्न पडणाऱ्या लोकांसाठी हे संकेतस्थळ आहे.
याचं नाव ‘टेक पार्ट’, म्हणजे सामील व्हा!
अनेक सुजाण अमेरिकन नागरिक आता विचार करू लागले; स्वत:च्या अन्नाविषयी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण ‘काय वाढून ठेवणार आहोत’ याविषयीही.
त्यातूनच हा गट उभा राहिला. हा गट अन्नाबद्दल, त्याच्या स्त्रोताबद्दल विचार करूनच जे खरेदी करतात त्यांना सहाय्य करतात. याबरोबरच मोठ्या समूहासाठी चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती कशी करायची, आपलीच बाग आपण कशी फुलवायची याबद्दल या संकेतस्थळावर भरपूर माहिती दिलेली आहे.
याबरोबरचं हे संकेतस्थळ नागरिकांना चांगल्या प्रतीच्या अन्नाबद्दल सतर्क राहायला मदत करतं. त्यामध्ये कोणत्याही पॅक बंद पिशवीमध्ये असलेल्या पदार्थामध्ये काय गोष्टी आहेत, ते कसे सापडवावे या पासून तो पदार्थ तयार कधी केला आहे आणि तयार कुठे झाला आहे, हे कसं शोधावं अशा आणि अशा अनेक विषयांमध्ये, हे संकेतस्थळ लोकशिक्षणाची करत असत.
भारतामध्येही शेतीमध्ये अनेक प्रयोग सुरु आहेत. कमी खर्चात सेंद्रिय पद्धतीने शेती, मग असे पोषक पदार्थ कमी खर्चात सर्वना मिळू शकण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्थेची भारतात आहेत.
तुमच्या भागात या विषयी काम करणाऱ्या आहेत का कोणत्या संस्था? जर नसतील आणि तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर आपणच अशी छोटी कृती का सुरु करू नये?
काय काय प्रयोग करता येतील यामध्ये?
या संकेतस्थळावरची माहीत वाचा आणि ‘सामील व्हा!’
टेक पार्ट.
वाचा ही लिंक
http://www.takepart.com/foodinc
टेक पार्ट
माझ्या मैत्रिणीनं मला परवाच एक कमाल गंमत सांगितली. मुंबईमधल्या एका प्रख्यात शाळेत ‘लाईफ स्किल्स’ असा विषय पाचवीच्या वर्गाला शिकवते.
ती म्हणाली की या अतिशय सधन घरांमधल्या आणि अतिशय लहान वयात किमान दोन ते तीन देश बघितलेल्या मुलांना तिनं एका ट्रिपला नेलं. भाजी-पाला, शेती, मातीकाम हे सगळं शिकवण्यासाठी. तिने या मुलांना ठाण्यातल्या एका लहान शेतात नेलं होतं. प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यावर या शाळेचा भर होता. त्यामुळे शेतीविषयी माहिती प्रत्यक्ष शेतात जाऊन द्यावी असं त्याचं म्हणंण. पोचल्यावर तिनं अतिशय साध्या प्रश्नांपासून सुरूवात केली. म्हणजे भाजी कुठून येते असं विचारल्यावर २० पैकी १२ मुलं म्हणाली, की भाजी ही मॉल मधून येते.
त्या मुलांनी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये न बांधलेली, माती लागलेली, झाडावर वाढणारी भाजी मुळी कधी पाहिलीच नव्हती. भाताच्या शेंगा असतात, दाणे जसे एका शेंगेत असतात तसेच तांदळाचे अनेक दाणे एका शेंगेमध्ये मिळतात अशी भन्नाट उत्तरं मुलं देत होती.
आता सांगा, एवढी साधी माहिती नसताना ही मुलं मोठी झाल्यावर खाण्याबद्दल योग्य निर्णय कसा घेणार? त्यामुळे ही मुलं शक्यतो ज्याची जाहिरात अधिक होते अशा अन्नाच्या, म्हणजे फास्ट फूडच्या आहारी जाणार. आणि बलाढ्य कंपन्यांचंच भक्ष बनणार. फूड आयएनसी हा लघुपटही हेच सांगतो. यामध्ये अमेरिकेच्या सध्याच्या अन्न आणि त्याच्या अनुषंगाने चालणाऱ्या धंद्यांबद्दल उत्तम भाष्य केलं आहे. या लघुपटाचा निर्माता रॉबर्ट केन्नरच्या मते, अन्नमध्ये गेल्या दहा हजार वर्षांमध्ये जेवढा बदल झाला नसेल तेवढा बदल गेल्या दहा वर्षांमध्ये झाला. यामध्ये माणसाच्या सवयींमध्येसुद्धा आमूलाग्र बदल झाला. लोकं कामासाठी शिक्षणासाठी बाहेर पडू लागली त्यामुळे घरातलं ताज अन्न शिजवायलाही नव्हता. अशा परिस्थितीमध्ये बाहेरचं, फास्ट फूड, पचनी पडू लागलं. कारण भाजी पाला आणून स्वयंपाक करणं याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ देणं या लोकांना परवडेनासं झालं.
पण दुसरीकडे डायबेटीससारखे आजारही घरटी एक दोघांनाही होऊ लागले. पण आरोग्यावर, औषधांवर होणाऱ्या खर्चाबद्दल कोणीही बोलायला तयार नव्हतं. कारण इथे फायदा हा औषध कंपन्यांचाच होत होता. या लघुपटामध्ये या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला गेला आहे. या लघुपटामधल्या खूपशा गोष्टी या अमेरिकेच्या अनुषंगाने वर्णन केलेल्या असल्या तरीही तशी परिस्थिती आपल्याकडेही येताना दिसते आहे. आणि म्हणूनच आपल्यासारख्या भारतात राहणाऱ्या मंडळींसाठी देखील हा लघुपट महत्त्वाचा ठरतो.
१२० मिनिटांच्या या लघुपटामध्ये फास्ट फूड चेन्सवर आणि ज्याप्रकारे या चेन्स मांसाहारी पदार्थ निर्माण करून नंतर त्याची प्रक्रि या करून मग विकतात त्याच्यावर केली आहे. यामध्ये अशा प्रकारे, मोठ्या प्रमाणात मांस मिळवण्यासाठी वाढवल्या गेलेल्या जनावरांचे कसे हाल होत असतात याचंही हृदयद्रावक चित्रण या लघुपटामध्ये आहे. यामध्ये सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांच्या मुलाखतींमधून त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीचा अभ्यास केला गेला आहे. आणि या अभ्यासावर आधारित अशीच आकडेवारीही मांडण्यात आलेली आहे.
या लघुपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीतरी स्वत:च्या अन्नाकडे डोळसपणे पहा असं आवाहन केलं आहे.
तेव्हा हा लघुपट नक्कीच पहा!
https://www.youtube.com/watch?v=7t8eaVd-DPs