घरातल्या दादागिरीविषयी भावांचं म्हणणं काय?

By admin | Published: August 27, 2015 06:17 PM2015-08-27T18:17:52+5:302015-08-27T18:17:52+5:30

भाऊ म्हणतात, आम्ही काय शत्रू आहोत का? पण एकतर आम्हाला काळजी वाटते, दुसरीकडे बहिणींचं वागणं! त्या का आमच्यापासून काही गोष्टी लपवतात, का आम्हाला टाळतात, प्रश्न विचारले तरी का चिडतात?

What do you say about brother-in-law dadagiri? | घरातल्या दादागिरीविषयी भावांचं म्हणणं काय?

घरातल्या दादागिरीविषयी भावांचं म्हणणं काय?

Next

 काळजी वाटते, म्हणून बोलतो!

 
स्वातंत्र्य म्हणजे काय
हेच मुलींना कळत नाही!
 रक्षाबंधन हा सण फक्त भारतातच साजरा केला जातो. ज्याचा अर्थ, बहिणीची सर्वार्थाने जबाबदारी भावाची आहे. त्यामुळे भावानं बहिणीची काळजी घेतली, प्रेमापोटी चुकून तिला मारले गेले तर त्यात काही तिला त्रस देण्याचा हेतू नसतो. बहीण चुकीच्या मार्गाला जाऊ नये पर्यायाने कुटुंबाची सामाजिक, नैतिक बदनामी होऊ नये एवढा उदात्त हेतू असतो. बहिणीनेदेखील भावाच्या ‘भावना’ समजून घ्याव्यात हीच अपेक्षा आहे. 
पण स्वातंत्र्य म्हणजे काय हेच मुळी अजून मुलींना कळलेलं नाही. प्रत्येक भावाची इच्छा असते की, आपली बहीण स्वत:च्या पायावर उभी राहावी, स्वावलंबी असावी. त्यासाठी प्रत्येक भाऊ झटत पण असतो. पण स्वतंत्र म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण आणि तशी जीवनशैली जगणो नव्हे! 
- संदीप सूर्यवंशी 
मु. पो. दाभाडी, ता. मालेगाव (नाशिक)
 
 
सगळी बंधनं मुलींवरच का?
आपल्या देशामध्ये मुली-स्त्रिया ह्या घराबाहेरच नाही तर तिच्या स्वत:च्या घरातपण सुरक्षित नाहीत. सध्या हे न पचणारं सत्य आहे. पुरु षी मानसिकतेमुळेच स्वत:च्या घरातली मुलगी-बहीण-पत्नी यांना आपल्या धाकात ठेवण्याची परंपरा रूढ झाली. अशा वातावरणात जर घरातल्या मुलीने तिच्या मनासारखं वागायचं ठरवलं की पुरु षी अहंकार आडवा येतो. पण समाजातले बहुसंख्य पुरु ष हे विसरतात की, त्यासुद्धा माणूस आहेत, त्यांना त्यांची मते असू शकतात, आवडी-निवडी असू शकतात. पण सध्या समाजात असा समज असावा, की मुलींना त्यांच्या मनाप्रमाणो जगण्याची मोकळीक दिली तर त्या आपल्या नियंत्रणात राहणार नाहीत, घरातले वातावरण बिघडेल. आजच्या काळातही ब:याच कुटुंबांमध्ये मुलींवर त्याच घरातील मुलांपेक्षा जास्त बंधनं असतात. वेळेत घरी ये, कुठेही जाताना सांगून जा, तुङया मैत्रिणी कोण आहेत, परवानगी न घेता कुठेही जायचं नाही, जास्त फॅशन करायची नाही, मुलांसोबत मैत्री करायची नाही, बोलायचं नाही, मोबाइलवर जास्त बोलायचं नाही अशी अनेक बंधनं घरातल्या मुलींवर त्यांच्या पालकांकडून-भावांकडून घातली जातात. त्यातील काही योग्य आहेत. पण जी योग्य आहेत ती मुलींवरच का? घरी वेळेत येण्याचं बंधन मुलांवर का नाही? 
- अक्षय जोशी
 
 
 
                       
 
घरातच दुजाभाव, त्याला जबाबदार कोण?
 
मी खेडेगावात वाढलेला. घरापासून किमान चार किलोमीटर अंतरावर आमची शाळा होती. रोज पायी जायचं. आम्ही दहाबारा मुलं आणि अवघ्या पाचसहा मुली. त्यातल्या निम्म्या घरकामामुळे गैरहजर असायच्या. शाळेचे अंतर लांब असल्यामुळे भीतीपोटी मुली आमच्यासोबतच असायच्या. त्या घोळका करून मध्यभागी असायच्या आणि आम्ही त्यांच्या बाजूने सुरक्षारक्षक म्हणून असायचो. आम्ही मुलं त्यांचे बॉडीगार्ड आहोत असा आम्हाला फील यायचा. खरं तर आम्हाला घरातूनच सतत सांगितलं जायचं की, मुलींकडे लक्ष ठेवा, त्यांची काळजी घ्या.
खरंतर हा प्रकार भेदाभेद आणि विषमतेचा आहे. याची सुरुवात आपल्याच घरातून होते. लहानपणापासूनच कामाची विभागणी करून काम वाटून दिलेलं असते. घरच्या चौकटीच्या आतली कामं मुलीने करायची आणि बाहेरची कामं मुलाने करायची हे मनावर ठासून बिंबवलेलं असतं. मुलगी कमजोर असते, नाजूक असते आणि मुलीची जात म्हणजे काचेचं भांडं असतं असा समज आणि मुलांवर स्ट्रॉँग असण्याचं बंधन असतंच.
त्याच्यावर बंधनं नसतात पण जबाबदारीचं ओझं असतं. हे सारं बदलायचं तर घरापासून मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण यांना सारखंच वागवलं पाहिजे. तिथे समानता आली तर मग भावांना बहिणींची काळजी करत राहावी लागणार नाही!
- संदीप कांबळे,
वाडा गावठाण, कोरेगाव भीम, 
ता. शिरूर, जि. पुणो 
 
 
 
जरा विश्वास ठेवून तर पाहा!
 
रक्षाबंधन मोठय़ा उत्साहात साजरा करतात. या दिवशी भाऊ आपल्या बिहणीला तिची रक्षा करण्याचं वचन देतो. पण रक्षा करणं म्हणजे नेमकं काय? बहिणीला दबावात ठेवणं? तिच्यावर नजर ठेवणं? ती कुठं जातं, कुठून येते, कोणाशी बोलते हे पाहणं का? त्यातून भाऊबहिणी नात्यात तणाव वाढतो. भावावरील प्रेमाचं रूपांतर भीतीमध्ये होतं. कोणाचे ऐकून वा दुस:या एखाद्या मुलीने काही वाईट काम केलं म्हणून त्याची शिक्षा आपल्या बहिणीला का? आपण आपल्या बहिणीला दबावात ठेवतो तेव्हा कधीतरी ती तो दबाव झुगारून देईल, त्याचं काय? 
पण जर तिला स्वातंत्र्य दिलं आणि जबाबदारीची जाणीव असली तर तिचं ती चांगलं-वाईट ठरवून काही अनुचित वागणार नाही. बाकीच्यांचं माहिती नाही, पण आमच्या घरात तरी मी हे तत्त्व पाळतो!
      
                                                              - योगेश शशिकांत थोरात
                                                                      वसई
 
अबोले जास्त छळतात.
 घरात कुणालाही सांगता न येणारी गोष्ट सर्वप्रथम भाऊबहीण एकमेकांशी शेयर करत असतात. माङया मते बहिणीचे किंवा भावाचे लग्न होईपर्यंत जे नातं भाऊ आणि बहिणीमधे असतं, ते सगळ्यात भन्नाट असतं. एकदम जिवाभावाचं.
  मी माङया बहिणीवर खूप प्रेम करतो. म्हणजे तिची खूप काळजी घेतो. तिला कुठल्याही कारणाने टोकण्याचे काम पडलेच तर ती दुखावणार नाही याची काळजी घेतो. मी कुठल्याही छोटय़ा मोठय़ा कारणांनी तिला त्रस देत नाही. तिला तिच्या मित्रंसोबत फिरायला अडवत नाही, कारण तिची काळजी घेण्यासाठी तिच्या मित्रंसोबत मीसुद्धा मैत्री केली.
ती तिच्या अडचणी मला सांगते, मनातलं बोलते. आमचं नातं त्यातून अधिक घट्ट होतंय. मी कुठल्याही मुलीची छेड काढत नाही. त्यामुळे माङया मनात तसलाही काही गिल्ट नाही. माङया दोन बहिणी आणि मी हे एक वेगळं जग आहे.
पण एक नक्की, बाहेर मी पाहतो भाऊ बहिणींना खूप धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतात.
त्यातून घरोघरचे अबोले जास्त त्रसदायक वाटतात.
- हरिश्चंद्र उद्धव मैंद 
मु.पो. मौशी, ता. नागभीड, चंद्रपूर 
 
 
घरच्यांना फसवतात, मग लपवतात.
आम्हाला नाही आवड त्यांच्यावर लक्ष ठेवायची किंवा त्यांच्या आयुष्यात नाक खुपसायची. पण मग त्या तरी अनेक गोष्टी लपूनछपून का करतात? असे काय चुकीचं वागतात, की जे विचारलं तर राग येतो?  त्या बरोबर वागतात मग आपण कुणाबरोबर आहोत हे उघडपणो का सांगत नाहीत?  जो कोणी आहे मित्र, बॉयफ्रेंड त्याला घरी का बोलवत नाहीत? आम्हाला त्याच्याशी भेटवत का नाहीत? यांना फोनला लॉक ठेवायची काय गरज आहे? त्यांनी सर्व वेळीच सांगितलं तर आम्हाला काय गरज फालतू चौकश्या करायची? आम्हाला राग त्या जे काही करतात त्याचा नाही येत, तर त्या जे आमच्यापासून लपवून ठेवतात त्याचा येतो, हे लक्षात घ्या!
- क्रिष्णा गावंडे
 
आमच्याकडे उलटीच त:हा
 
 माझी बहीण माङयाहून दोन वर्षानी मोठी आहे. भाऊ चार वर्षानी लहान. आमच्या घरात मुलगा-मुलगी असा कधी भेद झालेला मला आठवत नाही. पण एक भाऊ म्हणून आपल्या बहिणीसाठी आपण काय करू शकतो, असा प्रश्न मला पडतो. बहिणीवर लक्ष ठेवणंबिवणं मलाच मान्य नाही. पण माझी बहीण मोठी असल्यानं तीच आमच्यावर लक्ष ठेवते.    
                               - रूपेश कोठावदे
                      मु. पो. खाकुर्डी, ता. मालेगाव (नाशिक)
 
 
आईबाबांचा रोल महत्त्वाचा.
आमच्या बहीणभावाच्या नात्याबद्दल जर कोणी आम्हाला विचारले तर आम्ही सगळे कुटुंब एका मित्र परिवारासारखे राहतो. कारण आमच्या नात्यामध्ये आणखी एक आमची मैत्रीण आहे ती म्हणजे माझी आई. जर माङया बहिणीचा कुठे नृत्याचा कार्यक्र म असेल तर  तिच्या सोबत नेहमी माझी आई असतेच. आमच्या नात्यात दोस्ती आहे, आम्ही कधी भांडत नाही आणि दादागिरी करत नाही त्याचं कारण माझी आई. तिनं आमच्या नात्याला खूप छान आयाम दिला आहे.
 
- विशाल सदाफुले

Web Title: What do you say about brother-in-law dadagiri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.