आईबाबांचं काय चुकतं, असं वाटतं?

By admin | Published: January 2, 2015 03:43 PM2015-01-02T15:43:03+5:302015-01-02T16:07:05+5:30

आईशी आपली दोस्ती असते, तिला काहीही बोलता येतं, तिला काहीही सांगता येतं, हट्ट करता येतो, आपल्या इमोशन्स तीच समजून घेऊ शकते,

What do you think about my parents? | आईबाबांचं काय चुकतं, असं वाटतं?

आईबाबांचं काय चुकतं, असं वाटतं?

Next

 आम्ही मोठे झालोय, हे मान्य आहे का?

 
आई.... चील.!
 
आईशी आपली दोस्ती असते, तिला काहीही बोलता येतं, तिला काहीही सांगता येतं, हट्ट करता येतो, आपल्या इमोशन्स तीच समजून घेऊ शकते, ती आपल्यासाठी काय वाट्टेल ते करू शकते. एकूण आपली आई हे प्रकरण मस्त आहे, आपल्याला जाम आवडते आई..
- असा एकूण चर्चेचा सारा सूर. आई म्हणजे एकदम दोस्तच. शाळेतलं गॉसिप, मित्रंचे अफेअर्स, सिनेमातल्या गोष्ट, आपल्याला कराव्याशा वाटणा:या गोष्टी सारं आईबरोबर शेअर करता येतं. आई आपली मैत्रीणच वाटते अनेकांना. पण ‘नॅगिंग फ्रेण्ड’ अशी पुस्ती जोडायलाही अनेकजण कमी करत नाहीत. आपली भाषा, आपण न बोललेलं, आपल्या डिमाण्डस, आपलं पॅशन, आपली क्रेझ इतकंच आपला क्रशपण आईलाच समजतो असं अनेकांचं ठाम मत.
मात्र तरीही आईच्या काही गोष्टी जाम इरिटेट करतात, असं मुलांना वाटतंच. म्हणून मग त्यांना विचारलं की, आपल्या वागण्यात आईनं काय बदल केले तर आई अजून ‘स्वीट अॅण्ड फ्रेण्डली’ होऊ शकेल! 
एरव्ही आयाच मुलांना सुधारण कार्यक्रम देत सूचना करत असतात, यानिमित्तानं मुलांनी सांगितलंच, आईला की जमल्यास एवढं बदल. म्हणजे बदलच!
ते काय?
 
1) आई ना एकतर अकारण बोलते, खूप बोलते आणि जे घडलेलं नसतं, पण घडू शकलं असतं त्यावर इमॅजिनरी बोलतच सुटते. जरा कमी बोललं तर नाही का चालणार?
2) आई म्हणजे जसा काही एफएम रेडिओचा आरजे, आपण घरात पाय ठेवताच तो ऑन होतो आणि टॉपिक नसलेल्या मुद्दय़ावरही बोलतो. बोलतो. बोलतंच राहतो. आम्ही मोठं झालोय, एवढं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही..
3) अकारण ओरडते, पुन्हा तेच कारण कितीही क्षुल्लक असो, मागचं पुढचं काढून, इतकचा तिकडचा राग घेऊन आमच्यावर ओरडत असते.
4) मदत करू का म्हटलं तर, काही गरज नाही म्हणते, आणि केली नाही तर मीच या घरात मरमर करतेची टेप. रिलॅक्स, एकतर काम सांग, करू दे, नाहीतर कटकट तरी करू नको, असं सांगायचं असतं, पण सांगता येत नाही.
5)खाच-खाच-खाच, हे खाच, ते खाच, असा सतत मागे रट्टा, वाटतं तोंड उघडलं जरा की काहीतरी तोंडातच कोंबेल. त्यात फालतू भाज्या खाऊ घालते नाहीतर टीव्हीवरच्या-पेपरातल्या रेसिपी बनवते, आम्ही काय प्रयोगशाळेतले उंदीर आहोत का.
6) सतत मोठय़ा नाही तर लहान भावांशी तुलना, त्याच्याकडे बघ, तो कसा चांगला वागतो. आमच्यात एक तरी चांगला गूण आईला कधी दिसतो का, असा प्रश्न पडतो.
7)  सीआयडी पहायचं नाही, अॅक्शन सिनेमे, इंग्रजी सिनेमे पहायचे नाहीत, असं कायम म्हणते, आणि स्वत: रडक्या सिरीयल पाहते, बोललं काही की भांडण. रडक्या सिरीयलला एखादा ब्रेक दिला तर नाही का चालणार?
8) तब्येतीवरून सतत लेर. सतत उपेदश. सतत व्यायाम कर, फिरायला जा, लवकर उठ. 
9) आम्ही लहान असताना ही टेप तर अखंड चालू, आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो ही दुसरी टेप. कळलं, मग पुढे? असं बोललं की पुन्हा बडबड-बडबड.
1क्)सगळ्यात महत्त्वाचं, तिनं जरा स्वत:साठी जगावं, आमची काळजी करू नये, थोडं रिलॅक्स केलं तर तिला बरं वाटेल, पण सांगणार कसं?
 
बाबांचं काय?
बाबांचं काय? बाबांना तर सहज गंडवता येतं ! ते बिझीच असतात. त्यांना माहिती कुठं असतं की, आमचं काय चाललंय?’ आश्चर्य म्हणावं की दुर्दैव, पण आम्ही ज्या ज्या मुलामुलींशी बोललो, त्यातल्या सगळ्याच सामाजिक-आर्थिक स्तरातली मुलं हा प्रश्न ऐकताच एकदम हसली. जरा उकरून पाहिलं तर कळतं की, त्यांना बाबांची भीती नाही वाटत. मात्र बाबांना त्यांच्या चालू वर्तमानकाळातल्या जगण्यात फारसा काही रोलच नाही. 
‘बाबा, काय असतो घरात, कायम बिझीच असतो, त्याला माहितीच नसतं की आमचं काय चाललंय !’ असा एकूण सूर. काही मुलं म्हणाली, ‘बाबांना स्वत:चा असा काही रोल नसतो. ते कधी आमचं ऐकतात कधी आईचं. आईनं तक्रार केली की आमच्यावर चिडतात-डाफरतात. मग नॉर्मल होतात. त्यांना त्यांचा काही स्टॅण्डच नाही.’
मग ठरलं की, तपासून पाहूयात की, बाबा या मुलांच्या नजरेतून कसे दिसतात?
1) बाबा कायम बिझीच, पैसे कमावतात, ऑफिसात खूप काम करतात, आणि आपण पैसे मागितले की देतात.
2) घरात मात्र बाबा कायम न्यूज चॅनल पाहतात, क्रिकेट पाहतात, रिलॅक्स असतात. सगळ्यांना कामं सांगतात, बाबा घरात काही काम करत नाही.
3)बाबांची भीती वाटत नाही, पण आईशी जेवढं टय़ुनिंग आहे, तेवढं बाबांशी नाही.
4) बाबा इज देअर, ऑलवेज देअर, बट ही नेव्हर शेअर्स हीज प्रॉब्लम विथ अस, वी डोण्ट शेअर विथ हीम.
5) बाबांना आपली काळजी वाटते, त्यांच्याबरोबर मज्जाही आईपेक्षा जास्त करता येते, पण आधार आईचाच वाटतो, बाबांचा फार वाटत नाही.
 
मुलं घरातल्यांशी ‘शेअर’ का करत नाहीत?
 
जे जे तुमच्या आयुष्यात, शाळेत, मित्रमैत्रिणींमधे घडतं, ते तुम्ही घरी सांगता का, आईबाबांशी शेअर करता का.? या प्रश्नावर अनेक उत्तरं आली. कुणी कुणी स्पष्टच सांगितलं की, ‘आम्ही काय बोलतो, हेच घरच्यांना कळत नाही. काही सांगितलं की टांगायला निघतात. काही सांगणं नको नी बोलणं नको.’
काहीजण म्हणाले, ‘आम्ही सांगायचो पण त्यावर लगेच सल्ले, तू कसं वागलं पाहिजे असा डोस आणि तुझंच कसं चुकतं हा निष्कर्ष, म्हणून सांगणंच बंद करून टाकलं.’  मात्र बहुसंख्य मुलांचं म्हणणं वेगळं होतं.
ते सांगतात, ‘घरच्यांना आपल्या मनातलं, मित्रमैत्रिणींचं, सगळी सिकेट्र्स सांगावीत असं वाटतं, पण त्यांना सांगितलं तर ते स्वत:पुरत्याच त्या गोष्टी ठेवतील याची काय गॅरण्टी? काही सांगायचा अवकाश की झालीच चर्चा. आईला सांगितलं की ती लगेच आमच्या मोठय़ा भावाला किंवा बहिणीला सांगणार, नाहीतर बेस्ट फ्रेण्डच्या आईला फोन करून विचारणार, नाहीतर नातेवाइकांना सांगणार.
हे असं ते सांगत सुटतात ना, ते आम्हाला सहन होत नाही. आपण सांगितलेलं सिक्रेट लिक होतं असं लक्षात आलं की, आम्ही पुढचं काहीच सांगत नाही.
आईबाबा म्हणतात ना, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो, तुम्ही आमचा विश्वास खरा ठरवला पाहिजे.
मग तेच लॉजिक, आम्ही तुम्हाला सांगू. पण तुम्ही आमचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे. लिकेज बंद केलं पाहिजे !’ घरात मुलं काहीच का सांगत नाहीत, का बोलत नाहीत मनातलं, याचं हे उत्तर.

Web Title: What do you think about my parents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.