‘त्याच्या/तिच्या’ नात्यात मोबाईल आल्यानं नेमकं काय झालंय?

By admin | Published: January 8, 2015 09:05 PM2015-01-08T21:05:48+5:302015-01-08T21:05:48+5:30

खरंतर ‘ऑक्सिजन’ला आलेल्या प्रत्येक पत्राची सुरुवातच धपापत्या हातानं, थरथरत्या हातानं झाली असावी

What has happened to mobile phones in 'his / her' relationship? | ‘त्याच्या/तिच्या’ नात्यात मोबाईल आल्यानं नेमकं काय झालंय?

‘त्याच्या/तिच्या’ नात्यात मोबाईल आल्यानं नेमकं काय झालंय?

Next
>लव्ह  पॅक
संपतो?
 
खरंतर ‘ऑक्सिजन’ला आलेल्या प्रत्येक पत्राची सुरुवातच धपापत्या हातानं, थरथरत्या हातानं झाली असावी.मन थुईथूई मोर होत नाचरं झालं असावं, कारण प्रत्येकानं सांगितली होती, आपल्याला ‘त्याचा’/ ‘तिचा’ नंबर मिळाला किंवा आपण हिंमत करुन मागितला ती आठवण.
छातीचे धडधड ठोकेऐकत सुरुवातीला केलेले फोन; ते थोडंच पण पुन्हा पुन्हा बोलणं. आपण काय बोललो हे आठवून हसणं, लाजणं.
अनेकांनी तर कबूल केलं की, हा मोबाईल आमच्या आयुष्यात नसताना आला तर आम्ही कधीच प्रेमात पडलोच नसतो. समोरासमोर काही बोलण्याची हिंमतच नव्हती आमच्यात. खेड्यापाड्यातल्या मुलींनी तर कबूल केलंय की, कुणी पाहिल या भीतीनं आम्ही कधी मुलांशी बोलत नाही, प्रेमात काय पडणार होतो. पण मोबाईल आयुष्यात आल्यानं एक नवीन स्वातंत्र्यच मिळालं. आपलं स्वत:चं असं एक जग निर्माण झालं, त्या जगात कुणाशी बोलायचं आणि कुणाशी नाही याचा कण्ट्रोल आपल्या हाती आला!
आणि त्यातून खरंतर ‘बोलणं’ सुरु झालं, सुर जुळायला लागले, आकर्षण-ओढही वाढली. मोठय़ा शहरातल्या मुलांइतकी मोकळीक आणि स्वातंत्र्य नसणार्‍या छोट्या शहरातल्या, खेड्यापाड्यातल्या मुलामुलींना एक ‘रोमॅण्टिक’ स्वप्नच या मोबाईलनं दिलं.
ते स्वप्न होतं, आपण आपला जोडीदार निवडण्याचं! त्याच्याशी मोकळेपणानं बोलण्याचं!
सिनेमात दाखवतात तसा रोमान्स आणि तितका रोमॅण्टिक अँटिट्यूड आपल्याही आयुष्यात येऊ शकतो, याचं एक स्वप्न प्रेम करणार्‍यांना मोबाईलनं दिलं, आणि प्रेम करणारी ही जोडपी त्यांच्याही नकळत ते स्वप्न सत्यात उतरवून जगू लागली.
त्यातून नाती बहरली, मात्र एकमेकांच्या जवळ येण्याचा ‘स्पीड’ सांभाळू न शकल्यानं बरीचशी नाती अपघातापर्यंतही पोहचू लागली.
त्याच बहरण्याच्या आणि बिघडण्याच्या अनेक कहाण्या ‘ऑक्सिजन’ला आलेल्या पत्रात वाचायला मिळतात.
आणि त्यातून हाती लागतात ३ सूत्रं.
‘त्या’ दोघांच्या नात्यात ‘मोबाईल’नं काय घडवलं-बिघडवलं याची.
१) ‘ती’ दोघं बोलकी झाली.
मोबाईलवर बोलण्यानं जे प्रेम सुरु झालं, त्यामुळं ती दोघं बोलकी झाली. विशेषत: मुली, तो समोर नसल्यानं त्या न लाजता, संकोच न करता अनेक गोष्टी बोलू लागल्या. त्यातून त्यांच्यात एकप्रकारचा समान पातळीवरचा संवाद सुरु झाला, हळूहळू ‘तो’ आपलं ऐकत नाही, आणि ती जरा ‘ओव्हर’ बोलते, या पुरातन भावना त्या नात्यात घुसल्याच, त्यामुळे जे ‘घडत’ होतं, ते बिघडू लागलं. 
२) ते सुपर रोमॅण्टिक झाले.
एरव्ही साधं ‘आय लव्ह यू’ म्हणायला मुली किती भाव खायच्या, त्यात चिठय़ाचपाट्या देत आणि पत्रं लिहित आयलव्हयू म्हणणं तनुस्तर जास्तीच रीस्किी होतं.
आता एक साधा मेसेज, त्यात लव्ह यू, किंवा मिस यू म्हटलं की झालं काम. जितकी भावनेची तीव्रता जास्त तितकं ‘लव्ह यू टूऽऽऽऽऽऽऽऽ मच’ हार्टचे इमेटिकॉन्स पाठवणंही सोपं झालं. लव्ह यू, मिस यू, किस यू, हे सारं म्हणणं, फोन ठेवताना एकमेकांना एक छोटीशी ‘किस्सी’ देणं हे सारं ‘नॉर्मल’ झालं. रात्री झोपताना कानात इयरफोन घालूनच झोपणं, एकाला झोप लागली , असं वाटलं तर दुसर्‍यानं फोन ठेवणं,सकाळी जाग येताच पुन्हा फोन डायल करुन गुडमॉर्निंग म्हणणं, फार आठवण येत असेल तर मिसकॉल देणं, हे सारं नव्या रोमॅण्टिक जगण्याचा भाग होत गेलं..
पण त्यातला रोमान्स लवकर आटतो, या शब्दांची जादू फार टिकत नाही, ते शब्द खोटे, कोरडे वाटायला लागतात.
खूप सुंदर असलेला धबधबा रोमान्स लवकर आटायलाही लागला, हीच याच नाण्याची दुसरी बाजू.
३) अस्वस्थ जगण्याची ‘स्वतंत्र’ धडपड
ज्यांचे हात आर्थिक-सामाजिक परिस्थितीनं कायम बांधलेले, कुठलीही गोष्ट करताना समाज काय म्हणेल याचं ओझं मनावर असतंच. अशा मुलामुलींच्या आयुष्याला एकप्रकारची ‘स्वतंत्रता’च या मोबाईलनं दिली. आपण नव्या जगाशी जुळवून घेतोय या आत्मविश्‍वासाबरोबर निर्णय घेण्याची अदृश्य सक्तीही आली. ती सक्ती अगदी आलेला फोन घेण्याची, स्वत:हून मॅसेज करण्याची का असेना, पण ती स्वत:ची स्वत:च करायची, ठरवायची गोष्ट होती. मात्र आपण स्वत:ला दिलेला किंवा अचानक आलेला मोकळेपणा स्वीकारुन, स्वत:इतकंच दुसर्‍यालाही स्वातंत्र्य द्यायचं असतं हे भान रोजच्या जगण्यातून न आल्यानं, मोबाईलवर सतत भांडणंच सुरू झाली. त्यातून सततची अस्वस्थता, रडवेपणा आणि प्रचंड हुसहुस या मुलामुलींच्या आयुष्यात शिरली.

Web Title: What has happened to mobile phones in 'his / her' relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.