क्या प्लेअर है यार!!
By Admin | Published: April 6, 2017 09:10 PM2017-04-06T21:10:49+5:302017-04-06T21:10:49+5:30
महेंद्रसिंग धोनी नावाचा भन्नाट मल्टिटास्किंग माणूस;त्याचं डोकं नेमकं चालतं कसं?
धोनी. त्याचं नाव हीच एक खरंतर प्रेरणा आहे, तो कॅप्टन असो नसो, चर्चेत असतो. आणि पॉझिटिव्ह चर्चेत असतो. नुकतीच एक बातमी होती की धोनी एका कंपनीचा ‘सीईओ आॅफ द डे’ झाला होता कालपरवा. त्याचे सुटाबुटातले फोटोही व्हायरल होतेच. मॅन आॅफ मल्टिटास्किंग असं ज्याचं वर्णन करतात, त्याला कसं जमत असेल हे सदा असं हसतमुख राहणं, कायम जिंकणं आणि कायम पॉझिटिव्ह राहणं?
उत्तर शोधायचं तर फार खोलात नाही गेलं तरी चालेल..
एका वाक्यात ते उत्तर मिळतं.
ते म्हणजे धोनीचा माईण्डगेम.
एरव्ही त्याच्या मुलाखतीतून तो दिसतोच..
पण काल धोनीचे सुटाबुटातले फोटो पाहताना आठवत राहतो, धोनीच्या सिनेमातला एक सीन!
माही त्याच्या मित्रांना आपण मॅच कुठं हरलो हे सांगत असतो.
हसत -हसत. युवराज सिंगची तारीफ करत असतो.
आणि मग म्हणतो एकट्या युवराजनं आमच्या टीमपेक्षा जास्त स्कोअर केला.
‘लेकीन पता है हम मॅच कहां हारे?
बास्केटबॉल कोर्ट पे!’
मित्र विचारतात, बास्केटबॉल पे, वो कैसे?
त्यावर धोनी सांगतो, रात्री नेट्समध्ये सराव करुन परतताना त्याच्या संघ सहकाऱ्यांना युवराज सिंग दिसतो. स्टायलिश. रुबाबदार. चेहऱ्यावर आत्मविश्वास. एकदम विनर्स अॅटिट्यूड. तो या मुलांकडे पाहतही नाही. ही मुलं मात्र त्याच्याकडे पाहत राहतात. आश्चर्यानं. आणि तो आपल्या स्टायलिश गाडीला किक मारुन जातो तेव्हा म्हणतात, क्या प्लेअर है यार!
धोन म्हणतो, आम्ही हरलो ते तिथेच!
धोनी माणसांचा, त्यांच्या मनांचा, जिंकण्याहरण्यावर होणाऱ्या आपल्या विचारांचा असा शांतपणे विचार करतो. म्हणून तर कुलही असतो , आणि जिंंकतोही..
धोनीकडून लाईफस्किल शिकायचं असेल तर आपल्याला हेच शिकावं लागेल..
आणि सांगावं लागेल स्वत:लाच की, आपणही काही कमी नाही!
नाशिक, प्रतिनिधी