झगमगीत सिक्विन्स घालताय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 05:10 PM2018-01-31T17:10:54+5:302018-02-01T16:14:43+5:30

ग्लॅमरस किंवा पार्टी लूक देणा-या, सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया चकचकीत सिक्विन्स किंवा ब्लिंगची सध्या मोठी चर्चा आहे.

 What is the shirt ? | झगमगीत सिक्विन्स घालताय का?

झगमगीत सिक्विन्स घालताय का?

Next

- श्रुती साठे
ग्लॅमरस किंवा पार्टी लूक देणा-या, सर्वांचे लक्ष वेधून घेणाºया चकचकीत सिक्विन्स किंवा ब्लिंगची सध्या मोठी चर्चा आहे. करिश्मा, करिना या बहिणी आणि मलाईका अरोरा यांनीही अलीकडे ह ब्लिंग वापरलेले दिसतात. गेल्या डिसेंबरपासून खूप ठिकाणी हे ब्लिंग पाहायला मिळत आहे. कपडे, फूटवेअर, ते अगदी नखांच्या सजावटीसाठी त्यांचा वापर सुरेख केलेला दिसतो.
तुलनेने महाग असतं हे सिक्विन्स कापड. कपडे बनवायला अतिशय जिकिरीचं असतं. अतिशय बारीक नेट किंवा पातळ कापड - जॉर्जेट, शिफॉन किंवा होजिअरी कापडावर हे सिक्विन्स मशीन किंवा हातानं शिवले जातात. फॅब्रिक ग्लू नं चिकटवलेसुद्धा जातात. सिक्विन्स कापड हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते. वापरताना स्टाइलही अतिशय साधी ठेवावी लागते, जेणेकरून हे कापड कापणं व शिवणं सोयीचं जातं. वेलवेटप्रमाणे सिक्विन्ससुद्धा आॅल इन इटसेल्फ असल्यानं याच्यात साधी स्टाइलही लक्षवेधी ठरते.

सिक्विन्स टॉप्स आणि ड्रेसेस
सिक्विन्स टॉप स्लिव्हलेस किंवा छोट्या बाह्यांचे चांगले दिसतात. असे टॉप्स बजेटमध्ये ठेवण्यासाठी पाठीच्या बाजूस मॅचिंग होजिअरी किंवा साजेसं कापड वापरलं जातं. करिना कपूरने नुकताच एका पार्टीसाठी घातलेला सिक्विन्स टॉप सगळ्यांच्या लक्षात राहिला. चकाकी असलेल्या या शर्ट फीट टॉपने अतिशय सोबर; पण ग्लॅमरस लूक दिला.
हे ड्रेस खास पार्टीसाठी, इव्हनिंग वेअर म्हणून वापरले जातात. इतर ड्रेसपेक्षा महाग असलेले हे ड्रेस शॉर्ट आणि मॅक्सिलेन्थमध्ये सुरेख दिसतात.

जॅकेट
सिक्विन्स जॅकेट बेसिक काळ्या आणि आॅफ व्हाइट टॉपवर खुलून दिसतं. झटपट पार्टी रेडी व्हायचं असल्यास सिक्विन्स जॅकेट हा अचूक पर्याय आहे.

ग्लिटर नेल्स
चमचमत्या हिरेजडित ब्रेसलेट्स, बांगड्या, अंगठ्या यांना मागे टाकत नखांवर सिक्विन्स वर्क तरुण मुलींना चांगलंच आवडू लागलेलं पहायला मिळतंय. परदेशात नखांवर काम करून देणारे नेल आर्ट स्टुडिओ प्रसिद्ध आहेत.

पायात चमचमते जोडे
सगळ्याच फॅशन फूटवेअर ब्रॅण्डनी स्निकर, वेजेस, सॅण्डल्स, फ्लॅट्स इत्यादी प्रकारात सिक्विन्सचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसतो. असे फूटवेअर कॅज्युअल, तसेच पार्टीवेअरसाठी छान दिसतात.

 

 

Web Title:  What is the shirt ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन