तुम्ही कसले कंधे, तुम्ही तर चान्समारू
By admin | Published: August 6, 2015 04:45 PM2015-08-06T16:45:03+5:302015-08-06T16:45:03+5:30
फिरवण्यासारखी पोरगी भेटली तर तुमच्यासारखी पोरं ती फिरवल्याशिवाय राहत नाहीत. मग वापरण्यासारखा पोरगा सापडला, तर आजकालच्या पोरी सोडतील का?
Next
>मुली मुलांना वापरत नाही, ते स्वत:हून कंधा बनतात, कारण आयुष्यात त्यांना दुसरं काहीच येत नाही असं सांगणारं एका मैत्रिणीचं हे पत्र!
प्रिय (सुदैवाने माझ्या नसलेल्या) कंध्यास
खरंतर तुझा माझा संबंध तेव्हाच संपला होता, जेव्हा माझ्या ब्रेकअपनंतर पाचव्याच दिवशी मी तुला झापडलं होतं. ‘‘इट्स माय ब्रेक, माय प्रॉब्लेम, इट्स नन ऑफ युवर बिझीनेस.’’ आणि मग सवयीप्रमाणो ‘तू नहीं तो कोई और सही, कोई और नहीं तो तू भी चलेगी’ असलं काहीसं करत दुस:याच कुणाच्या मागे मुरळत राहिलास.
हे असे ‘कंधे’ मी बरेच पाहतेय, पाहिलेय आजूबाजूला!
आजकाल म्हणो तुमच्या जमातीला फारच ‘बिचारं’ असल्याचं फिलिंग येतंय. तुमच्यावर म्हणो अन्याय (?) वगैरे होतोय. मग म्हटलं करूनच टाकावं दुध का दुध आणि पानी का पानी!
तर कंध्यांनो, तुमची मला उमगलेली साधी सरळ व्याख्या म्हणजे ‘चान्समारू’! ओळखीची कोणी रस्त्याने चालत जाताना दिसली की जा तिला सोडायला, भले तुम्हाला उलटा फेरा का पडेना. (भाई! पोरगी बसली ना मागे, अजून काय पाहिजे.) एखादीने चेहरा केविलवाणा करून म्हणावं परीक्षेआधी, ‘माझा अभ्यास नाही झालाय’ की बसले रात्रभर तिच्यासाठी रिव्हीजन मारत!! जिसकी स्टेअरिंग से लेके डिक्की तक और टॉवेल से लेके कंघीतक सब तमाम लडकियों के नाम लिखा हो ना, वो होता है कंधा.
आणि म्हणूनच स्वत:ची गाडी स्वत:च मेन स्टँडवर लावू शकणारी, वर्गात गोल्ड मेडल मिळविणारी, रेडलाईट एरियात सेक्सवर्कर्सच्या मुलांसाठी काम करणारी, उंच उडीत नॅशनल खेळणारी, रस्त्यात कोणी छेड काढली तर दोन कानफटात ठेवून देणारी, तात्पर्य म्हणजे ज्यांना तुमची कवडीमात्रही गरज नाही अशा पोरी तुम्हाला पेलवत नाहीत. आयुष्यातले गंभीर प्रश्नही तुम्हाला झेपत नाहीत, त्यामुळे ‘ब्ल्यू टॉप घेऊ की रेड?’ असले प्रश्न सोडवणं तुम्हाला सोपं जातं, त्याच मुलींचे कंधे होण्यासाठी तुम्ही धडपडतात.
बरं, पोरी खूप साव असतात आणि तुमचा वापर करतच नाहीत असं मला बिलकुल म्हणायचं नाही. उलट तुमचा कंधा करणा:या मुली तुम्हाला पार घुमवतात. साधं लॉजिक आहे. फिरवण्यासारखी पोरगी भेटली तर तुमच्यासारखी पोरं फिरवल्याशिवाय राहत नाही मग वापरण्यासारखा पोरगा सापडला तर आजकालच्या पोरी सोडतील का?
खरं सांगू का, तुमची लायकीच कंधा होण्याची असते. आपल्या वर्गातील रागिणी आठवते का? कॉलेजची स्टार अॅथलिट, तिला तो तुझा दोस्त कंधा नंबर टू फार आवडायचा. कंधा टू ला पण हे माहीत होतं. एक दोनदा मित्रंनी टोकल्यानंतर काय म्हणाला तो माहितेय ना?
‘‘अबे तिला कधीही रात्री फोन केला की म्हणते झोपायचंय आता, पहाटे पाचला प्रॅक्टीस आहे. आता अशी पोरगी काय कामाची!’’ यावर तुम्ही सगळे कंधावर्गीय प्राणी फिदीफिदी हसला होतात. बिचारा कंधा टू पुढे पुढे त्या हिरोईन राजश्रीच्या बॅगा उचलून उचलून, तिची गाडी ढकलून आणि वेळप्रसंगी तिच्या बॉयफ्रेंडचा मार खाऊन जगला, मार खाऊन खांदा निखळला त्याचा!
तुमच्यावर हसावं की तुमची कीव करावी हे कळत नाही. एखादीला मान टाकायला कंधा देत असताना दुसरीकडे जी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालू शकेल अशी मुलगी तुमच्या आयुष्यात येऊन निघूनही जाते पण तुम्हाला कळत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. मग आयुष्यभर कंधा बनणंच नशिबी येतं.
काये ना बेटा, मला स्वत:ला दोन वैयक्तिक खांदे आहेत. त्यावर मला स्वत:चं एक डोकं आहे. ज्यात स्वत:चाच मेंदू आहे. आणि माझा मेंदू मला माझे प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी वापरता येतो. त्यामुळे प्रश्न तुझा आहे. तू आणि तुङया जातकुळीतले असंख्य काय करणार त्याचा आहे.
ब:याच वर्षापूर्वी माङया आयुष्यातून निघून गेलास ना तेव्हाच सांगणार होते मी, माङया प्रेमाचं काय झालं ह्याची चर्चा नको. स्वत: कोणाच्या तरी प्रेमात पड. नुस्ता खांदा नको बनू. कुणाचा तरी जिवलग, कुणाचा तरी प्रियकर, नवरा, भाऊ बन. हे जमलं तर ‘हॅपी जिंदगी’ नाही तर आपली आहेच ‘कंधागिरी’.
- कंधा म्हणून कुणाचाही, कधीही वापर न करणारी एक मैत्रीण