टिपिकल ते काय?
By Admin | Published: February 11, 2016 07:56 PM2016-02-11T19:56:45+5:302016-02-11T19:56:45+5:30
मी आणि ती अकरावी-बारावी एका वर्गात होतो. मग एकाच कॉलेजात इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळाली. मग प्रेमातही पडलो.
- प्रीतेश
मी आणि ती अकरावी-बारावी एका वर्गात होतो. मग एकाच कॉलेजात इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळाली. मग प्रेमातही पडलो.
इंजिनिअर होऊन आयटीत चिकटलो.
माङया आधी तिला अमेरिकेत म्हणजे ऑनसाइड जाण्याची संधी मिळाली.
वर्षभरानं मी पण गेलो.
सगळ्यांना वाटत होतं की, आम्ही लग्न करावं. पण आमचं करिअर इतकं डिमाण्डिंग की, लग्नाच्या पारंपरिक चौकटीचं आम्हाला बंधन वाटत होतं.
बरीच चर्चा करून आम्ही ‘लिव्ह इन’मध्ये राहायचं ठरवलं. अमेरिकन पद्धतीप्रमाणं आम्ही जगत होतं. तिथं त्याचं कुणाला काही बाऊ करण्यासारखं नव्हतं. कधी मी, कधी ती असा स्वयंपाक, ग्रॉसरी, लॉण्ड्री असं घरकाम करायचो.
तसं सगळं चांगलं चाललं होतं.
बिघडलं ते भारतात आल्यावर.
इथं आल्यापासून आमचे खटके उडायला लागले. कारण तिचं म्हणणं आहे की, तू टिपिकल नव:यासारखा वागतोस. सगळी कामं मलाच करायला लागतात. त्यापेक्षा लग्न केलं असतं तर बरं झालं असतं.
पण बरेच वाद, चर्चा, शेजारपाजा:यांसह घरच्यांचे टोमणो या सा:याला कंटाळलो. सुदैवानं आमचं नातं स्ट्रॉँग होतं. ते टिकलं आणि आता मे महिन्यात आमचं लग्न आहे.
फायनली आम्ही लग्न करायचं ठरवलं आहे. मात्र तरीही घरकाम ते जबाबदारी शेअर करणं, करिअर असे काही वाद आहेत, पण सगळ्याच प्रश्नांची एकदम उत्तरं सापडतील असा आग्रह न धरता शेवटी नात्याला नाव द्यायचं आम्ही ठरवलं !