‘एचआर’चं काम यंत्र करु लागली तर एचआरवाले काय करतील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 04:46 PM2018-10-04T16:46:10+5:302018-10-04T16:46:57+5:30
एचआर ही गोष्ट नव्या काळात फार महत्त्वाची. पण इंडस्ट्री 4.0 मुळे एचआरची 50 टक्के कामं आता यंत्रच करू लागलीत; पण मग एचआरवाले काय करतील?
-डॉ. भूषण केळकर
आजच्या संवादात आपण इंडस्ट्री 4.0 ह्यूमन रिसोर्सेस किंवा मानव संसाधन म्हणजेच ज्याला ‘एचआर’ असं संबोधलं जातं त्यातले परिणाम व पुढील दिशा बघणार आहोत. तपासणार आहोत. एचआर ही गोष्ट तरुण वाचकांसाठी दोन अर्थानं महत्त्वाची आहे. एक म्हणजे जी लोकं नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी व आता काम करत असतील त्यांनासुद्धा. एचआर महत्त्वाचा. दुसरं म्हणजे ज्यांना एचआर या विषयातच करिअर करायचंय अशा एमबीएच्या विद्याथ्र्याना वा मानसशास्त्राच्या विद्याथ्र्यासाठीही हा विषय महत्त्वाचा आहे.
इंडस्ट्री 4.0 च्या बिग डाटा, एआय, बॉट्स आणि या चार महत्त्वाच्या घटकांचा एचआरवर परिणाम होतोय व तो वाढतो आहे. संख्यात्मक भाषेत त्यातील आकडेवारी बघू. एचआरमध्ये प्रामुख्याने रिकूट्रिंग म्हणजे हायरिंग म्हणजे नोकरभरती येतं.
दुसरं म्हणणे असलेल्या मनुष्यबळाच्या कामाचं मूल्यमापन, परफॉर्मन्स अॅपरायसल येतं.
तिसरं म्हणजे दैनंदिन समस्या निवारण-माहिती देणं इत्यादी ऑपरेशनचा भाग येतो. यामध्ये पगार ठरवणं, भत्ते ठरवणं व कंपनीचे सांस्कृतिक/मनोरंजन व विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम ठरवणंसुद्धा येतं.
तर अशा एचआरच्या तीन महत्त्वाच्या भागांमधील इंडस्ट्री 4.0 चा आताचा प्रभाव पाहा. पहिल्या म्हणजे रिक्रूटमेंट/हायरिंग या क्षेत्रात एआयचा परिणाम होऊन 55 टक्के कामं ही माणसांपेक्षा यंत्रं करत आहेत. दुसर्या भागात म्हणजे मनुष्यबळ मूल्यमापन व तद्नुषंगिक शिक्षण देणं यात 20 टक्के भाग तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं होतं आणि तिसर्या भागात म्हणजे दैनंदिन समस्या निवारणात तर 80 टक्के कामं ही चॉटबॉट्स एआय करत आहेत.
साधं बघा आत्ताच्या काळात नोकरी शोधण्यासाठी रिझ्यूम किंवा बायोडाटा लिहिण्याचे दिवस संपत आलेत. जगात 93 टक्के नोकर्यांचे कॉल/मुलाखतीची आमंत्रण्ां ही लिंकडीनवरून येत आहेत. 67 टक्के हे फेसबुकवरून येत आहेत. नजीकच्या काळात तुमच्या लिंकडीन वा फेसबुकवरील म्हणजेच समाजमाध्यमातील तुमच्या वावरावरून तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता विलक्षण वेगाने वाढेल. पूर्वीचा साचेबद्ध सीव्ही हा कालबाह्य होतोय आणि आजकाल व्हिडीओ रिझ्यूम हे चलनी नाणे झालंय!
नुसतं एवढंच नाही तर त्यापुढे जाऊन, नुसतेच जॉब प्रिस्क्रिप्शन आणि उमेदवार यांची सांगड घालून देऊन ही यंत्रणा थांबत नाही, तर पुढील मुलाखत व कौशल्य तपासणीसुद्धा स्वतर्च करते! डीप लर्निगद्वारा. एकूण काय तर ज्याला साचेबद्ध कामं म्हणू शकू ती एचआरमधील कामं यंत्र आणि एआय करणार आहेत.
जी कामं इंडस्ट्री 4.0 करू शकणार नाही. निदान नजीकच्या भविष्यात, त्यात येतात ट्रान्सफॉर्मेशनल म्हणजे परिवर्तनात्मक कामं इंडस्ट्री 4.0 च्या तंत्रज्ञानानं घोडय़ाला पाण्यार्पयत नेता येईल; पण घोडय़ाला पाणी पिण्यासाठी उद्युक्त करता नाही येणार!
आजच्या तरुण पिढीची (म्हणजे तुम्ही सर्व वाचक!) ही खासियत आहे की त्यांना इन्स्टण्ट ग्राटिफिकेशन हवंय आणि त्यांची गरज ही तत्काल आनंदाची आहे.
हेच बघा ना, येल विद्यापीठामध्ये हॅपीनेसवर एक कोर्स जाहीर झाला ज्याच्यात मेडिटेशन, योग, प्राणायाम व माइण्डफुलनेस अशा अनुकूल गोष्टी शिकवतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पूर्ण युनिव्हर्सिटीतील 1/4 विद्याथ्र्यानी त्या कोर्सला रजिस्टर केलं व मग रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं. याचं कारण आजच्या पिढीला तणावाचं नियोजन अत्यावश्यक वाटतं. कारण मुळात ताण-तणाव नियोजन अत्यावश्यक वाटतं कारण मुळात ताण-तणाव, स्पर्धा आणि म्हणून तद्नुषंगिक प्रश्न वाढलेत. यापुढील एचआरची दिशा ही असेल, बाकी सर्व एआय बघून घेईल!
यापुढचं एचआर हे इंडस्ट्री 4.0 मुळे, संस्था-निरपेक्ष आणि व्यक्तिसापेक्ष बनणार आहे. लॉँगटर्मपेक्षा हिअर अॅण्ड नाऊ बनणार आहे. त्याला संस्कृतमध्ये छान शब्द आहे. ‘अधुना इव’ अधुना म्हणजे आताचा हा क्षण-तोच काय तो खरा! आणि म्हणून यापुढचं एचआर हे असेल ‘अधुना इव’ -अधुनैव!!