तुमचं survival skill कोणतं?- काय  काय  येतं तुम्हाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:15 PM2020-06-18T13:15:46+5:302020-06-18T13:17:04+5:30

तुम्ही मुलगा असा वा मुलगी, तुम्हाला हातानं करून खाता आलं पाहिजे, कुणी आजारी पडलं तर त्याची काळजी घेता आली पाहिजे. घरातली सफाई आणि इतर कामं जमली पाहिजेत. हे सगळं म्हणजे स्वावलंबन. महत्त्वाचं काय, तर या कौशल्यांना, स्वावलंबनाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. या काळात हे साध्य करता येईल का?

What is your survivail skill? - What do you know? | तुमचं survival skill कोणतं?- काय  काय  येतं तुम्हाला ?

तुमचं survival skill कोणतं?- काय  काय  येतं तुम्हाला ?

Next
ठळक मुद्देदिवसाच्या 24 तासातली पंधरा मिनिटं तुम्ही स्वत:साठी काढू शकत नाही का?

- वीणा गवाणकर , ( सुप्रसिद्ध लेखिका)

आजच्या काळातल्या आव्हानांवर बोलण्याआधी जरा माझं बालपण आणि तरु णपणीचा काळ आठवते. 
त्यात आजच्या तरु ण मित्रंना कदाचित काही सापडेल.
माझं बालपण सुखी मध्यमवर्गात गेलं. संघर्ष, प्रतिकूलता अशी काही माङया वाटय़ाला आली नाही. 
मात्र मी खेडय़ात वाढले. ही सगळी साठ-सत्तर वर्षापूर्वीची गोष्ट सांगते आहे मी.
मुलींना तर तेव्हा काहीच आउटलेट्स नव्हते. 
त्या आपल्या बैठेखेळ खेळायच्या. मला काय भातुकली वगैरेची आवड नव्हती. वाचनात खूप रमायचे मी. 
आमच्या खेडय़ाच्या शाळेतही पुस्तकं मिळायचीच.
मला दक्षिण ध्रुवावरची मोहीम, साहसकथा असं काय काय मोहात पाडायचं. छोटी छोटी चरित्रं मला खूप आवडायची. 
मोठय़ा भावांची मराठीची पुस्तकंही मी वाचून संपवायचे.
फग्यरुसन कॉलेजला शिकतानाही दिवसचे दिवस लायब्ररीत बसून वाचायचे. पुढं मी लायब्ररीयन झाले. केवळ माझं वाचन अफाट आहे म्हणून मला ती नोकरी मिळाली. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमध्ये मी नोकरी केली. तिथलं डॉ. आंबेडकरांचं ग्रंथालय कमालीचं समृद्ध आहे. तिथं मला जाणवलं, की मी तर फक्त समृद्ध आहे. आजूबाजूचं जग, त्यातलं ज्ञान प्रचंड आहे. त्यावेळी शिक्षिका किंवा बँकेतली नोकरी हेच पर्याय असायचे स्रियांसाठी. त्या काळच्या औरंगाबादमध्ये सायकल चालवणारी मी एकमेव स्री! 
असा सगळा तो काळ होता. मी एकटीच होते. त्या काळातही झपाटल्यासारखं वाचन केलं. ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड होता. त्यातून वर येण्यासाठी मग इंग्रजीही खूप वाचलं.
हे सगळं असं होतं. मात्र आमची पिढी ज्या पठडीतून वर आली, तेव्हाचा काळ इतका बहुपदरी नव्हता. 
ही आजची तरुण पिढी मात्र अनेकानेक गुंत्यांतून जातेय हे तिच्याकडे बघताना, तिच्यासह जगताना लक्षात येतं.
शिवाय हा सगळा कोरोनाचा काळ तर अजूनच गुंतागुंत वाढवणारा आहे. मात्र वेगवान जगात सकाळी सात वाजता घर सोडून संध्याकाळी आठ-नऊ वाजता घरी येण्याचं रूटीन आता मोडलंय. सक्तीने का होईना, या काळात घरी राहिल्यावर शांतपणो जगण्याचा आनंद लक्षात येईल. नोकरी-व्यवसायाचे अनिश्चित तास, प्रवासात जाणारी ऊर्जा याचा नव्याने विचार करता येईल. एकूण नोकरी-व्यवसायाचाच नव्याने विचार करता येईल का हेसुद्धा नक्की बघा!
एक उदाहरण देते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात खूप अनिश्चितता होती. अगदी दूध, भाज्या हेसुद्धा मिळणं दुरापास्त झालं होतं. त्या काळात माङया आसपासच्या काही तरु ण मित्रंनी शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडून देण्याचा प्रयोग केला. हे सगळे तरु ण प्रत्यक्ष शेतात गेले होते. त्यातून शेतक:यांचं नुकसान टळलं. शिवाय ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळाला. त्याचं एरव्ही सहज लक्षात न येणारं मोलही उमजलं. 
हा काळ असा होता, की प्लंबर, इलेक्ट्रिशियन, नाभिक, घरकाम करणा:या मदतनीस ताई हे सगळे श्रमिक उपलब्ध झाले नाहीत. त्यातून कळत नकळत उमजलं, की आमच्या शिक्षणात आता या कौशल्यांचाही समावेश झाला पाहिजे. श्रमाचं मोल, प्रतिष्ठा या काय केवळ सुविचार म्हणून वापरायच्या गोष्टी नाहीत. हे काम माझं नाही असं म्हणणं परवडणार नाही अशा काळात. कारण ही सगळी मुळात जीवनावश्यक कौशल्यं आहेत. सोबतच यातून उपजीविकेचा मार्गही अनेकांना सापडू शकतो. अगदी मोबाइल दुरु स्ती, वेल्डिंग, प्लंबिंग असं काही शिकता येईल. 
पण मग जगण्यातल्या आर्थिक गरजांचं काय? 
तर, मी म्हणोन, की नवी पिढी म्हणून तुम्ही काही कृत्रिम गरजाही निर्माण करता. 
साधीच गमतीची गोष्ट बघा, एरव्ही सेल लागला की आपण सगळे धावत सुटतो; पण आता या तीन महिन्यात मॉल्स बंद. पर्यायानं खरेदीचाही पर्याय बंद. पण कुठं काय बिघडलं? सतत हॉटेलमध्ये जाऊन खाणं ही गरज होती का?
या काळात लक्षात येईल, की आपण ज्यावर पैसे खर्चत होतो, त्या अनेक गोष्टी आपल्या  गरजा  नव्हत्या. अनावश्यक गरजा कमी केल्या तर आपोआपच  कॉस्ट ऑफ लिविंग पण खाली येईल.
शिवाय आपण सामाजिक प्रतिष्ठेचे संकेत बदलले पाहिजेत. साधी राहणी म्हणजे गरिबी नव्हे. गबाळेपणा नव्हे. गांधीजी पंचा नेसत होते. पंचाला महत्त्व नव्हतं. गांधीजी तो नसायचे म्हणून पंचा महत्त्वाचा ठरला. अब्दुल कलाम पेपर विकायचे; पण कलामांच्या पेपर विकण्याला महत्त्व तेव्हा आलं तेव्हा ते मोठे शास्रज्ञ बनले, राष्ट्रपती बनले.
तरु ण पिढीकडे आता सव्र्हायव्हल स्किल्स असले पाहिजेत. तुम्ही मुलगा असा वा मुलगी, तुम्हाला हातानं करून खाता आलं पाहिजे, कुणी आजारी पडलं तर त्याची काळजी घेता आली पाहिजे. घरातली सफाई आणि इतर कामं जमली पाहिजेत. हे सगळं म्हणजे स्वावलंबन. महत्त्वाचं काय, तर या कौशल्यांना, स्वावलंबनाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे.
या काळात हे साध्य करता येईल का? आयुष्याचा भाग म्हणून हे का करायचं नाही?
घर, कुटुंब या संकल्पनेकडेसुद्धा जरा नव्यानं पाहता आलं या काळात तर छान होईल. आज अनेक लोक विविध कारणांनी एकेकटे राहातात. दोन वयोवृद्ध माणसं एकमेकांसोबत राहातात. मी 78 वर्षांची आहे आणि माङो पती 85 वर्षाचे. आम्ही विभक्त कुटुंबात राहात नाही. मात्र मुलं त्यांच्या व्यापामुळे सतत सोबत करू शकत नाहीत. अशावेळी समाजात जगताना मला शेजारी, मित्र-मैत्रिणी यांच्यासह एक्सटेंडेड फॅमिली बनवता आली पाहिजे. अगदी अडचणीच्या, आणीबाणीच्या काळातच हे करायला जाल तर होणार नाही. ही तुमची जीवनशैली असली पाहिजे. या काळात एकटय़ा कोरोनाबाधित वृद्धाला रोज शेजा:यांनी डबा देणं अनेक ठिकाणी घडतंय. किती मानवी संवेदनेतून आलेली गोष्ट आहे ही!  
मी माङयापुरतं बघेन, जगेन असं म्हणणं आता तरु ण पिढीला परवडणार नाही.

हा कोरोनाकाळ म्हणजे आयुष्यात आलेला एक अपरिहार्य ठहराव आहे. प्रत्येकानं या संधीत स्वत:चा शोध घ्यावा. आजूबाजूचा भोवताल, समाज यांनाही नीट न्याहाळावं. बघा काय हाती लागतं.
 


पंधरा मिनिटं  तुम्ही स्वत:साठी काढू शकत नाही का?


आज आपण कल्पनाही करू शकत नाही अशी अनेक कामं ऑनलाइन होताहेत. माझी एक सून आहे. तिनं कोल्हापुरी मसाले बनवून ऑनलाइन विकायला सुरुवात केली. आता नोकरी सोडून हेच करावं की काय इतका तिचा व्याप वाढतोय. माङया मुलीची एक मैत्रीण बंगळुरुला असते. गणिताच्या मोजक्या ऑनलाइन शिकवण्या ती घेते. विदेशातही तिचे विद्यार्थी आहेत. हे मार्ग अनेक तरु ण वापरू शकतात.
आजचा काळ ज्या संधी देतोय त्यांचा वापर आपण खूप शहाणपणाने केला पाहिजे. वेळेचं नियोजन करून हे सगळं करता येऊ शकतं. त्यासाठी तरु ण मित्रंना मी सांगेन, तुमच्या प्राथमिकता नीटपणो ठरवा.
पुढं तुमचं शरीर म्हातारं झालं तरी मन तरु ण ठेवा. मी माङया दिनाक्रमातून, जगण्यातून हे नक्की सांगू शकते तरु ण मित्रंना. मी पुस्तकं लिहिते तेव्हा त्या माणसांचं जगणं अभ्यासते. त्यांच्या विज्ञान शाखेतले प्रयोग, त्यातली शास्रीयता मला कळत नाही. पण माणसं कळतात. विपरीत परिस्थितीतही त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा, तळमळ कळते. तीच मी वाचकांपुढे ठेवते! 
पक्षिशास्त्नज्ञ डॉ. सालीम अली यांनी नव्वद वर्षार्पयत काम केलं. वैज्ञानिक काव्र्हर ऐंशी वर्षार्पयत कार्यमग्न होता. मग मी स्वत:ला सांगते, तू पण करूच शकतेस अठ्ठय़ाहत्तराव्या वर्षी अखंड काम..
हे करत राहण्यासाठी मात्र खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायाम यासंदर्भातली शिस्त मात्र पाहिजेच. 
मी सकाळी साडेपाचला उठून व्यायाम करते. संध्याकाळी दोनेक किलोमीटर नियमित चालते. 
या कोरोनाकाळात तरु णांना शारीरिक-मानसिक स्वास्थ्याचं मोल जाणवलं पाहिजे. दिवसाच्या 24 तासातली पंधरा मिनिटं तुम्ही स्वत:साठी काढू शकत नाही का?

 

मुलाखत आणि शब्दांकन
-शर्मिष्ठा भोसले

Web Title: What is your survivail skill? - What do you know?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.