हे काय चाललंय? हे कुणी ठरवलं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 06:09 PM2020-08-27T18:09:48+5:302020-08-27T18:13:32+5:30
मी सकाळपासून बोर होतोय, आणि म्हणे मला चालत नाही. हे कुणी ठरवलं?
- श्रेयस करमली कामत,
सकाळपासून ती दिसलीच नाही. काल रात्नी झोपताना मला गुड नाइट म्हणून गेली ती अजून इथे आलीच नाही. कुठं बरं गेली असेल.
काल सकाळी तिच्या घरच्याबरोबर ती मला न्यायला आली. माङयाकडे बघून मलाच न्यायचं असा हट्ट धरून बसली.
मला मस्त वाटलं. तिचं स्माइल क्यूट होतं. तिने चमकदार लाल घागरा पोलका घातला होता आणि एवढय़ाशा केसात फुलं वगैरे माळली होती.
मस्त तयार होऊन आली होती. माङयाकडे बघून गोड हसली अन् हाय म्हणाली.
गाडीत मला म्हणाली, आज ना नेव:या करणार आहेत घरी, तुला आवडतात म्हणून. मी खूश.
घरी आल्यावर तिने मला तिचे ड्रॉइंग बुक दाखवलं. तिने माझं चित्न काढलं होतं. मला एक नाचपण करून दाखवला.
‘ही पिंक फुले आहेत ना डेकोरेशनमध्ये, मीच केलीय ती’, तिने मला सांगितलं.
पोरगी आवडली आपल्याला. तिला बरंच काही येत होतं करायला.
काही वेळाने काही माणसं येऊन माङया आजूबाजूला काय काय करू लागली. ती कोप:यात बसून मला पाहून हसत होती.
माणसांनी थोडा वेळ बडबड करून काही गाणी वगैरे म्हटली. तीपण मोठय़ाने गात होती. गाणी पाठ असावीत तिला.
बराच वेळ बडबड आणि गाणी झाल्यानंतर माझं जेवण आलं.
‘ती छोटीशी नेवरी आहे ना, ती मी केलीये, त्यात पुरण जास्त घातलंय ! तीच खा हं.’ तिने माङया कानात सांगितलं.
व्वा. काय नेवरी होती.
मग माणसं पसार झाली. पण ती बसली माङयाजवळ. गाणी गुणगुणत. रांगोळी काढत. मला शाळेतल्या गोष्टी सांगत.
नुकत्याच झालेल्या युरोप ट्रिपचं वर्णन करत. तिने वाचलेल्या गोष्टी सांगत.
यावर्षी खूप पाऊस कसा पडला. शाळेला खूप सुट्टी कशी मिळाली. तिचा नवा ड्रेस कुणी आणला. तिची बेस्ट फ्रेण्ड कशी तिला डब्यातला पास्ता देते.
मी पास्ता कधीच खाल्ला नव्हता. तिने एका बाईला विचारलं, आपण उद्या नैवेद्यात पास्ता करूया का?
तर ती बाई हसली आणि म्हणाली अगं त्याला (म्हणजे मला) तसलं काही चालत नाही.
अरे वा. मी कधी म्हणालो?
संध्याकाळी बाहेर खूप धूर झाला आणि मोठे आवाज येऊ लागले. मला वाटलं टेररिस्ट अटॅक होतोय की काय.
पण लोक काही घाबरलेले वाटले नाहीत.
आम्ही दोघेही खूप घाबरून गप्प बसून राहिलो. आवाजात गप्पापण मारता येईनात. युरोपची गोष्ट अर्धीच राहिली.
त्यानंतर मला गुडनाइट म्हणून ती झोपायला गेली. मीपण दमून झोपलो.
आज सकाळपासून मात्न ती दिसलीच नाही. कालची सगळी माणसं होती.
एक दुस:या बाईने रांगोळी घातली. पण मला नाही आवडली.
आमचं आज यलो आणि ग्रीन रंग वापरायचं ठरलं होतं. हिने भडक काहीतरी केलं.
परत बडबड झाली गाणी झाली. जेवण आलं. माझा मूडच नव्हता. कुठे गेली ही?
दुपारी तर मी अगदी एकटा. गप्पा नाही, गोष्टी नाही. नाच नाही. मला कससंच व्हायला लागलं.
काही वेळाने घरात पाहुणो आले आणि त्यांनी फायनली विचारलं, अरे, आर्या दिसत नाहीये?
तर या घरातील लोक अगदी नव्र्हस झाले.
एक बाई कुजबुजली, तिला येता नाही येणार. काल रात्नी पीरिएड सुरू झाले.
काय संबंध. मला कळेना. पाहुण्यांतील एका छोटय़ा, तिच्याएवढय़ाच मुलीने विचारलं, म्हणजे काय? खाली का नाही येतेय ती?
तर तीची आई कुजबुजली, त्याला (म्हणजे मला) चालत नाही.
अरे ए, हे काय चाललंय? मी सकाळपासून बोर होतोय, तिला मिस करतोय आणि म्हणो मला चालत नाही.
मी जोराने पाय आपटले. माटोळीवरील एक पेरू पडला.
माझी जायची वेळ झाली.
पण ती शेवटर्पयत आली नाही.
युरोपची गोष्ट अर्धीच राहिली..