काय ‘चाल्लंय?’ सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचक -2

By Admin | Published: January 26, 2017 02:13 AM2017-01-26T02:13:11+5:302017-01-26T02:13:11+5:30

बराक हुसेन ओबामा. अमेरिकेचे माजी अध्यक्ष. त्यांची ८ वर्षांची कारकीर्द नुकतीच संपुष्टात आली. आणि ओबामांबरोबर अजून एका व्यक्तीचीही कारकीर्द संपली

What's 'good'? The elit-digestant of viral trends in social media- 2 | काय ‘चाल्लंय?’ सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचक -2

काय ‘चाल्लंय?’ सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचक -2

googlenewsNext

 सौझांची कमाल

 

बराक हुसेन ओबामा. अमेरिकेचे माजी अध्यक्ष. त्यांची ८ वर्षांची कारकीर्द नुकतीच संपुष्टात आली. आणि ओबामांबरोबर अजून एका व्यक्तीचीही कारकीर्द संपली. ती व्यक्ती म्हणजे त्यांचा आॅफिशियल फोटोग्राफर पीटर सौझा. खरं तर पीटर सौझा यांची व्हाइट हाउसमध्ये फोटोग्राफी करण्याची सुरुवात ओबामांमुळे झाली नाही. त्याही आधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचे आॅफिशियल फोटोग्राफर म्हणून काम करायचे. पण सध्या सोशल मीडियामुळे फोटोग्राफीला मोठं वलय प्राप्त झालं आहे. ते त्या काळी नव्हतं. तर २००५ साली सौझा हे शिकागो ट्रिब्यून या वृत्तपत्रासाठी काम करत होते. तेव्हा त्यांनी ओबामा यांचे फोटो काढायला सुरुवात केली. आणि त्यानंतर प्रत्येक कॅम्पेनमध्ये सौझाच त्यांची छायाचित्रे काढायचे.

सोशल मीडियामुळे आता शब्दांपेक्षा चित्रांवर अधिक लोकांचा विश्वास बसतो. ओबामा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरले तेव्हा आणि त्या ही आधी गरज होती ती त्यांची एक छबी अर्थात इमेज निर्माण करण्याची. आणि इथूनच सौझा यांचं काम सुरू झालं. पीटर सौझा यांच्या कामाची तारीफ खुद्द ओबामांनी अनेकदा केली. सौझा यांना ओबामांबरोबरच व्हाइट हाउसमध्ये येऊन आठ वर्षे पूर्ण झाली. आपलं काम कसं असायचं हे सांगताना ते म्हणतात की, ‘मला अख्ख्या व्हाइट हाउसमध्ये कुठेही वावरायची परवानगी होती.

कदाचित ओबामाही ज्या ठिकाणी गेले नसतील तिथेही मी जाऊन आलो आहे. मला कुठेही, कधीही जायला कोणीही अटकाव केला नाही.’ सौझा असं म्हणतात की, त्यांनी गेल्या ८ वर्षांत २० लाख छायाचित्रे घेतली. म्हणजे साधारण दररोज २०००!! मिशेल आणि ओबामा यांचा डान्स इथपासून ते वॉररूममध्ये ओसामाला मारण्याच्या मिशनच्या वेळी बसलेला आपला राष्ट्राध्यक्ष असे फोटो त्यांनी काढले आहेत. ओबामा म्हणतात की, ‘कोठेही काहीही मध्ये मध्ये न करता खुबीने छबी टिपता येते हे सौझा यांचे वैशिष्ट्य. माझे अध्यक्षपदी असतानाचे फोटो तर आहेतच, पण मलिया आणि साशा या माझ्या दोन मुली मोठ्या होत असतानाची सुंदर छायाचित्रे सौझांमुळे मला मिळाली आहेत. आणि त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो! ओबामा आणि सौझा यांचे सर्वांत आवडते ५१ फोटो इथे पहा-http://www.cbsnews.com/pictures/photo-highlights-from-obamas-presidency/
 

त्याबरोबरच फ्लिकरवर व्हाइट हाउसचे पानही नक्की पहा. आणि वाचाही प्रत्येक चेहऱ्यावरचे, क्षणाचे काही भाव..


काय म्हणाले, ओबामा निरोप घेताना?

प्रत्येक अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यानं करायची दोन भाषणे अत्यंत महत्त्वाची असतात. एक अर्थातच निवडून आल्यावर आणि अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्याआधीचं भाषण आणि दुसरं म्हणजे आपली कारकीर्द संपवून, घरी परत जाताना आपल्या अध्यक्षपदाच्या वर्षात मिळवलेल्या आणि गमावलेल्या गोष्टींचा लेखाजोखा मांडणारं भाषण. ओबामा हे उत्कृष्ट वक्ते म्हणून कायमच ओळखले गेलेले आहेत, पण त्यांची ही दोन भाषणे खूपच कमाल आहेत. इतिहासात पहिल्यांदाच आफ्रिकन- अमेरिकन वंशाचा माणूस राष्ट्राध्यक्षपदी निवडला गेला होता. त्यामुळे त्या पहिल्या भाषणादरम्यान वातावरणात खूपच भारावलेपण होतं. हे शिकागोमध्ये केलेलं भाषण आपण यु-ट्यूबवर ऐकू-पाहू शकता...

https://www.youtube.com/watch?v=CnvUUauFJ98  

दुसरं भाषण म्हणजे ओबामा यांच्या कारकिर्दीतलं शेवटचं भाषण. राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकन नागरिकांचा निरोप घेताना केलेलं हे भाषण. हे भाषण त्यांनी परत शिकागोमध्येच केलं. भाषणाची सुरुवात होण्याच्या आधीच ओबामा नुसतं ‘माझ्या अमेरिकन नागरिकांनो...’ असं म्हटल्यावर अख्खा एक मिनिट, ‘ओबामा, ओबामा’ आणि ‘अजून चार वर्षं’ अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. शेवटी ओबामा यांनी त्या टाळ्या, आरोळ्या थांबवून भाषणाला सुरुवात केली. ५० मिनिटांच्या या भाषणात त्यांनी त्यांना कायम साथ दिलेल्या दोन व्यक्ती, एक म्हणजे उपाध्यक्ष जो बिडेन आणि आपली पत्नी मिशेल यांना धन्यवाद दिले. आणि आपल्या भाषणाचा शेवट ‘येस वी कॅन, येस वी डीड!’ असा केला. एका विकसित लोकशाहीचा नेता निरोपाचं भाषण कसं करतो, हे आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पहायला हवं.. हे संपूर्ण भाषण आपण इथे ऐकू शकता- 

https://www.youtube.com/watch?v=udrKnXueTW0

  

Web Title: What's 'good'? The elit-digestant of viral trends in social media- 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.