काय ‘चाल्लंय?’ सोशल मीडियातल्या व्हायरल ट्रेण्ड्सची उचक-पाचक -1
By admin | Published: January 26, 2017 02:11 AM2017-01-26T02:11:26+5:302017-01-26T02:11:26+5:30
गेला आठवड्यात फेसबुकवर एक धमाल होती...
पागलपंती
चॅलेंज हरणाऱ्यांच्या मॅडनेसची कमाल!
गेला आठवड्यात फेसबुकवर एक धमाल होती...
भलेभले सुज्ञ आपले प्रोफाइल पिक्चर म्हणून वाट्टेल ते फोटो दिवसभर लावत होेते...
नागीनची श्रीदेवी काय, हेराफेरीतला परेश रावल, शक्ती कपूर, राखी सावंत, जॉनी लिव्हर नि काय काय वाट्टेल ते..
ही काय भानगड.
तर ते एक चॅलेंज हरले होते.
एक साधा प्रश्न. तुम्ही झोपला आहात, ७ वाजलेत सकाळचे. दाराची बेल वाजली. तुमचे आई-बाबा आलेत. घरात दूध, ब्रेड, जॅम, मध, ज्यूस अशा बाटल्या आहेत, तर तुम्ही सर्वात आधी काय उघडाल?
ज्यानं हा पोस्ट केलाय त्या मित्राच्या इनबॉक्समध्ये जाऊन त्याचं उत्तर द्यायचं. ते चुकलं तर तो मित्र म्हणेल तो फोटो आपला प्रोफाइल पिक्चर म्हणून लावायचा.
त्यात हरलेल्या अनेकांनी म्हणूनच अशी प्रोफाइल पिक्चर्स बदलली होती.
दिवसभर दंगा झाला त्यानिमित्तानं.
हे असे ट्रेण्ड फेसबुकवर सतत येतात. जातात.
पण अशी पागलपंती का करतात लोक?
तर मजा म्हणून.
आणि आपल्यात धमक आहे चॅलेंज घेण्याची हे जगाला दाखवायचं म्हणून...
आता ती धमक दाखवण्याच्या नादात कधी कधी असं माकड होतं ते वेगळं..
- निशांत महाजन