कंडक्टर ड्रायव्हर होतो तेव्हा..? AI च्या जगात हे काय नवीन घडतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 03:33 PM2018-08-02T15:33:40+5:302018-08-02T15:35:45+5:30

एआय, रोबोट एकसाची छापाची कामं करतील असा समज होता; पण आता तर हे रोबोट गाण्यांना चाली लावत आहेत. फॅशनचे आडाखे बांधत आहेत आणि ऑर्केस्ट्राही करत आहेत.

When conductor becomes driver ..? What's new in the world of AI? | कंडक्टर ड्रायव्हर होतो तेव्हा..? AI च्या जगात हे काय नवीन घडतंय?

कंडक्टर ड्रायव्हर होतो तेव्हा..? AI च्या जगात हे काय नवीन घडतंय?

Next
ठळक मुद्देकंडक्टरचा ड्रायव्हर होण्याचा हा प्रवास संगीत क्षेत्रापासून सुरू झालाय आणि तो वेग पकडतोय हे नक्की !!

- डॉ. भूषण केळकर

इंडस्ट्री 4.0 चा परिणाम अनेक विद्याशाखांवर कसा होणार आहे याबद्दल आपण या आणि यापुढील लेखांमध्ये बोलू. आजच्या आपल्या संवादात मी एआय,  इंडस्ट्री 4.0 यांचा कला आणि मानव्यशाखांत कसा परिणाम होतोय याची काही उदाहरणं सांगतो. 
    समजा आपण मानसशास्त्र बघितलं तर एआयमध्येच सध्या मानसशास्त्राचा वापर खूप होतोय. खरं तर गूगल, लिंक्डइन किंवा फेसबुकमध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र शिकणार्‍या विद्याथ्र्याना उत्तम जॉब ऑफर्स होत आहेत. ज्याला ‘कॉग्निटिव्ह’ मानशास्त्र म्हणून संबोधलं जातं त्याला तर कॉम्प्युटर क्षेत्रातच मागणी वाढली आहे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व समाजशास्त्राचा वापर विशेषतर्‍ अर्थशास्त्रात होतो, मार्केटिंगमध्ये होतो. उदाहरणार्थ - जिथे ग्राहकांची पसंती कोणत्या पदार्थ, वस्तू वा सेवांना असेल याचं अनुमान बांधायचं असेल व तद्नुषंगिक आखणी करायची असेल तिथे मानसशास्त्रज्ञ लागतात, तत्त्वज्ञानाचे विद्यार्थीपण लागतात.
    मी अमेरिकेत असताना दोन महिन्यांपूर्वी स्कॉट हार्टले या सिलिकॉन व्हॅलीमधील अत्यंत यशस्वी उद्योजक व गुंतवणूकदाराची मुलाखत ऐकली. त्यात त्यानं असं म्हटलं होतं की यापुढील तंत्रज्ञानाची वाटचाल ही कॉम्प्युटर सायन्सइतकीच कला, साहित्य व मानसशास्त्राची सुद्धा असेल. याविषयावर त्याचं अलीकडेच एक सुंदर पुस्तक प्रकाशित झालंय. जमलं तर वाचा. त्याचं नाव आहे -"The Fuzzy & the Techie"
    मला आठवतं की 2004 मध्ये माझा अकल्पित नावाचा काव्यसंग्रह डॉ. विजय भटकरांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. तेव्हा प्रकाशन समारंभात डॉ. भटकर म्हणाले होते की, यापुढील काळात एआय  कवितालेखन करतील! डॉ. भटकर सरांचं द्रष्टेपण मला जाणवलं ते अलीकडच्या बातमीनं. मायक्रोसॉफ्ट आणि जपानमधील क्योतो विद्यापीठामध्ये तयार केलेली एआय प्रणाली, कविता करते आहे!
    भाषाशास्त्र आणि विशेषतर्‍ भाषांतर क्षेत्रात तर एआय गंडांतर आणू शकतं. गूगल टेक्स्ट मायनिंग, स्पीच रेकगिAशन व गूगल ट्रान्सलेटर या एआय  प्रणालींमुळे फक्त भाषांतरावर अवलंबून असणार्‍या अनेक भाषा शाखेतील पदवीधारकांना नजीकच्या काळात मोठय़ा समस्या येऊ शकतील.
मायक्रोसॉफ्टचा एआय बॉट हा एखाद्या चित्राचं लिखित वर्णनावरून चित्र काढू शकतोय. गूगलचे ‘आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चर’ हे अ‍ॅप, तुम्ही सेल्फी पुरवली की उत्तम फाइन आर्ट्समध्ये सादरीकरण करतोय. घर सजविण्यासाठी कल्पनापण देतोय, तेही चकटफू ! 
    कला शाखेतील ‘फॅशन’ म्हणाल तर मुंबईतील फाल्गुनी व शेन पीकॉक दाम्पत्यानं आयबीएम वॉटसन वापरून फॅशन कशी असेल याचा आराखडा एआय आधारे केलाय !
    त्यांनी 5000 बॉलिवूडची चित्रं, 70-80-90-2000 च्या दशकातील फॅशनचा बदल हा एआय प्रणालीला फीड केला. त्यावरून यापुढील 2 वर्षात, 4 वर्षात आणि पुढील 6 महिन्यांत पण काय पॅटर्न व रंगसंगती तरुणाईला आवडेल ते अनुमान केलं. त्यांनी म्हटलयं की जे काम करायला 1 महिना लागला असता ते 2 दिवसात झालं. र38’4्रें नावाची अशीच अजून एक एआयवर आधारित फॅशनबद्दल अनुमान करणारी भारतीय कंपनी आहे.
    जॉजिर्या टेक या जगप्रसिद्ध विद्यापीठाने ‘शिमॉन’ नावाची एआयवर  आधारित संगीतनिर्मिती करणारी प्रणाली बनवली आहे. लेडी गागा, बीथोव्हन, माइल्स, डेव्हिस यांची 5000 पेक्षा जास्त गाणी या रोबोच्या डाटाबेसमध्ये आहेत. त्यावर आधरित हा रोबोट नवीन चाली रचतो.
    मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, भाषांतर, काव्यनिर्मिती, फॅशन, संगीतनिर्मिती, चित्रकला या कलादालनांमध्ये एआयनं आपलं पाऊल रोवलंय!
    अहो हेच काय, 84्रे (युमी) नावाच्या एका एआय आधारित रोबोटने लुका फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा या इटलीतील पिसामधील सप्टेंबर 2017 मधील कार्यक्रमात संगीताचा संचालक (कंडक्टर) म्हणून यशस्वी काम केलं. म्हणजे बघा ना, कला शाखेत मोडणार्‍या संगीत क्षेत्रातही इंडस्ट्री 4.0 वर आधारित हा रोबोट कंडक्टर प्रख्यात संगीत मैफलीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलाय !
    कंडक्टरचा ड्रायव्हर होण्याचा हा प्रवास संगीत क्षेत्रापासून सुरू झालाय आणि तो वेग पकडतोय हे नक्की !!

Web Title: When conductor becomes driver ..? What's new in the world of AI?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.