इटुकली झुरळं अंगावर पडतात तेव्हा.

By admin | Published: August 20, 2015 03:05 PM2015-08-20T15:05:52+5:302015-08-20T15:05:52+5:30

एक आलिशान हॉटेल. त्या हॉटेलात जो तो आनंदानं जेवत असतो, गप्पा मारत असतो. तितक्यात एक बाई जोरात किंचाळते.

When Itukuli falls on the feces. | इटुकली झुरळं अंगावर पडतात तेव्हा.

इटुकली झुरळं अंगावर पडतात तेव्हा.

Next

 एक आलिशान हॉटेल.

त्या हॉटेलात जो तो आनंदानं जेवत असतो, गप्पा मारत असतो.
तितक्यात एक बाई जोरात किंचाळते.
कुठून तरी एक झुरळ येतं, आणि त्या बाईंच्या पायावर वळवळतं.
बाई जागीच उडय़ा मारायला लागतात. ओरडतात.
दाणादाण होते. टेबलावरचं अन्न सांडतं, पाणी लवंडतं.
तेवढय़ात ते झुरळ उडतं आणि दुस:या बाईच्या हातावर जाऊन बसतं.
त्या बाईंचंही तेच. ओरडणं, किंचाळणं, घाबरणं.
आपण काय करतो, याचं भान त्या दोघींनाही नव्हतं. आणि बाकीचेही त्यामुळे घाबरले. जोरदार हंगामा सुरू झाला. सगळेच पॅनिक झाले.
कुणालाच काही समजत नव्हतं. काय झालं हे ज्यांना कळालंही नव्हतं, तेसुद्धा घाबरून ओरडत होते. काही बिचकून उभे होते.
तेवढय़ात एक वेटर पुढे सरसावला. त्यानं एका सेकंदात ते झुरळ पकडलं आणि बाहेर नेऊन टाकलं.
विषय संपला, सारं शांत झालं.
हा एवढा हंगामा कशामुळे झाला? सगळे डिस्टर्ब कशामुळे झाले? कशानं घाबरले? कशामुळे वैतागले? चिडले?
एवढा मोठा तमाशा कशानं झाला?
आणि मग जो घोळ त्या दोघींनी घातला तो त्या वेटरने का नाही घातला?
एका झुरळानं त्यांना एवढं छळलं असेल का खरंच?
खरंतर इटुकलं झुरळ त्यानं असा काय त्रास झाला असता, पण तरीही झालाच, असं का?
कारण जो त्रास झाला तो झुरळामुळे नाही, तर झुरळ एकदम अंगावर पडलं तर काय करायचं असतं, कसं शांत राहायचं असतं हे माहितीच नसल्यानं किंवा तशी क्षमताच अंगी नसल्यानं झालेला घोळ आहे.
कसं रिअॅक्ट करायचं याचा क्षणभर जरी शांततेनं विचार केला असता तरी हा घोळ झाला नसता. पण तसा विचार न करता रिअॅक्शन दिल्यानं हा एवढा मोठा ड्रामा झाला आणि त्याचा त्रसही झाला.
रोजच्या आयुष्यातही अशी कितीतरी झुरळं आपल्या अंगावर पडतात.
वडील घरी अकारण ओरडतात.
बॉस कारण नसताना झापतो.
ते शांतपणो डील करण्याऐवजी आपण चिडतो. नाराज होतो. उदास होतो.
तेच ट्राफिक जाम, तेच रोजरोजच्या कटकटींचंही.
आपण वेगळ्या मूडमधे असतो आणि भलतंच झुरळ अंगावर येऊन पडतं. प्रॉब्लेम झुरळाएवढा छोटाच असतो. पण आपण त्याला जी रिअॅक्शन देतो ती महाभयंकर असते. त्या रिअॅक्शनमुळे आपला छोटा प्रश्न जास्त मोठा होतो, आपण जास्त वैतागतो अािण त्यातून जास्त प्रश्न निर्माण करून ठेवतो. 
त्यामुळे हे असं विचार न करता ‘रिअॅक्ट’ करणं थांबवता येईल का?
पण म्हणजे करायचं काय?
झुरळ अंगावर पडलं तर आनंद मानायचा का?
तर नाही. रिअॅक्ट न करता रिस्पॉण्ड करायचं.
त्या वेटरनं केलं तसं. झुरळ उचलायचं आणि शांतपणो फेकून द्यायचं.
कुठल्याही प्रश्नावर काय प्रतिक्रिया द्यायची आणि द्यायची की नाही हे आपल्याच हातात असतं.
फक्त थोडं शांत राहून प्रश्न किती मोठा आहे, हे जरा बघायला हवं इतकंच.
(सध्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड होत असलेली एक गोष्ट.)

Web Title: When Itukuli falls on the feces.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.