आत्महत्येच्या टोकावर नेणारं नैराश्य येतं कुठून?

By admin | Published: April 4, 2017 06:35 PM2017-04-04T18:35:05+5:302017-04-04T18:38:51+5:30

वयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी?

Where do you feel depressed at the end of suicide? | आत्महत्येच्या टोकावर नेणारं नैराश्य येतं कुठून?

आत्महत्येच्या टोकावर नेणारं नैराश्य येतं कुठून?

Next

नाशिक, प्रतिनिधी
वयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी? आणि मग अत्यंत निष्ठूर होत त्यांनी स्वत:लाच संपवावं? याला पळवाट म्हणायची का? असे किती प्रश्न २३ वर्षाच्या एक मुलाच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. आपण मरण्यापूर्वी इतरांना आत्महत्येचे धडे देण्याइतपत फेसबूक लाईव्ह करुन ते व्हिडीओ करुन ठेवण्यापर्यंत असं काय डाचत असेल त्याला?
२३ वर्षाच्या अनुज भारद्वाज नावाच्या तरुण मुलानं फाईव्हस्टार हॉटेलमध्ये खोली बूक केली आणि थेट १९व्या मजल्यावर जावून त्यानं आत्महत्याच केली. तो डिप्रेशनमध्येच होता असं आता पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यानिमित्तानं भारतातली आत्महत्यांची आकडेवारी जरी नुस्ती डोळ्याखालून घातली तरी वास्तवाचं भयाण चित्र दिसेल. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. त्यातले १ लाख ३५ हजार भारतात राहतात. १९८७ ते २००७ या काळात भारतातल्या आत्महत्येचा दर वेगानं वाढला. विशेषत: दक्षिण आणि पुर्वोत्तर काळात होणाऱ्या तरुणांच्या आत्महत्या या काळात अधिक होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१० साली भारतात १ लाख ३४ हजार ६०० लोकांनी आत्महत्या केल्या. २०११ मध्ये १,३५, ५८५, तर २०१२ मध्ये १ लाख ३५ हजार ४४५ आणि २०१३ मध्ये म लाख ३४ हजार ७९९ जणांनी आत्महत्या केल्या?
आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के लोक हे शिक्षित होते त्यांनी उच्च माध्यमिक टप्प्यापर्यंत तरी सरासरी शिक्षण घेतलेलं होतं. 
पण मग त्यांनी का आत्महत्या केल्या?
ं आत्महत्येची काही कारण ठळकपणे दिसतात. 
नकोसं आजारपण, हुंडा, त्यानं छळ, ड्रग्ज, परीक्षेत आलेलं अपयश, घरघुती कलह, प्रेमभंग किंवा प्रेमात फसवणूक, गरीबी, बेरोजगारी, जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू, सामाजिक अप्रतिष्ठा, दिवाळखोरी.
साधारण या कारणांमुळे आत्महत्या होते असं पोलिसांचं रेर्कार्ड सांगतं.
आता या साऱ्या कारणांतून वाट काढणं, त्यातून तोडगे शोधणं, मदत मागणं हे सारं अशक्य आहे का? जगात कितीतरी लोक या कारणांशी दोन हात करतच असतात..
पण निराशेच्या टोकावर जावून अनेकजण स्वत:ला संपवतात कारण ते मदत मागत नाही..
मदत शोधा.. मदत मागा..
आणि जगा.. मनापासून!

 

Web Title: Where do you feel depressed at the end of suicide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.