वॉशरूम कुठेय ?

By admin | Published: July 2, 2015 03:08 PM2015-07-02T15:08:05+5:302015-07-02T15:08:05+5:30

वॉशरूम कुठेय ? असा प्रश्न मुलाखतीच्या ठिकाणी विचारण्याची पंचाईत!

Where's the washroom? | वॉशरूम कुठेय ?

वॉशरूम कुठेय ?

Next

नितेश महाजन

वॉशरूम कुठेय ? असा प्रश्न मुलाखतीच्या ठिकाणी विचारण्याची पंचाईत!

 
एक भन्नाट ई-मेल सध्या फॉरवर्ड होतोय. एका एचआरवाल्याचा. तो म्हणतो, उमेदवार सिलेक्ट झाला की, मी त्याला पाणी भरपूर प्यायला द्यायचो. बसून ठेवायचो जरा वेळ. मग तो वॉशरूमला जायचाच.
तेव्हा त्याची परीक्षा पहायचो, म्हणजे तो वॉशरूम कुठेय हे कसं विचारतो?
तिकडे कसा जातो? स्वच्छतेचे नियम कसे पाळतो? दार किती जोरात लावतो, आपटतो? परत आल्यावर पुन्हा कसा येऊन बसतो?
त्यातून एकसेएक नमुने भेटायचेच. पण आपल्याकडे कार्यालयीन स्वच्छतागृहासंदर्भातले शिष्टाचारही लोक पाळत नाहीत, त्यांना माहिती नसतात हा एक मुद्दा त्यातून दिसतो.
दुसरं म्हणजे,  या सा:यातून त्या उमेदवाराचा आत्मविश्वास, बोलण्याचं कौशल्य, अवघडलेल्या परिस्थितीतून बाहेर पडताना दाखवलेला सुज्ञपणा हे सारं समजायचं!
अनेक तरुण मुलांना वाटतं की, धाडकन दार लावून आपण आत जातो, तेव्हा आपल्याला कोण पाहतो. पायानं डस्टबिन उघडून टिश्यूपेपर कसाही फेकतो, दणकन ते झाकण आपटतो, तेव्हा आपल्याला कोण पाहतं?
पण कुणीही पाहत नसताना तुम्ही जेव्हा उत्तम, व्यवस्थित आणि सवयीनं सहज वागता तेव्हाच तुम्ही खरे असता!
ैआणि तो खरेपणा शोधायला वॉशरूम मॅनर्स हा एक सगळ्यात चांगला उपाय आहे.
***
या मेलमधली गंमत बाजूला ठेवली तरी हे खरंय की, अनेकांना कार्यालयात वावरताना पाळायचे स्वच्छतेचे संकेत माहितीच नसतात. आणि काही बेदरकार असतात  आणि काही अस्वच्छही!
हे सारं टाळायला हवं, नाहीतर लोक याच सवयीमुळे आपली परीक्षा करतात.
आणि आपला खरा चेहरा इतरांना दिसतो.
**
गोष्ट क्षुल्लक आहे, पण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसाच आहे. त्यामुळे पुढच्या वेळी मुलाखतीला जाल, तेव्हा लक्षात ठेवा की, समबडी इज वॉचिंग यू. ऑलवेज!
 
 

 

Web Title: Where's the washroom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.