श्याsss जीन्स कुणी धुतं का?
By admin | Published: July 9, 2015 07:49 PM2015-07-09T19:49:13+5:302015-07-09T19:49:13+5:30
कॉलेज सुरू होत असताना पहिली खरेदी होते ती जीन्सची! पण ही जीन्स आपल्याला गिफ्ट म्हणून
Next
कॉलेज सुरू होत असताना पहिली खरेदी होते ती जीन्सची!
पण ही जीन्स आपल्याला गिफ्ट म्हणून
कळकट इन्फेक्शन्स आणि
आळसट गबाळेपणा तर देत नाहीये,
चेक इट!
चालता चालता, कुठूनही रस्त्यावरून जीन्स विकत घेता तुम्ही?
निळं-जाडंभरडं कापड म्हणजे जीन्स असा काही तुमचा समज आहे?
काय वाट्टेल ते होवो,
कुठला कार्यक्रम असो,
लगA असो नाहीतर
कुणाचा दहावा-बारावा,
तुम्ही जीन्सच घालून जाता?
अगदी मुलाखतीला पण जीन्सच घालून जातो आपण,
काय बिघडत नाही त्यानं,
असं बिंधास सांगता?
आठवडय़ातून एकदा धुता ती जीन्स?
पंधरा दिवसांनी तरी एकदा?
काय म्हणता,
जीन्स जितकी मळकी तितकी
ती जास्त चांगली दिसते?
काही मुलंमुली तर इतके हुशार की,
एकदा सकाळी कॉलेजात जाताना जीन्स अंगावर चढवली, की रात्री झोपतानाच काढायची.
सकाळी पुन्हा तीच घालायची.
‘स्वच्छता’ हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत
अडगळीतच असतो म्हणो.
तरुणांच्या जगात तर म्हणो,
जीन्स धुणं हा त्या जीन्सचा
आणि स्वत:चाही अपमानच मानला जातो.
महिन्याकाठी एकदाच तिला
कष्टानं पाणी लावणारे
अनेक बहाद्दर आहेत!
मुलींच्या जगातली तर बात अजून वेगळी!
जमेल तितकी टाईट जीन्स विकत घेतली जाते.
तीही एक साइज लहानच,
कारण आशावाद आपण ‘बारीक’ होणारच!
मग काय अशक्य घट्ट जीन्स नाईलाज म्हणून वापरावीच लागते.
काहीजणी तर कायम स्किनटाइट जीन्सच घेणार,
इतक्या तंग की अंगावरच शिवल्यासारख्या!
पण त्यामुळे ना त्यांना वाकता येतं,
ना चालता.
पण फॅशन आहे, नाईलाज असतो!
सगळ्यात महत्त्वाचं,
तुम्ही जीन्स घालता
म्हणजे तुम्ही ‘यंग’ आहात,
हा समज पक्का!
त्यामुळे आपण जितकी फॅशनेबल जीन्स घालू
तितके आपण ट्रेण्डी-यंग आणि फॅशनेबल
ही जगभरातल्या तारुण्याची मानसिकता आहे.
त्यामुळे ज्यांना ङोपत नाही आणि
आवडतही नाही, तेही जीन्स घालण्यासाठी धडपडतात.
मात्र या जीन्सच्या अतिवापरापायी,
आपल्याला खरुज झाली,
आपल्या त्वचेला इन्फेक्शन झालंय
हे कुणी मान्यच करत नाही.
पण हे खरंय.
तिकडे दूर ऑस्ट्रेलियात एका महिलेच्या पायातलं बळच गेलं अचानक आणि थेट हॉस्पिटल गाठावं लागलं,
मग अनेकींनी आपल्या युरीन इन्फेक्शनच्या, त्वचा विकाराच्या कथा शेअर केल्या.
ैंआपल्याहीकडे अनेकांना
जीन्स सतत घातल्यानं
त्वचाविकारांना
सामोरं जावं लागतं.
पण हे असं कुणी कुणाला सांगत नसतं!