डिजिटल सेक्सचे बळी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 04:35 PM2019-05-09T16:35:45+5:302019-05-09T16:35:56+5:30

‘तसले मेसेज’, चावट जोक, सेक्सटिंग हे सारं ऑनलाइन ‘सुख’ देतं तुम्हाला?

Who is the victim of digital sex? | डिजिटल सेक्सचे बळी कोण?

डिजिटल सेक्सचे बळी कोण?

googlenewsNext
ठळक मुद्देवेळीच सावध व्हा आणि स्वत:ला आवरा!

निशांत महाजन

तुमचं असं कधी होतं का,
तुमचा मूड खूप चांगला असतो,  आणि अचानक तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधल्या चर्चा वाचता, आणि मूड जातो. उदास वाटायला लागतं.
कधीकधी एकदम चिडचिड होते. रडावंसं वाटतं. फटिग येतो. डोकं जड वाटतं. 
-होतं असं?
त्याउलट कधी अवचित कुणीतरी म्हणतं डीपी एकदम छान आहे. मग गप्पा सुरु होतात. फ्लर्ट करणं सुरु होतं. आपल्याला मस्त वाटतं. त्या गप्पा हळूहळू सवयीच्या होतात. मग इमेज शेअरिंग,नाजूक गोष्टी शेअरिंग सुरु होतं. तासंतास व्हिडीओ कॉल होतात. 
आणि एक दिवस हे सारं नाही झालं तर लगेच चिडचिड होते. लेफ्ट आऊट फिलिंग येतं.
-होतं असं?
कधीकधी आपण फेसबुकवर पोस्ट टाकतो. आणि येणार्‍या कमेण्ट्स आणि लाइक्स मस्त एन्जॉय करतो. कधी मात्र आपल्याला लोक नावं ठेवतात. ट्रोल केलं जातं.टर उडवली जाते. अशावेळी कुठं तोंड लपवावं हे कळत नाही. आपल्या स्व प्रतिमेच्या ठिकर्‍या उडतात.
-होतं असं?
***
कितीही नाही म्हणा, ऑनलाइन असलेल्या आणि व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुक वापरणार्‍या प्रत्येकाचं सध्या असं होतं. प्रमाण कमीजास्त असेल मात्र ऑनलाइन असताना मूड्सचा झोपाळा असा वरखाली होत राहतो.आपल्या लक्षातही येत नाही मात्र आपली चिडचिड, कामावरुन लक्ष उडणं, आपण अजिबात फोकस करू न शकणं, उदास वाटणं आणि अत्यंत एकाकी वाटणं हे सारं सतत ऑनलाइन राहिल्यानं वर्तन समस्या म्हणून आता समोर येत आहे.
तरुण मुलांमध्ये याचं प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष आणि काळजीही अलीकडेच जर्नल ऑफ सायबर सायकॉलॉजी बिहेव्हिअर अ‍ॅण्ड सोशल नेटवर्किग या आरोग्य पत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.
तरुण मुलामुलींमध्ये सेक्सटिंगचं प्रमाण जास्त आहे, हे उघड आहे. मात्र सेक्स मेसेजेस एकमेकांना करता करता नगA इमेजेसही काहीजण पाठवतात. त्यातून काही नकोसे मेसेज, नकोसे जोक्स, टीका, टोमणे हे सारं सुरु होतं. आणि अस्वस्थता वाढते आणि ताण वाढून अनेकांना औदासिन्य छळू लागतं. ते जर वेळीच आवरलं नाही तर डिप्रेशनच्या दिशेनंही वाटचाल सुरु होते असं हा अभ्यास सांगतो.
आणि धोक्याचा इशाराही देतोय की, आपल्या डिजिटल फुटप्रिण्टकडे बारकाइनं पहा. आपण काय डिजिटली मागे ठेवतोय त्याचा विचार करा कारण त्या समुद्रातून ते कधीही बाहेर फेकलं जाणार नाही. आणि त्या डिजिटल फुटप्रिण्ट ईल किंवा त्रासदायक आहेत का, हे तपासा.
दुसरं म्हणजे वयात आल्यावर किंवा तारुण्यातही लैंगिक भावना प्रबळ असणं, सारं करुन पाहावंसं वाटणं, उत्सुकता चाळवणं हे अनैसर्गिक नाही. मात्र आपलं लैंगिक समाधान केवळ डिजिटल सेक्सपुरतंच मर्यादित राहील आणि प्रत्यक्षात आपण तणावग्रस्त, अस्वस्थ आणि डिप्रेशनमध्ये गेलेलो असू का, हे तपासून पहायला हवं असंही हा अभ्यास सांगतो.
त्यामुळे आत्मपरिक्षण करत आपणही आपल्या फुटप्रिण्ट तपासलेल्या बर्‍या.
धोका आहेच, हे लक्षात ठेवणं उत्तम.

Web Title: Who is the victim of digital sex?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.