कौन आयएएस बनेगा? कौन आयपीएस?- बताओ कुंडली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:32 PM2019-02-21T17:32:59+5:302019-02-22T17:20:02+5:30

‘इंडिया का मॅप लेलो, इंडिया का मॅप.’ ‘ कॉन्स्टिट्युशन लेलो..’ ‘आओ आओ. सर्मा सरका डेमो किलास एकदम फ्री.’ ‘आओ, मॅथ्सका डेमो, पांचके पांच किलास फ्री!’ ‘ आओ, रिजनिंग-रिजनिंग-रिजनिंग.’ - राजिंदर नगर असो, की मुखर्जी नगर; जाल तिथे बाजार भरलेला. सगळ्याचे एजंट. क्लासवाल्यांचे. स्टडी मटेरियलच्या झेरॉक्स छापणार्‍यांचे. पीजी मिळवून देणार्‍यांचे. स्टडीरूमवाल्यांचे. खानावळीवाल्यांचे आणि ज्योतिष सांगणार्‍यांचेपण! - आणि त्या गर्दीत मोठीमोठी पुस्तकं हातात घेऊन हरवल्या चेहेर्‍यानं फिरणारी पोरं. पुढे काय हे माहिती असणारे त्यात थोडेच. लोंढय़ाबरोबर पुढे सरकत राहणारेच जास्त!

Who will become IAS? Who is the IPS? - Tell Kundali ... | कौन आयएएस बनेगा? कौन आयपीएस?- बताओ कुंडली...

कौन आयएएस बनेगा? कौन आयपीएस?- बताओ कुंडली...

googlenewsNext
ठळक मुद्देयुपीएससीच्या पोरांना नकाशे विकणार्‍या जगात

-शर्मिष्ठा  भोसले 

‘इंडिया का मॅप लेलो, इंडिया का मॅप. कॉन्स्टिट्युशन लेलो..’ 
अचानकच एक खणखणीत आवाज माझं लक्ष वेधून घेतो. एक काळासावळा पोरगा रस्त्याच्या कडेला काय-काय पसरून विकत बसलेला असतो. नकाशे, वेगवेगळे चार्ट्स आणि हो, मोटिवेशनल पोस्टर्स! त्यात स्वामी विवेकानंद, मोहम्मद अली, स्टीव जॉब्स आणि अगदी ‘कर्म कर, फल की अपेक्षा ना कर’ म्हणणारे साक्षात भगवान श्रीकृष्ण एवढी व्हरायटी! 
राजू अग्रवाल. युपीतल्या इटावाजवळच्या लहानशा खेडय़ातून 6 वर्षापूर्वी दिल्लीला आला. गावी आई, पत्नी आणि दोन मुलं. सांगतो, ‘देखो, ये बच्चे भविष्य के लिये गांव छोडके आये। मै पेट के लिये आया. हम गरिबोंका क्या भविष्य? महिनेको छे-सात हजार कमा ले यही बहुत है. नया बॅच शुरू होने पे जादा कमाई होता है। बाद में पड गया ठंडा!’ 
राजू सांगतो, की रस्त्यावर बसण्यासाठी पोलिसांना हप्ता द्यावा लागतो. शिवाय ज्या इमारतीच्या बाजूला तो बसतो तिथले लोक आणि मुन्सिपालटीवालेही सतत त्याला हुसकावत राहतात. राजूकडचं एक पोस्टर सांगत होतं, ह्यका 84 ूंल्ल 1िीें ्र3,84 ूंल्ल ूंँ्री5ी ्र3 
युपीएससीच्या पोरांना नकाशे विकणार्‍या राजूनं कधी कुठलं ड्रीम बघितलं असेल का?
पुढचा रस्ता शोधताना अचानक कानावर मराठी शब्द आले. मुला-मुलींचा एक घोळका थांबलेला. 
सुजित कोल्हापूरचा. स्वप्नाली नगरची. यशवंत सांगलीचा आणि स्वराज मुंबईचा. सुजितला वाटतं, अनेक लोक परीक्षेची नेमकी आणि पुरेशी तयारी न करताच तिचा बाऊ करतात. त्यामुळे वातावरणात अवाजवी ताण निर्माण होतो.’ 
स्वराज म्हणतो, ‘आम्ही गेले सहा महिने ओल्ड राजेंद्र नगरमध्ये रूम घेऊन राहतोय. इथे ज्या प्रचंड संख्येने विद्यार्थी येतात त्यामानाने इथली मुलभूत सोयीसुविधा देणारी व्यवस्था अगदीच तोडकीमोडकी आहे. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर दिल्ली सरकारने नीटच डेवलप केलं पाहिजे. जेवण बरं मिळतं, पण पिण्याचं पाणी खूप वाईट आहे. आम्ही सतत आजारी पडतो.’
 यशवंतच्या मते, ‘अभिनेते तर बारा-बारा र्वष स्ट्रगल करतात. मग आपणही या यशासाठी थोडी र्वष द्यायला काय हरकत आहे?’ 
स्वप्नालीचं निरीक्षण सांगतं की, ‘इथे येणारे सगळेच सुरुवातीला अनेक भ्रम घेऊन येतात. त्यांतले थोडेच अखेर्पयत उरतात. त्यामुळे वरवर दिसणारा आकडा हा फक्त फुगवटा असतो. भौतिक सुखाच्या अपेक्षा हे इकडे येण्याचं कारण असेल तर सच्ची पॅशन हे इथं टिकून राहण्याचं कारण आहे.’ 
- ती पॅशन आपल्याला यशार्पयत नेईल अशी स्वप्नालीची खातरी आहे.
काय बोलणार यावर?
बाजूच्याच एका खांबावर जाहिरात दिसली, ‘पीजी फॉर तेलगू गर्ल्स’. मी त्या नंबरवर सहजच फोन लावला आणि विचारलं, ‘तेलगू मुलीच का?’ तर तेलगू हेल असलेली हिंदी बोलत पलीकडचा आवाज म्हणाला, ‘मै हैद्राबाद से हूँ। मेरे फ्लॅट पे पैलेसे तेलगू लोक रहेता. उसका कैसा रहेताय ना, इदर लडकी मां-बाप को छोड के रहता। गर्ल्सको अपना-अपना एरियाका रूमपार्टनर मिले तो उनको होमसिकनेस कम होताय.’ 
- मी ‘थॅँक्स’ म्हणत फोन ठेवला. 
पुण्याची क्र ांती पाटील भेटली. तिनं सायकोलॉजीमध्ये पदवी घेतलीय. ती सांगते, ‘माझं ऑप्शनल सायकोलॉजी आहे. त्याचे क्लासेस पुण्यात कुठेच नव्हते. म्हणून दिल्लीला आले. ओल्ड राजेंद्र नगरमध्ये अडीचेक महिने क्लास केला. कुठूनही मराठी ऐकायला आलं की कधी एकदा जाऊन बोलू असं व्हायचं सुरुवातीला. पण नंतर-नंतर कळलं की अरे, इथे तर खूप मराठी मुलं-मुली आहेत की! अनेक अनुभवी मुला-मुलींशी बोलताना जाणवायचं की यांना तर खूप इगो आहे. क्वालिफाय झाले नसले तरी इतकी र्वष आम्ही करतोय, ही तर नवी पोरगी आहे असा तो अ‍ॅटिट्यूड असायचा. गाईड करणारी काही चांगली मुलं-मुलीही अपवादाने भेटली. पण स्वतर्‍ची ‘स्टडी सिक्रे ट्स’ बहुतेक लोक सांगत नाहीत. जेवणाचे तर खूप हाल होतात. मी शेवटी आजारीच पडले. मराठी पोरांना हेरून ‘जय महाराष्ट्र टिफिन’ अशी नावं देत जेवण देणारे बरेच आहेत. पण त्यात नाव सोडलं तर ‘मराठी’ काहीच नसतं.’ 
**
ओल्ड राजिंदर नगर जिथून सुरू होतं तिथला मुख्य रस्ता ओलांडला की समोर गुरू नानक मार्केट आहे. मोबाईल-लॅपटॉप रिपेअर, वायफाय कनेक्शन पुरवणारे, ब्युटी पार्लरपासून टेलर, चष्मेवाले, रियल इस्टेटवाले अशा दुकानांच्या दोन समांतर गल्ल्या इथे रात्नी 9 र्पयत गजबजलेल्या असतात. साऊथ इंडियन मेस, उडुपी भोजनालय, मुरादाबादी बिर्याणी, पंजाबी परांठे, इंदुरी पोहे, कोलकाता का मशहूर पुचका, लिट्टी चोखा, मोमोज असे जवळपास सगळ्या भारतीय प्रांतांतले पदार्थ देणार्‍या मेसही इथे दाटीवाटीनं उभ्या आहेत. 
.. त्यातलंच एक दुकान आहे ज्योतिषी पंडित हेमेंद्र शर्मा यांचं! दुकान कसलं, खोपटंच ते. आत देवादिकांच्या जुन्या तसबिरी, पिवळी पडलेली जाडजूड पुस्तकं आणि पसार्‍यात बसलेले पंडितजी. मी जरा डोकावले तर मला म्हणाले, ‘आओ बेटी, कहो क्या सेवा कर सकता हूं?’
 मी म्हणलं, ‘मुझे भविष्य नही जानना. मै आपका इंटरव्ह्यू करना चाहती हूं।’
 पंडितजी म्हणतात, ‘बेटा 40 साल से यहां दुकान है हमारी. पुछलो जो पुछना है!’
आणि मग पंडितजी अखंड सुरूच झाले, ‘हम तो है राजस्थान से। यहां 1978 से हमारी दुकान है। पहले पिताजी थे। अब हम है। हम तो ब्राrाण लोग है। ये परंपरागत काम है हमारा! बहुत बच्चे आते है इधर, उनके मां-बाप भी आते है। पुछते है हम सक्सेस कब होंगे? मै किसीको हतोत्साहित नहीं करता! कौन आयएएस बनेगा, कौन आयपीएस, कोई बॅन्किंगमें लग जायेगा, ऐसे सब को कुछ ना कुछ राह दिखा देता हूं। इधर कुछ हुआ ही नही तो और क्या करना है वोभी बताए देता हूं। गणपती सरस्वती का नामजप मंत्न देता हूं। आखिर ज्योतिष तो एक साइन्सही है ना!’
मी मुकाट मान डोलावली आणि मध्येच त्यांना तोडत विचारलं, ‘एक महिने में साधारण कितने बच्चे आते है?’
पंडितजी म्हणाले, ‘गिनती ना कर सकूं मै! एक बार जो आता है, दुसरे को ले आता है। फेल होनेवाला बार-बार आता है। पर जो सक्सेस हुआ उनमे से बस एकाध मिठाई दे जाता है। वैसे हमारे पास तो दुखी आत्मायें ही आती है, जो सुखी है वो क्यूं इधर की राह धरेगा? कुछ लडके-लडकीयां अपने अफेअरकी प्रॉब्लेम्स लेकर आते है। हम उनसे कहते है, ‘पहले भविष्य संवारो, बाद मे प्यार की सोंचो।’ 

***
(...पुढे ? वाचा  उद्या इथेच .. )

क्रमशः भाग 2

( लोकमत  दीपोत्सव  २०१८  दिवाळी  अंकात  "स्वप्नांचे  गॅस  चेंबर" हा लेख  प्रसिद्ध झाला आहे. )

Web Title: Who will become IAS? Who is the IPS? - Tell Kundali ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.