रस्त्यावर उतरलेले दिल्लीसह देशातले विद्यार्थी का चिडलेत?
By meghana.dhoke | Published: December 19, 2019 08:00 AM2019-12-19T08:00:01+5:302019-12-19T08:05:09+5:30
एका कायद्याला विरोध करणं हा गुन्हा आहे का? असा सवाल घेऊन
-मेघना ढोके / कलीम अजीम
जेएनयू तसंही नेहमी चर्चेत असतं.
तिथल्या विद्याथ्र्याची आंदोलनं या वर्षात सदैव बातम्यांत झळकली. सोशल मीडियात तर त्यावर भयंकर गदारोळ होत राहिला. कोण देशप्रेमी आणि कोण देशद्रोही अशी बिरुदं चिकटवण्याचा मक्ता घेतल्यासारखी वटवटखोर सोशल मीडिया तज्ज्ञांनी लेबलं चिकटवली.
मात्र यासार्यात जेएनयूतली आंदोलनं थंडावली नाहीत.
आणि आता तर गेल्या आठवडाभरापासून दिल्लीत विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात जी भयंकर हातापायी सुरू आहे, त्याचं फुटेज सार्या देशानं पाहिलं. जेएनयू, जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, अलीगढ मुस्लीम विद्यापीठ येथील विद्याथ्र्यानी नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन उभारलं. आणि ते आंदोलन मोडून काढायचं म्हणून दिल्ली पोलिसांनी कारवाई केली.
त्या कारवाईची थेट दृश्यही देशानं पाहिली.
आणि सोशल मीडियात हीरो आणि व्हीलन ठरलेल्या, एकाचवेळी शिव्याशाप खाणार्या आणि दुसरीकडे अत्यंत धाडसी म्हणून नावारूपाला आलेल्या दोन मुलींचीही चर्चा झाली.
आयेशा रेनन आणि लदीदा फर्झाना या दोन तरुणी दिल्ली पोलिसांसमोर उभ्या राहिल्या, त्यांच्या एका पुरुष मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडल्या आणि त्याची सुटका त्यांनी केली.
हातात शस्र नाही; पण डोळ्यात आग आहे, प्रतीकाराची क्षमता आहे आणि धाडसही आहे अशा चेहर्यासह बंदुकधारी पोलिसांसमोर उभ्या या मुलींचे फोटो व्हायरल झाले, चित्रं काढली गेली, आणि त्यांचा चेहरा या आंदोलनाचाही चेहरा बनत गेला.
या मुलींना भयंकर ट्रोलही करण्यात आलं, दुसरीकडे त्यांच्या धाडसाचं कौतुकही झालं.
विद्यापीठाचं आवार, होस्टेल या परिसरात झालेल्या पोलिसी कारवाईबद्दल अनेकांनी निषेधही व्यक्त केला.
आणि त्यामुळे हे आंदोलन फक्त दिल्लीपुरतं उरलं नाही. विद्याथ्र्यावर लाठीमार झाला हे पाहून देशभरातून अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले.
आयआयटी, मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई विद्यापीठ, कानपूर आणि मद्रास आयआयटी, हैदराबाद विद्यापीठ, दिल्ली युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यासह देशभरातल्या विद्याथ्र्यानी मोर्चे काढले. आंदोलनात सहभागी होत हे स्पष्ट सांगितलं की, विद्याथ्र्यावर असे हल्ले योग्य नव्हेत.
देशभरात अनेक विद्याथ्र्यानी विविध विद्यापीठात परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. दडपशाही चालणार नाही म्हणून तरुण विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
हे आंदोलन पुढे कुठं जाईल? असंतोष काय आकार घेईल हे येत्या काळात कळेलच.