आपण इतके का भीत भीत जगतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:51 PM2019-11-01T12:51:32+5:302019-11-01T12:51:32+5:30

कशाचाच भरवसा का वाटत नाही?

Why are we so afraid? | आपण इतके का भीत भीत जगतो?

आपण इतके का भीत भीत जगतो?

Next
ठळक मुद्देकसली भीती वाटते?

- रवींद्र पुरी

ािसमसच्या सुटय़ा लागायला फक्त तीन दिवस उरले होते. माझ्या मित्रांचं अजून हो-नाही चाललंच होतं. आमचं रोडट्रीपचं ठरलेलं होतं; पण तरी ठरत काही नव्हतं. शेवटी वैतागून मी माझी बॅक पॅक केली. गॅस स्टोव्ह, टेण्ट, कपडे, सगळं व्यवस्थित पॅक करून कारच्या बुटमध्ये टाकलं. फोटो काढून मित्रांना पाठवला आणि सांगितलं, तुम्ही या किंवा नका येऊ मी 24 डिसेंबरला रात्री निघतोय. सिडनीहून ब्रीसबेनला की मेलबर्न जायचं ते त्याच दिवशी सकाळी ठरवेल. आणि काय, पुढच्या दहा मिनिटात सगळ्यांचं कन्फर्मेशन आलं. 
सिडनी मेलबर्न रोडट्रीप करायचं ठरलं. सिडनीहून जाताना कोस्ट्रल वे आणि परत येतान इन लॅण्ड रूट असं ठरलं. माझी या रुटवरची पहिलीच ट्रीप त्यामुळे मी ही अगदी एक्सायटेड होतो. 
24 डिसेंबरला दुपारी 3 वाजता एका रेल्वे स्टेशनजवळ भेटलो आम्ही चौघे. कारच्या बुटमध्ये सगळ्यांचं सामान कोंबल्यानंतर मला माझ्या कारची जरा कीवच आली. केवढं ते सामान? हे कमी होतं की काय, कारच्या आतमधेही खूप सारी स्नॅक्सची पाकिटं. पण त्यातही मजा होती. दोन चायनीज एक लीथुनियन आणि मी एक भारतीय असे आम्ही चौघे. त्यामुळे स्नॅक्सही चार वेगळ्या प्रकारचे. 
कारचा बुट फुल केला आणि निघालो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर कडक ऊन होतं. पण 110ची स्पीड, मोकळे रस्ते, स्नॅक्स, सुंदर गाणी यामुळे त्या उन्हाचं काहीच वाटत नव्हतं. जारव्हीस बे व्हाइट सॅण्ड बिचेससाठी प्रसिद्ध आहे. तिथून निघाल्यानंतर मेरू हेड कॅम्पिंग साइटवर कॅम्प करायचं ठरवलं. जीपीएस फॉलो करत हायवेवरून मेरू हेड नॅशनल पार्कवर जाण्यासाठी एका कच्च्या रस्त्यावर टर्न घेतला. थोडंसं घाबरल्यासारखं झालं कारण थोडासा अंधार पडलेला आणि तो कच्चा रस्ता अक्षरशर्‍ जंगलात जात होता. तेवढय़ात आमच्या मागे अजून एक कार आली. वुई हॅव अ कंपनी म्हणत आम्हाला थोडंसं हायसं वाटलं. दहा-पंधरा मिनिटांनी कॅम्प साइटवर पोहोचलो पाहतो तर काय पार्किग फुल. कॅम्पिंग स्लॉट मिळेल की नाही या धास्तीने मी माझ्या मित्रांना कारमधून उतरून लवकर शोध घ्यायला सांगितला. आपल्याकडे जसं बसच्या सीटवर हातरूमाल टाकून जागा पकडतो काहीसं तसंच. लकीली एकाने एक रिकामा असलेला कॅम्पिंग स्लॉट सुचवला. लगेच हातात टेण्ट घेतले आणि त्या स्लॉटवर पोहोचलो, जागा पकडली. बर्‍यापैकी अंधार झालेला. हेडटॉर्चेस ऑन केल्या आणि मस्ती सुरू झाली. एका मित्राने हातातील स्नॅक्सचे पॅकेट जवळच खाली ठेवलेले, कोणीतरी उचलतोय असं वाटले सगळ्यांनी तिकडे टॉर्च वळवल्या. एका मुंगसासारखा प्राणी तो पॅकेट लंपास करायच्या प्रयत्नात होता. टॉर्चच्या प्रकाराने त्याचे डोळे मांजरासारखे चमकत होते. प्राणी कुठला आहे कोणालाच माहीत नव्हतं. आम्ही हिंमत करून त्याला हाकलून लावायचा प्रयत्न केला तर तो भराभर जवळच्या झाडावर चढला. तो आम्हाला घाबरतोय हे समजल्यावर आम्हाला तर सुपरमॅनसारखं वाटलं. तो प्राणी होता पॉसम. 
थोडावेळ शिवनापाणीचा खेळ त्याच्या सोबत खेळला. मेरू हेड म्हणजे समुद्राच्या किनार्‍यावर उंच टेकडीवर असलेली कॅम्पसाइट चांगला व्ह्यू असलेला वेगळा स्लॉट मिळतो का म्हणून मी एकटा निघालो. जंगल, चंद्रप्रकाश, पायवाट आणि हेडटॉर्च असलेला मी. काय रिलॅक्सिंग वाटत होतं. 
कसला तरी विचारात मी एकटा चालत होतो. तेवढय़ात एक सर्रùù. असा आवाज झाला. समोरचं दृश्य बघून चेहर्‍यावर मुंग्या आल्यासारखं झालं श्वास लांब झाला पायवाटेच्या मध्येच एक दोन वीत लांब काळा साप घुटमळत होता. रेड बेलीड ब्लॅक स्नेक इज वन ऑफ द मोस्ट पॉइझनस स्नेक इन ऑस्टेलिया हे आठवलं. घामच फुटला.  मी ऑलमोस्ट त्यावर पाय दिला होता. 
 प्रसंग अटळ होता. स्वतर्‍ला सावरलं आणि  शांत उभा राहिलो तो साप हळूहळू आपल्या मार्गाने निघाला मागून एक लहान मुलगा येत होता. त्याला मी सापाकडे बोट दाखवत सावध केलं.  तो सापाच्या बाजूने अगदी सहजपणे निघून गेला. साप पूर्ण दिसेनासा झाल्यावर मी निघालो. 
पण विचारात पडलो की, माझ्या मनात सापाची भीती निर्माण झालीच कशी, माझा आणि सापाचा कधीच संबंध आला नाही. कदाचित ती सेल्फ मेड होती किंवा इतर कोणी तरी माझ्या मनात निर्माण केली होती. 
नंतर कळलं की, अशा कितीतरी भीती माझ्या मनात आहेत, काहीही कारण नसताना, भीती ही कदाचित आयुष्यात काहीही महत्त्व नसलेली एक कल्पनाच आहे, किंवा आयुष्य आनंदाने जगण्याच्या मार्गातील एक ब्लॉकर आहे.
त्या लहान मुलासारखं भीतीसह किंवा भीतीच नसलेलं जगणं, विश्वासानं जगणं किती छान ठरावं.


 

Web Title: Why are we so afraid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.