थायलंडचे तरुण का भडकलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:10 PM2020-10-22T17:10:16+5:302020-10-22T17:10:34+5:30

रस्त्यावर प्रचंड आंदोलन करत, तुरुंगात जायची तयारी करणार्‍या थाई तारुण्याचा उद्रेक.

Why did the Thai youth get angry? | थायलंडचे तरुण का भडकलेत?

थायलंडचे तरुण का भडकलेत?

Next

-  कलीम अजीम

थायलंडच्या राजधानी बँकॉकमध्ये हजारो युवक रस्त्यावर आहेत. सोमवारी या आंदोलनाचा सहावा दिवस होता. 
रविवारी आंदोलकांनी मेणबत्त्या हातात घेत प्रतीकात्मक ‘फ्लॅश मॉब’ केला. वीकेण्डची रात्र हजारो मेणबत्त्यांनी उजळून गेली. प्रदर्शनात हजारो थाई नागरिक सहभागी झाले.
राजेशाहीविरोधात हे आंदोलन, त्याचा चेहरा तरुण आहे. ‘रिपब्लिक ऑफ थायलंड’ असे ध्वज घेऊन तरुण आंदोलक रस्त्यावर आले. पंतप्रधानांचा राजीनामा आणि राजेशाहीवर अंकुश ठेवण्याची मागणी ते करत आहेत.
सरकार आणि लोकशाही सर्मथकांत झालेल्या या संघर्षात आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. फेब्रुवारीपासून सरकारविरोधी आंदोलनं  सुरू आहेत. कोराना आणि लॉकडाऊन काळात शांतता होती; पण ऑगस्टपासून पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्रता वाढली.
गेल्या बुधवारी राजधानी बँकाकमध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं. ज्यात फिजिकल डिस्टन्सिंगचं उल्लंघन करत हजारो नागरिकांनी गव्हर्नमेंट हाऊसला विळखा घातला. भर पावसात छत्र्या घेऊन आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं.
जनतेचा वाढता आक्रोश आणि सरकारविरोधाची लाट पाहून शासनानं देशात त्वरित आणीबाणीची घोषणा केली. निदर्शनं रोखण्यासाठी राजधानीत चारपेक्षा अधिक लोकांच्या मेळाव्यावर बंदी घातली. सरकारनं जाहीर सूचना  दिली, की जर रॅली काढली आणि त्याचे सेल्फी पोस्ट केले तर दोन वर्षे 
तुरुंगवासाची शिक्षा होईल.


‘दि गार्डियन’च्या मते, सरकारी बंदीला झुगारून रविवारी शहरातील व्हिक्टरी स्मारकात, सुमारे 10,000 लोक जमा झाले. निदर्शकांनी ‘आमच्या मित्रांना सोडा’ अशी घोषणा देत पोलिसांना ‘हुकूमशाहीचे गुलाम’ असं संबोधलं. आणीबाणीचं उल्लंघन केल्यामुळे 80 प्रमुख नेत्यांसह अनेक तरु णांना तुरुंगात डांबण्यात आलेलं आहे. त्यात आंदोलनाचा चेहरा बनलेल्या 36 वर्षीय पनुसाया सिथिजिरावत्तनकुल याचा समावेश आहे. पनुसायाच्या अनेक सहकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. तरु णांचं हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलं आहे.
गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. विरोधी पक्ष असेलल्या ‘पेउ थाई’ला बहुमत मिळालं; परंतु सत्ताधारी ‘पलांग प्रयुत्त पार्टी’नं शक्तीच्या बळावर सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. मतमोजणीत गोंधळ केल्याचा सत्ताधारी पक्षावर आरोप आहे.
हे तरुण आंदोलन भडकणार अशी चिन्हं आहेत.


( कलीम मुक्त पत्रकार आहे.)

kalimazim2@gmail.com 

Web Title: Why did the Thai youth get angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.