माणसं अशी का वागतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 08:21 PM2018-04-27T20:21:52+5:302018-04-27T20:21:52+5:30
डेसमंड मॉरिसची पुस्तकं वाचा किंवा यू ट्यूब व्हिडीओ पहा, कळेल..
- प्रज्ञा शिदोरे
डेसमंड मॉरिसची पुस्तकं वाचा किंवा यू ट्यूब व्हिडीओ पहा, कळेल.. जगभरात सतत, अनेक, मोठे अभ्यास होत असतात. विविध विषयांवर ज्ञान पुढे जात असतं. सामान्य माणूस यातलं किती नि काय वाचू शकतो? वाचलं तरी भाषा शास्त्रीय? कळणार कशी? कारण शास्त्रीय भाषा अशी सहज आणि वाचनीय कुठे असते? मात्र काही शास्त्रज्ञ तसा प्रयत्न करतात. त्यांच्या विषयाची, सामान्य माणसाला कळतील अशा भाषेत पुस्तकं लिहितात.
त्यातलाच एक आवडता लेखक डेसमंड मॉरिस. हा लेखक म्हणजे मूळचा शास्त्रज्ञ, तोही झुलॉजी म्हणजेच प्राणिशास्त्र विषयाचा. त्यानं पुढे जाऊन सोशिओ- बॉयोलॉजी या विषयावर विस्तृत लेखन केलं. माणसाची जडणघडण कशी झाली? त्याच्या अशा घडण्यामागे तेव्हाच्या समाजाचा, टोळीचा काय हात होता, मानवी शरीर, लकबी, चालीरीती या कशा घडत आल्या, असा साधारण त्याच्या लेखनाचा विषय आहे.
ब्रिटनमध्ये मॉरिस बरीच वर्षं चिम्पाझीबद्दल अभ्यास करत होता. त्यामध्ये मानवी वंश आणि चिम्पाझी यामधली साम्यं त्यानं शोधण्याचा प्रयत्न केला. चिम्पाझीने रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शनही त्यानं आॅक्सफोर्डमध्ये भरवलं होतं. या प्रदर्शनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कदाचित यातूनच त्याला त्याचं पाहिलं पुस्तक, ‘द नेकेड एप’ लिहिल्याचं सुचलं असावं. हे पुस्तक बरंच गाजलं. त्यानंतर मॉरिसने याचा दुसरा भागही लिहिला. त्यानंतर त्याने अशी तीसहून अधिक पुस्तकं लिहिली.
मॅन वॉचिंग हे आणि पीपल वॉचिंग ही त्यांची दोन पुस्तकंही गाजली. यामध्ये मॉरिसने आपल्या पूर्वज कसे टोळीत राहत असतील, त्यांचं आयुष्य, दिनक्रम कसा असेल. कोणाला कशी कामं दिली जात असतील याचं सुंदर वर्णन केलं आहे. याबरोबरच, आपल्या गुहेमधील आयुष्याचा आजही आपल्या वागण्यामध्ये, हावभाव व लकबींमध्ये कसा दिसून येतो हे त्याने दाखवून दिले आहे.
‘माणसं अशी का वागतात’, असा प्रश्न तुम्हाला एकदातरी पडला असेल तर तुम्ही त्याची ही पुस्तके नक्की वाचा.
आणि हो, यू ट्यूबवर एक ६ भागांची ‘द ह्युमन सेक्सेस’ नावाची मॉरिसची अप्रतिम सिरीज् आहे. त्यामध्ये पुरु ष आणि स्त्री यांमधले काही बेसिक शारीरिक फरक, त्यामुळे त्यांच्या विचारात, वागण्यात येणारे फरक यावर भाष्य केलं आहे. पाहा जरुर
ँ३३स्र२://६६६.८ङ्म४३४ुी.ूङ्मे/६ं३ूँ?५=ॉाल्ल-ीङ्मश्व_६
स्र१ंल्लि८ं.२ँ्रङ्मि१ी@ॅें्र’.ूङ्मे