ऑफिसात कशाला येता? घरुन काम करा!

By admin | Published: June 15, 2016 11:45 AM2016-06-15T11:45:18+5:302016-06-15T11:45:18+5:30

एक काळ असा होता की, ग्रॅज्युएशननंतर मुलगा घरी बसला की याचं कसं होणार म्हणून आई वडिलांना फारच चिंता वाटायची. नोकरी लागली की एक मुलगा -मुलगी मार्गस्थ झाल्याचे त्यांना समाधान वाटायचे. आता मात्र नोकरीच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल झाला आहे. सध्या जमाना आहे वर्क फ्रॉम होमचा.

Why do you come to the office? Work from home! | ऑफिसात कशाला येता? घरुन काम करा!

ऑफिसात कशाला येता? घरुन काम करा!

Next
>वर्क फ्रॉम होमची संस्कृती आता आपल्याकडेही मूळ धरु पाहतेय.
 
एक काळ असा होता की, ग्रॅज्युएशननंतर मुलगा घरी बसला की याचं  कसं
होणार म्हणून आई वडिलांना फारच चिंता वाटायची. नोकरी लागली की एक मुलगा -मुलगी मार्गस्थ झाल्याचे त्यांना समाधान वाटायचे. आता मात्र नोकरीच्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल झाला आहे. 
सध्या जमाना आहे वर्क फ्रॉम होमचा. 
ऑफिसला जायचे म्हटले की भलामोठा ट्रेन प्रवास किंवा एखाद्या वाहनाने प्रवास करावा लागतो. घामाघूम होऊन तास-दोन तास आधी निघून ऑफिसला जायचं, प्रचंड वर्कलोड, टेन्शन, ऑफीस गॉसिप्स हे सगळं नित्याचंच .पण ऑफिसचं हे रूटीन बदलायचं असेल तर सध्या फूल स्कोप आहे घरून काम करण्याचा. 
ब:याच मल्टीनॅशनल कंपन्या सध्या याला प्राधान्य देत आहेत.आपल्या कंपनीतल्या माणसांनी जर वर्क फ्रोम होम अर्थात घरून काम केलं तर कामातली प्रोडक्टव्हिीटी चांगली वाढते,असे अनेक कंपन्यांचे मत आहे. म्हणून तर ते आनंदाने वर्क फ्रोम होम ला प्राधान्य देत आहेत. मात्र याचे फायदे कितीही चांगले असले तरी ती मात्र ऑफिसमधलं ते वातावरण, मजा मात्र अनेकजण  मिस करतातच.
याविषयी गेल्या 3 वर्षापासून बिझनेस ऑपरेशनचे घरून काम करणारा सलील साने सांगतो, हा फंडा सगळ्य़ाच कंपन्यामध्ये हा फंडा नसतो. काहीच कंपन्या अशी फॅसिलीटी देतात. मला सिंगापूर, थायलंडमधल्या टीमसोबत काम करावं लागतं. ते आपल्या टिपीकल वेळी उपलब्ध नसतातच. मग एकदम पहाटे माझं त्यांच्या वेळेनुसार काम सुरू होतं. घरीही काम करताना 8 जरी द्यावे लागत असले तरी त्यावेळेत फक्त काम ऐके काम असं काही नसतं. रिलेक्स करत चांगले काम करता येते आणि ते चांगल्या क्वालिटीचंच होतं,असं सलील सांगतो.
 गेल्या आठवडय़ात त्याच्याकडे पाहुणो आले होते. तेव्हा त्यांना दिवसभर वेळ तर देता आलाच आणि मधल्या वेळेत कामही केलं. कुठलाही ताण न घेता काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचं स्वातंत्र तुम्हाला मिळतं,असंही तो म्हणाला.
तर वेळ वाचवण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणून वर्क फ्रॉम होमला खूप स्कोप निर्माण झाला आहे,असं अमेरिकेतलं काम भारतात करणारा हेरंब ओक सांगतो. तोही गेल्या दोन वर्षापासून हे काम करतो आहे. यामुळे तुम्हाला घरच्या जबाबदा:याही नीट सांभाळता येतात. आणि चांगलं काम करण्यासाठी मूबलक वेळ मिळतो,असंही हेरंब सांगतो.
डिजीटल मार्केटिंगची तज्ज्ञ असलेली अनघा डोरलीकर सध्या घरूनच काम करते आहे. कधी तुम्हाला काही कारणाने ऑफिसला जाणो शक्य नसेल तर तुमची कंपनी तुम्हाला ते स्वातंत्र्य देते. 24 तासांमध्ये तुम्ही तुमचं काम अगदी कधीही करू शकता. ऑफिसातल्या वातावरणाचं दडपण नसल्यामुळे हेच काम तुमच्या सोयीनुसार जास्त चांगलं होतं. त्यामुळे कंपनीबरोबर स्वत:ची ग्रोथ होण्यास आणि फ्रोडक्टीव्हिटी वाढण्यास मदतच होते. मुल झाल्यानंतर पुन्हा नव्याने काम सुरू करायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे,असं अनघा सांगते.
एकंदरीतच काम कुठलेही आणि कसेही करा उत्तम तेते घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. आणि वर्क फ्रोम होम ला उत्तेजन देऊन या मोठय़ा कंपन्या चांगल्या पगाराबरोबरच क्रिएटिव्हीटीला प्राधान्य देत आहेत. सो या नव्या लाटेवर स्वार व्हायलाच हवे. 
 
- भक्ती सोमण

Web Title: Why do you come to the office? Work from home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.