आर्ट्स का नाही?
By admin | Published: July 2, 2015 03:38 PM2015-07-02T15:38:52+5:302015-07-02T15:38:52+5:30
एकदाचं इंजिनिअर होऊन आयटीत काम, अमेरिकेत संधी हे साचेबद्ध करिअर आता अनेक मुला-मुलींनाही नको आहे, त्यापेक्षा आपल्याला आवडत्या विषयात त्यांना करिअर करून पहायचं आहे.
Next
एकदाचं इंजिनिअर होऊन आयटीत काम, अमेरिकेत संधी हे साचेबद्ध करिअर आता अनेक मुला-मुलींनाही नको आहे, त्यापेक्षा आपल्याला आवडत्या विषयात त्यांना करिअर करून पहायचं आहे.
म्हणून तर नातेवाइकांचा रोष, टोमणो सहन करत पायाखाली न रुळलेली वाट धरत निदान काही थोडेजण तरी आता नव्या वाटेनं निघाले आहेत.आणि त्या वाटेचं नाव आहे, आर्ट्स!
------------------
नव्वद टक्कय़ांपेक्षा जास्त गुण?
आणि आर्ट्सला जातात?
-कशासाठी?
असा रास्त सवाल या अंकातल्या ‘स्कॉलर’ मुलींना भेटून पडूच शकतो. यासा:या हुशार, मात्र त्यांनी ठरवून दहावीनंतर आर्ट्स घेतलं. आपल्या आवडत्या विषयातच शिकायचं, करिअर करायचं असं ठरवून आर्ट्सला गेलेल्या या मुली!
खरंतर दहावीच्या मार्कानी ज्यांच्यावर नव्वद टक्केचा ठप्पा मारला, ज्यांना अत्यंत हुशार अशी पदवी दिली अशा मुला-मुलींना शोधायला आम्ही निघालो होतो. शोधत होतो की, आता या मुलींना पारंपरिक वळणानं न जाता, डॉक्टर-इंजिनिअर-आयआयटी-अमेरिका अशी छापाची स्वप्नं न पडता थेट आर्ट्सला जावंसं का वाटतंय? कुठल्या संधी त्यांना खुणावताहेत? कशाच्या जोरावर त्यांचे आई-बाबाही अभिमानानं सांगताहेत की आमची मुलं आर्ट्स शिकताहेत? कशानं झाला असेल हा बदल?
असे काही प्रश्न घेऊन ऑक्सिजन टीम शोधत निघाली तर या प्रवासात जास्त संख्येनं भेटल्या मुलीच! नव्वद टक्केहून जास्त मार्क पडूनही आर्ट्स घेण्याची हिंमत दाखवणा:या मुलींची संख्या तुलनेनं जास्त होती. आपल्या निर्णयाविषयी बोलल्याही मुलीच जास्त!
या लेखात तुम्हाला मुलांपेक्षा मुलींचीच नावं आणि फोटो जास्त दिसतील त्याचं कारणही आम्हाला या प्रवासात सापडलं!
पण त्याविषयी नंतर बोलू, आता महत्त्वाचं हे आहे की, आम्ही सरळ एक प्रश्न या हुशार मुलींना विचारला की, आर्ट्स का?
उत्तर मिळालं, का नाही?
या सगळ्या मुली सांगत होत्या की, आम्हाला जे विषय आवडत होते तेच विषय आम्हाला शिकायचे होते. दहावीला भरपूर मार्क पडल्यावर सगळे सायन्सला जातात म्हणून आपणही जायचं हा विचारच आम्हाला मान्य नव्हता. नाही म्हणायला थोडं बहुत पिअर्स प्रेशर होतं, काही दोस्त वेडय़ात काढत होते. काहीजण म्हणतही होते की, पस्तावशील. आर्ट्सवाले म्हणजे, त्यांचं काही करिअर होत नसतं! पण तरीही आम्हाला माहिती होतं की आपल्याला जे आवडतं तेच आपण करायचं.
आणि या सा:यात सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे त्यांना या सा:यासाठी काही फार मोठय़ा लढाया लढाव्या लागल्या नाहीत की आई-बाबांशी पंगा घ्यावा लागलेला नाही.
कारण त्यांचे बदललेले आई-बाबा.
ज्यांच्या ज्यांच्याशी आम्ही बोललो त्या सा:या मुलींनी सांगितलं की, आमचे आई-बाबा म्हणाले तुला जे आवडतं ते शिक. आई-बाबांच्या पाठिंब्यामुळेच हा निर्णय सोपा झाला!
आणि दुसरीकडे दिसू लागल्या करिअरच्या क्षितिजावर काही संधी. संस्कृत, जर्मन, मॅँडरीन, जपानी, फ्रेंच आणि इंग्रजी या भाषा, समाजशास्त्र, अर्थशास्त्र यांना उपलब्ध होऊ घातलेल्या नवीन संधी, माध्यमात उपलब्ध होणा:या संवादविषयक कामांच्या संधी हे सारं आता अवतीभोवती घडू लागलं आहे. दुसरं म्हणजे एकदाचं इंजिनिअर होऊन आयटीत काम, अमेरिकेत संधी हे साचेबद्ध करिअर आता अनेक मुला-मुलींनाही नको आहे, त्यापेक्षा आपल्याला आवडत्या विषयात त्यांना करिअर करून पहायचं आहे.
म्हणून तर नातेवाइकांचा रोष, टोमणो सहन करत पायाखाली न रुळलेली वाट धरत निदान काही थोडेजण तरी आता नव्या वाटेनं निघाले आहेत.
आणि त्या वाटेचं नाव आहे, आर्ट्स!
अर्थात हे मान्यच करायला हवं की, असं स्वत:ला एक्सप्लोअर करू पाहणा:या या मुला-मुलींची संख्या तुलनेनं आजही कमी आहे. ही सारी मुलं कदाचित आर्थिक, सामाजिक दृष्टय़ा समाजातील उच्चस्तरातील आहे. त्यांच्या पालकांनाही आता आपल्या मुलांना मोकळं आभाळ देण्याची गरज भासू लागली आहे. अर्थात हा बदल लहानसाच आहे.
पण तो होतो आहे. हुशारीच्या व्याख्या बदलत, अधिक चौकस, अधिक सजगपणो हे तरुण-तरुणी आपलं करिअर आणि शिक्षणाच्या वाटा निवडत आहेत. आणि त्या बदलाच्या वाटेवरचं हे लहानसं पाऊल आहे, 90 टक्केवाल्यांचं आर्ट्सला जाणं!
90 % वाल्या मुली आर्ट्सला जाणा:या मुलीच जास्त; मुलं कमी, असं का?
आर्ट्सला जाणा:या स्कॉलर मुलींमध्ये एकही मुलगा नाही? मुलांवर अन्याय असा प्रश्न अनेक दोस्तांना पडला असेल! आम्हालाही असंच वाटत होतं कारण 90 % गुण असून आर्ट्स घेतलंय अशा मुलीच एकतर जास्त भेटत होत्या.काही मुलं भेटलेही. बोललेही. मात्र त्यांची कहाणी मुलींपेक्षा वेगळी आहे. एकतर आजही मुलानं आर्ट्स घ्यायचं म्हटलं की घरचे विरोधात उभे. दोस्तही वेडय़ात काढतात असं या मुलांचं मत. आणि त्यातही हुशार मुलांनी आर्ट्स घेतलं की हा त्रस जास्त वाढतो.
सगळ्यांचा प्रश्न एकच, आर्ट्स घेऊन करणार काय?
कारण अजूनही सगळ्यांना वाटतं की, आर्ट्स घेऊन करिअरच्या संधी फार नाहीत. स्पर्धा परीक्षांपलीकडे दुसरा पर्याय नाही. मग मुलं करणार काय? नोकरी कशी लागणार? पैसे कसे कमावणार?
काही मुलांनी तर असंही सांगितलं की, नकाच आमची नावंबिवं छापू, उगीच घरचे जास्त भडकतील! आम्ही आर्ट्स घेतलंय हा त्यांना स्वत:चा अपमानच वाटतो. काही मुलांना तर त्यांच्या आई-बाबांनी फोटो काढायला येऊ दिलं नाही, आणि त्याचं नाव छापू नका, असंही सांगितलं!
हे सारं काय असेल असं शोधत गेलं तर लक्षात येतं की, अजूनही आपली समाजमानसिकता तीच आहे.
पुरुषाचं कर्तृत्व पैशात मोजलं जातं. पुरुषानं शिकावं, चांगली नोकरी, घरगाडी-लग्न -सेटल व्हावं या व्याख्या बदललेल्या नाहीत. उलट कदाचित मुलांवर त्याचं दडपण वाढतंही आहे. म्हणून मुलींच्या तुलनेत जास्त गुण कमावणारे मुलं आर्ट्सला कमी जातात, याचाच अर्थ ते ठरलेल्या-मळलेल्या वाटांवरून चालत एक सिक्युअर करिअर शोधतात. आणि त्यांच्या घरचेही त्यांना तसं करायला भाग पाडतात. अर्थात यालाही अपवाद असतीलच! त्याउलट मुली संगीत, नृत्य, भाषा, नाटय़, समाजशास्त्र, या सा:या विषयात नवीन काहीतरी करून पाहण्याची संधी त्यांचे पालक त्यांना देत आहेत. बदल घडतोही आहे आणि नाहीदेखील!!
---------------
‘‘माझे बाबा ड्रॉईंग टीचर असल्यानं लहानपणापासून घरातलं वातावरण वेगळं होतं.
वाचणं-चित्र काढणं मलाही आवडायचं. मी गेल्या पाच वर्षापासून मी भरतनाटय़म शिकतेय. दहावीत जायच्या आधीच मी ठरवलं होतं की, पुढं हे सारं शिकायला मिळेल तीच शाखा निवडायची. म्हणूनच तर बारावी नंतर नाटय़शास्त्रचा अभ्यास करायचं ठरवलंय! खरं सांगू, इतर लोक काय म्हणतात आणि काय करतात याचा विचार करण्यापेक्षा मला जे आवडतं तेच करायचं मी ठरवलं. आणि माङया आई-बाबांनीही त्या सा:याला सपोर्ट केला, म्हणून तर आता मी अकरावीत आर्ट्स घेतलंय!’’
- गिरीजा गोळे, औरंगाबाद
( नुकत्याच दहावी उत्तीर्ण झालेल्या गिरीजाला 94.60% गुण मिळालेत आणि आता तिनं औरंगाबादच्याच देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.)
------------------
‘‘माझे आई-बाबा दोघंही पत्रकार आहेत. त्यामुळे साचेबद्ध शिक्षणापलीकडच्या संधी आणि वाटा मला दिसत होत्या. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र हे विषय मला आवडतात. आपण याच विषयात काहीतरी एक्सप्लोअर करून पाहू असं मी ठरवलं आणि मग आर्ट्स घ्यायचा निर्णय घेतला. करिअर नेमकं कशात करीन हे मी अजून ठरवलं नाही. ते पुढच्या शिक्षणाच्या टप्प्यात ठरेल. सध्या मात्र राज्यशास्त्रत बीए करून मग आंतरराष्ट्रीय संबंध अशा विषयात काम करण्याचं मी ठरवतेय. पण असं पक्कं काही ठरवण्यापेक्षा परदेशी भाषा आणि राज्यशास्त्र या विषयात चांगला अभ्यास करणं हे आता पहिलं महत्त्वाचं वाटतं आहे. ’’
- इरावती सुजाता आनंद
(इरावती पुण्यात फग्यरुसन महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकतेय, तिला दहावीला 93 % गुण होते.)
-------------------
‘‘मला भाषा आवडतात. त्यातही संस्कृत खूप आवडतं. आपल्याकडे अजूनही संस्कृत शिकतात, पण संस्कृतमध्ये फारसं संशोधन झालेलं नाही. मला या विषयात काम करायचं आहे. गणित, खगोलशास्त्र हे सारं संस्कृतमध्ये संशोधन करण्याची माझी इच्छा आहे. जर्मनीत असं संशोधन झालं आहे, म्हणून मी आता जर्मनही शिकते आहे. हे सारं करताना माङया घरच्यांनी मला एकच सांगितलं होतं की, तुला जे करायचं ते कर, पण जे करशील ते पूर्ण करायला पाहिजे. मग काहीपण कर, पण धरसोड करायची नाही. जबाबदारीनं कर!’’
- प्राजक्ता डांगे
(प्राजक्ता मुंबईत रुईया महाविद्यालयात शिकते. तिला दहावीला 91.82 % गुण होते.)
---------------------
‘‘सातवी-आठवीत असतानाच माङया लक्षात आलं होतं की, मला भाषा विषय आवडतात. इतिहास-भूगोल जास्त लाडके आहेत. म्हणून मग मीच दहावीनंतर ठरवलं की आर्ट्सच घ्यायचं. आता मला अर्थशास्त्रत स्पेशलायङोशन करायचंय. मी राज्यशास्त्र पण शिकतेय. आणि जर्मनही शिकतेय. मुख्य म्हणजे मला सायन्समध्ये रस नव्हता, आपण सायन्सला जायचं नाही यावर मी ठाम होते. आणि माङया आई-बाबांचाही त्याला पाठिंबा होता. अर्थशास्त्रत काही करिअर करणं किंवा स्पर्धा परीक्षा देणं, असं काही मी ठरवतेय. पण त्याला अजून वेळ आहे, ते पुढे कळेलच, आता मात्र मी आर्ट्स घेतलंय याचाच मला खूप आनंद आहे.’’
- हर्षदा पवार
(हर्षदा मुंबईत रुईया महाविद्यालयात शिकते. तिला दहावीला 95.64 % गुण होते.)
----------------------
‘‘मी दहावीर्पयत मराठी माध्यमातच शिकले. मला आर्किटेक्ट व्हायचं होतं, पण आर्किटेक्ट व्हायचं म्हणून सायन्सच घ्यायला पाहिजे असं काही राहिलेलं नाही. मला भूगोलही खूप आवडतो आणि गणितही. गणितात तर दहावीत मला पैकीच्या पैकी गुण होते. इतरही छंद, भाषा शिक्षण हे सारं जोपासायचं आणि आवडत्या विषयात अभ्यासही करायचा म्हणून मग आर्ट्सला प्रवेश घेतला. त्यामुळे आता मला अभ्यास करून इतर गोष्टी करायला वेळ असतो. आर्ट्स शाखेत शिकताना अनेक गोष्टी शिकता येतात. विविध विषय अभ्यासता येतात. त्यातलं सौंदर्य शिकता आणि अनुभवता येऊ शकतं. आणि हे सारं करायला माङया घरच्यांनीही सपोर्ट केला म्हणून मी माङो आवडते विषय आनंदानं शिकते आहे.’’
- मधुरा वङो
(मधुरा पुण्यात फग्यरुसन महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकतेय, तिला दहावीत 95.95% गुण होते तर बारावीत तिला 93 % गुण मिळालेत.)
--------------------------
‘‘मुळातच इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, भाषा हे विषय मला मनापासून आवडतात. त्यात मी ठरवलंय की स्पर्धा परीक्षा द्यायच्या. मग त्या परीक्षांसाठी मी कला शाखेत शिकणं हे मला ‘अॅडव्हाण्टेज देतं असं मला वाटतं. अनेक इंजिनिअर्स नंतर या विषयांचा अभ्यास करतात. त्यापेक्षा मी आर्ट्स घेतल्यानं मुळातच माझा बेस पक्का होणार आहे. मी जर्मनही शिकतेय. अवांतर वाचनही खूप करता येतं. माङया आवडीचे विषय आणि मनासारखा अभ्यास हे सारं मला आर्ट्स घेतल्यानंच जमू शकतं असं मला वाटतं. ’’
- मुक्ता देशपांडे, पुणो
(मुक्ता आता प्रथम वर्ष कला शाखेत शिकतेय, तिला दहावीला 90.36% गुण होते.)
-----------------------------
‘‘माझी शाळाच खूप वेगळी होती. टिपिकल घोका-ओका पद्धतीची माझी शाळा नव्हती. मी ग्राममंगलमध्ये शिकले. माङया शाळेत गणित आणि विज्ञान हे विषयसुद्धा जीवनावश्यक विषय म्हणून शिकवले जात. स्वयंपाक, संगीत या सा:या कला म्हणून शिकवल्या जायच्या. आमच्या शिक्षणाचं एकच तत्त्व होतं की, सगळ्या गोष्टी तू करून बघ. जमत नाही असं नाही, जमेल, इम्प्रूव्ह करता येईल. स्वयंपाक-संगीत हे सारं स्वत:ला व्यक्त करण्याची कला म्हणून आम्ही शिकलोय. भाषासुद्धा भाषा म्हणून नव्हे तर संवादाचं माध्यम म्हणून रोज वापरायचं साधन म्हणून शिकलो आहोत. माझं शिक्षण हीच एक आनंददायी प्रक्रिया होती. त्यामुळे माझं मला चौथीतच कळलं होतं की, मला काय आवडतं. त्यामुळे दहावीनंतर आता काय असा काही प्रश्न नव्हता. मी आर्ट्सला जायचं ठरवलंच होतं. माङया आई-बाबांना सांगितलं तर ते म्हणाले, विचार करून बघ, तू शुअर आहेस ना? तू स्वत:ची जबाबदारी घेणार आहेस का? ती घेणार असशील तर तुङया स्वतंत्र निर्णयाला अर्थ आहे. मी म्हटलं आहे, जे होईल ते माझं माझं निस्तरायला मी समर्थ आहे. आता मी आर्ट्सला अॅडमिशन घेतलीय, स्वत:ला एक्सप्लोअर करतेय! म्युङिाक कम्पोजिंगमध्ये काही काम करायचं मी ठरवतेय!’
- आभा घोटीकर
(आभाला दहावीला 83% गुण होते, ती गाणंही शिकते!)