बोलायचं कशाला? कराचंय!
By admin | Published: October 16, 2014 06:49 PM2014-10-16T18:49:53+5:302014-10-16T18:49:53+5:30
मी कॉलेजात जाते. इतरांसारखंच माझं लाईफ. पूर्वी मीदेखील कचरा, कागद वाटेल तिथं टाकायची. पण आता मात्र हाताला सवय लावलीये डस्टबीनमध्येच कचरा टाकायचा
- श्रद्धा तपकिरे, (नांदेड)
मी कॉलेजात जाते. इतरांसारखंच माझं लाईफ. पूर्वी मीदेखील कचरा, कागद वाटेल तिथं टाकायची. पण आता मात्र हाताला सवय लावलीये डस्टबीनमध्येच कचरा टाकायचा. बाहेर वाट्टेल तिथं फेकायचा नाही. मी चॉकलेटच्या रॅपरपासून कागदाच्या चिटोर्यांपर्यंत सगळं बॅगेत घालून घरी घेऊन येते. कचरा असा वाट्टेल तिथं न टाकणं, स्वच्छता पाळणं याविषयी मी आग्रहीच असते. माझ्या मित्रमैत्रिणींनाही आता ते माहिती झालंय. पूर्वी कुणीकुणी हसत; पण आता त्यांनाही यासार्याचा उपयोग पटलाय.
यंदा मी आणखी एक गोष्ट केली. आमच्या घरच्या गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन बादलीतच केलं. इतरांना काही सांगत बसण्यापेक्षा आणि उपदेशाचे डोस देण्यापेक्षा आपणच आपल्याला जमेल ते करावं आणि कामाला लागावं, असं मी ठरवलंय!