रोबोट पोलिसांच्या भरतीमुळे नोकऱ्या जातील कि येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:39 PM2019-02-27T17:39:34+5:302019-02-27T17:56:57+5:30

तरुणाईमध्ये पोलीस अधिकारी बनण्याची क्रेझ खूपच मोठी आहे, पण केरळमध्ये नुकत्याच झालेल्या देशातल्या पहिल्या रोबोट पोलीस अधिकाऱ्याच्या भरतीमुळे तरुणांपुढे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

Will police officers be replaced by robots or more jobs will be created? | रोबोट पोलिसांच्या भरतीमुळे नोकऱ्या जातील कि येतील?

रोबोट पोलिसांच्या भरतीमुळे नोकऱ्या जातील कि येतील?

Next
ठळक मुद्देतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचं याबाबतचं मत आहे, की यामुळे तरुणांनी हवालदिल होण्याचं कारण नाही. तंत्रज्ञान येतं, तसं ते आणखी नोकऱ्या घेऊन येतं. प्रशिक्षित तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी त्यामुळे वाढतेच.

- सोहम गायकवाड
पोलीस, त्यातही पोलीस अधिकारी होण्यासाठी तरुणांमध्ये मोठीच क्रेझ आहे. त्यामुळे त्यासंबंधीत स्पर्धा परीक्षेला बसणाºया तरुणांची संख्याही खूप मोठी आहे.
मात्र आता पोलिस खात्यात थेट रोबोट्सची ‘भरती’ होऊ लागल्याने आपल्या या इच्छेचं काय होणार अशी शंकेची पालही तरुणांच्या मनात चुकचुकते आहे.
याचं कारण आहे, केरळ पालिसांत नुकत्याच भरती झालेल्या एका रोबोट पोलिसाचं. देशातला हा पहिलाच रोबोट पोलीस आहे.
केपी-बॉट असं या रोबोट पोलिसाचं नाव असून थेट पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर या रोबोटची भरती करण्यात आली आहे.
आपले कर्तव्य बजावत असाताना पोलिसांना तर तो मदत करीलच, पण सर्वसामान्य नागरिकांना सहाय्य करण्यासाठीही त्याची मदत होईल.
सध्या तरी केरळ पोलीस हेडक्वॉर्टरच्या फ्रंट आॅफिसमध्ये या पोलीस सबइन्स्पेक्टरची ड्यूटी असेल.
विविध तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचं स्वागत करणं आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना वेगवेगळ्या विभागात पाठवणं, पोलिसांना त्यांच्या कामात सहाय्य करणं हे सध्या या पोलिसाचं काम आहे.
पोलीस दलातल्या या पहिल्या रोबोटचं मुख्यमंत्री विजयन यांनी सॅल्यूट ठोकून स्वागत करताच या रोबोटनंही त्यांना तितकाच कडक सॅल्यूट ठोकला.
या रोबोटचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या अधिकाºयांनाही तो ओळखू शकतो आणि ते समोर आल्यानंतर त्यांना तो सॅल्यूटही ठोकतो.
मुख्य म्हणजे हा पोलीस सब इन्स्पेक्टर एक महिला रोबोट आहे.
रोबोट पोेलिसांच्या भरतीमुळे पोलिसांत जाण्याची इच्छा असणाºया असंख्य तरुणांना मात्र एक शंकाही आता भेडसावते आहे.
या क्षेत्रातही रोबोट्सचा शिरकाव झाल्यावर आमच्या नोकºयांचं काय, पोलीस क्षेत्रातल्या आमच्या नोकºया कमी होतील की काय, अशी शंका अनेक तरुणांनी बोलून दाखवली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचं मात्र याबाबतचं मत आहे, की यामुळे तरुणांनी हवालदिल होण्याचं कारण नाही. तंत्रज्ञान येतं, तसं ते आणखी नोकºया घेऊन येतं. प्रशिक्षित तरुणांसाठी नोकºयांची संधी त्यामुळे वाढतेच. यापूर्वीही ज्या ज्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आलं, त्यावेळी नोकºयांची संधी वाढलीच. या तंत्रज्ञानाशी तरुणांनी आपली जवळीक वाढवली पाहिजे इतकंच. भारतात संगणक आले, त्यावेळीही हीच शंका मोठ्या प्रमाणात व्यक्त केली गेली होती, पण नंतर ती निराधार ठरली. शिवाय पोलिसांत भरती केला गेलेला रोबोट हा प्रतिकात्मक आहे, सगळ्या पोलीस खात्यांत नंतर रोबोट्सच दिसतील असं कदापि होणार नाही.
पोलिसांत भरती झालेल्या भारतातल्या पहिल्या रोबोटमुळे एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट झाली आहे, की तंत्रज्ञानाशी तरुण जेवढं जुळवून घेतील, त्या संदर्भातील क्षेत्राचा जेवढा अभ्यास करतील, त्यात नैपुण्य मिळवतील, त्यामुळे त्यांच्यासाठी संधींची आणखी अनेक दारं खुली होतील.
काही तरुणांनी यासंदर्भात काही मजेशीर शंकाही व्यक्त केल्या आहेत.
पोलीस आणि चिरीमिरी यांचं नातं अतूट आहे असं समजलं जातं. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. आता हा रोबोट अधिकारी पोलीस खात्यातील चिरीमिरीला आळा घालील की तोही चिरीमिरी घ्यायला शिकेल, हे बघायला हवं, असं या तरुणांचं म्हणणं आहे. शिवाय गुन्हेगारी रोखणं, समाजाला शिस्त लावणं, चोरांना हुडकून काढणं, हे पोलिसांचं मुख्य काम, पण या रोबोटलाच जर चोरांनी पळवून नेलं तर?.. अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे!..
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार.)

 

Web Title: Will police officers be replaced by robots or more jobs will be created?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.