तुफानाला भिडण्याचं ‘वेडं’ शहाणपण..

By admin | Published: April 7, 2017 01:04 PM2017-04-07T13:04:21+5:302017-04-07T13:06:36+5:30

मनातली बोच असह्य झाली आणि त्यांनी अगदी छोटीशी नाव विकत घेतली. त्या नावेत बसून समुद्रामार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करायचं त्यांनी ठरवलं

Womens' Wonders of Troubling ... | तुफानाला भिडण्याचं ‘वेडं’ शहाणपण..

तुफानाला भिडण्याचं ‘वेडं’ शहाणपण..

Next

मित्राचं स्वप्न पूर्ण करायला,
एका छोट्याशा बोटीतून
तो निघाला जगप्रवासाला..
वयाच्या पन्नाशीत पोहोचलेले एक महान प्रोफेसर खरं तर विचारवंत लेखकच. त्यांनी खूप नाव कमावलं, त्यांच्या सकस लेखनावर. त्या लेखनातल्या कसदार अनुभवांवर वाचक फि दा होते. पैसा- प्रतिष्ठा त्यांच्या पायाशी लोळण घेत होती, पण तरीही ते तळमळत होते. 
आपण जे लिहितोय ते फार वरवरचं आहे. चौकटी मोडल्याचा दावा करत आपण चौकटीतच आयुष्य जगलो याची खंत होती. मनातली बोच असह्य झाली आणि त्यांनी अगदी छोटीशी नाव विकत घेतली. त्या नावेत बसून समुद्रामार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करायचं त्यांनी ठरवलं. प्रवास सुरु झाला.
सुखासुखी चाललेलं आयुष्य वाऱ्यावर सोडून ‘असं’ धाडस करणाऱ्या प्राध्यापकांचं तमाम लोकांना प्रचंड कौतुक वाटलं. इकडे समुद्री तुफानांचा सामना करत प्राध्यापक फिरत होते.
एक दिवस एका तरुण मुलीनं त्यांना विचारलं..
काय कमवायचंय तुम्हाला? काय सिद्ध करण्याचा अट्टहास म्हणून तुम्ही हे धाडस करताय?
प्राध्यापक हसतच म्हणाले, ‘मूर्खपणा कसा असतो ते मला जगून पहायचंय; म्हणून हा अट्टाहास!’
त्यानंतर प्राध्यापकांनी सांगितली त्यांची गोष्ट. 
ते कॉलेजात असतानाची गोष्ट. 
त्यांचा एक जीवाभावाचा मित्र होता. दोघंही थोडेसे सरफिरेच. त्याचं एक स्वप्न होत; एक छोट्याशा बोटीतून जगप्रवास करण्याचं. काळ बदलला. पैसा-प्रतिष्ठा लेखक होण्याची ओढ या साऱ्यात केवळ हौस म्हणून समुद्रातून जगप्रवास करण्याचं. मूर्ख धाडस प्राध्यापकांना रुचेना. या मूर्खपणाला काही अर्थ नाही, असं त्यांनी मित्राला सांगूनही टाकलं.
प्राध्यापक सांगतात, ‘शहाण्यासारखं’ वागून मी खूप काही कमावलं. पण तरीही सगळ्याला कधीच भिडलो नाही, जो मुर्खपणा मला कळला, पण मी जगलो नाही तो करून पहायचाय. ज्यावेळी मी शहाण्यासारखं सुरक्षित जगत होतो. माझा मित्र एकटाच समुद्रप्रवासाला निघून गेला. एका तुफानात कायमचा हरवला. आता त्याचं स्वप्न पूर्ण करायचंय. मूर्खपणा म्हणूनच!

 

Web Title: Womens' Wonders of Troubling ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.