कोविडकाळात चपलांचं जग बदलायला लागलं आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 06:27 PM2020-08-27T18:27:20+5:302020-08-27T18:28:35+5:30

आर्थिक स्थिती आणि सामाजिक परिस्थिती यांचा फॅशनवर परिणाम होतोच. त्याचंच एक उदाहरण म्हणजे बदलत्या फुटवेअर फॅशन.

The world of footwear is changing in corona time | कोविडकाळात चपलांचं जग बदलायला लागलं आहे..

कोविडकाळात चपलांचं जग बदलायला लागलं आहे..

Next
ठळक मुद्देसाधीसुधी चप्पल

- सारिका पूरकर -गुजराथी

कोरोनाने काय दिलं ? 
- असं कोणी विचारलं तर साहजिकच दोन गोष्टींची नोंद करावी लागेल.
 एक तर बेलगाम धावत सुटलेल्या आपल्या आयुष्याला पॉझ आणि दुसरी गोष्ट म्हणजे संधी. 
संधी कसली तर लहान-लहान गोष्टीत आनंद शोधण्याची. जगण्याच्या सगळ्यात क्षेत्रत हे झालं तर त्याला फॅशन विश्वही कसं अपवाद राहील?
कोविड संकटात झगमगत्या आलिशान मॉल्सना टाळं लागलं. लोक घरातच कोंडले गेले, हातात पैसा कमी तर फॅशनचा विचार कसा करणार?
पण मग तरी जगण्यात रंग तर हवेच, आपल्यालाच छान प्रसन्न वाटावं म्हणून  फॅशनप्रेमींनी घरातच असलेल्या जुन्या अॅक्सेसरीजचा मेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला. जे घरगुती स्वरूपात झालं तेच अनेकांनी आपल्या फॅशन उत्पादनांसंदर्भातही करून पाहिलं.


एक साधं उदाहरण चप्पल..
कोविडपूर्वी सगळ्यांच्या घरचे शू रॅक अगदी ओसांडून वाहताना दिसत होते. घरातील प्रत्येकाचे, प्रत्येक प्रसंगांसाठीचे वेगवेगळे शूज, सॅण्डल्स. म्हणजे मॉर्निग वॉकसाठी वेगळे, ऑफिससाठी वेगळे, लग्नसमारंभासाठी वेगळे, पिकनिकसाठी वेगळे. आवडले की घे असं करत अनेकांनी भरपूर चपला-बुट जमवले.
पण लॉकडाऊन काळात घरात थांबायची वेळ आल्यावर चपलाही रॅकवर शांत पडून होत्या. टाळेबंदीत कोण कशाला घराबाहेर जातंय, टाळेबंदी उठली तरी बाहेर जाण्यावर र्निबध आहेतच. त्यात तरुण मुलांसाठी तर कॉलेज-क्लासेस-कट्टे सगळंच बंद झालं.
मात्र त्यातही काही फॅशनप्रेम असे की घराबाहेर क्वचित पडतानाही त्यांना काहीसं ट्रेंडी, छान लोकांना हवंच होतं. 
त्यामुळे मग या काळात नेहमीच्या चपलेचाही मेकओव्हर झाला.
साधी नेहमीची चप्पल तर आहेच; पण कोरोनाकाळात कम्फर्ट, स्टाइलच्या शोधात असणा:यांसाठी चपलेचा मेकओव्हर होत फ्लिप फ्लॉप, स्लाइड्स, सॅण्डल या पादत्नाणात खूप स्टायलिश पर्याय उपलब्ध होऊ लागले.
हिल्स आणि शूज जरा मागे पडून, साध्या पायाला सुखावणा:या चपला तरुण मुलामुलींमध्येही चांगल्याच हिट होताना दिसत आहेत.
ओपन टो चप्पल (अंगठा असलेली चप्पल ) सध्या नव्यानं बाजारात येते आहे, स्थिरावते आहे.
चप्पल स्वच्छ करायला सोपी तसेच आरामदायी म्हणूनही आता तिची मागणी वाढते आहे.
कॅज्युअल फूटवेअरची चलती कोविड काळात पाहायला मिळत आहे.  फूटविअर पर्सनलाइज्ड होऊ लागले, इनोव्हेटिव्ह होऊ लागले. फर लाइन्ड चप्पल,  क्रॉक चप्पल, फोम क्लॉग, स्लिपर्स हे कोविड काळात जबरदस्त हिट होताहेत. 
हाय हिल्सला अनेकींनी बाय बाय केलेय. त्याचबरोबर लोफर्सलाही नाकारलेय. एक्सपर्ट तर म्हणताय, की हाय हिल्स पुन्हा ट्रेण्डमध्ये येतील की नाही, हीच चिंता वाटतेय.  कोविडमुळे पार्टीज, सेलिब्रेशन, लग्नसमारंभ याला ब्रेक लागल्यामुळे जरदोसी, रेशीम वर्क असलेल्या पार्टीवेअरचीही मागणीही  घटली. 
कोविडकाळात अनेक तरुण-तरुणी हेल्थ कॉन्शस झाल्यामुळे आणि ऑनलाइन व्यायामाचे धडे गिरवत घरच्या घरी व्यायाम करूलागल्याने स्पोर्ट्स शूजची खरेदीही अनेकांनी केली.
फॅशनवर अर्थकारणाचा आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीचाही परिणाम होतो तो असा.
 

Web Title: The world of footwear is changing in corona time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.