येस, LOOK मॅटर्स

By admin | Published: January 2, 2015 03:31 PM2015-01-02T15:31:05+5:302015-01-02T16:13:10+5:30

‘ टॅलण्ट महत्त्वाचं, बाकी सगळं नंतर’ असा खरं तर सुरुवातीचा सूर. पण मग नंतर एकेकजण हळूहळू सांगतो, ‘स्मार्ट दिसलंच पाहिजे, अॅटिटय़ूड आणि स्टाईल पाहिजेच पाहिजे, नाहीतर कोण भाव देणार नाही आपल्याला.’

Yes, look Matters | येस, LOOK मॅटर्स

येस, LOOK मॅटर्स

Next

 दिसणंबिसणं महत्वाचं असतंच का?

 
पागल समजतात का आम्हाला, शाहरूख खान हिरो झाला तेव्हा कुठं होत्या पोरांसाठीच्या क्रीम, काय पण सांगतात, आम्ही काय येडे आहोत का?’
एक मुलगा म्हणाला, तसं सगळे हसले. विषय एका ओळीचा, दिसणंबिसणं फार महत्त्वाचं असतं, आपणही गोरंच व्हायला पाहिजे, असं काही वाटतं का तुम्हाला?
‘ टॅलण्ट महत्त्वाचं, बाकी सगळं नंतर’ असा खरं तर सुरुवातीचा सूर. पण मग नंतर एकेकजण हळूहळू सांगतो, ‘स्मार्ट दिसलंच पाहिजे, अॅटिटय़ूड आणि स्टाईल पाहिजेच पाहिजे, नाहीतर कोण भाव देणार नाही आपल्याला.’
हे म्हणणं सगळ्यांनाच पटतं. आणि मग मुलं मनातलं सांगतात. गालावरच्या एकेका पिंपलपासून डोळ्यावरच्या चष्म्यार्पयत अनेक गोष्टी का छळतात याची उत्तरं मग आपोआप मिळत जातात. 
त्यांचं म्हणणंच सोपं, आपण जर काम एकदम चांगलं करणार असू, जर टॅलेण्टेड असू तर आपण चांगलं दिसलंच पाहिजे. ‘लूक मॅटर्स अ लॉट’. आलिया भट, विराट कोहली ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींर्पयतची उदाहरणं ही मुलं देतात. ही माणसं किती स्टायलिश दिसतात, एकदम स्मार्ट. त्यांच्या लूकमुळेच त्यांचं एकदम खास इम्प्रेशन पडतं. तसं इम्प्रेशन आपलं पडलं पाहिजे. लोकांनी आपल्याकडे पाहत राहिलं पाहिजे असं अनेकांना वाटतं.
विशेष म्हणजे मुलींचा रंगाविषयीचा न्यूनगंड या टीनएजर वयातही जाणवतोच. क्रीम लावून आपला रंग गोरा होणार नाही हे त्यांना कळत नाही असं नाही, पण तरी अनेकींच्या आयुष्यात पार्लरनं स्वत:साठी जागा केली आहेच. अनेक ब्यूटी ट्रिटमेण्ट मुली या वयातही करून घेतात असं दिसतं. त्याचं कारण हेच, आपण सुंदर-स्मार्ट-स्टायलिश दिसणं मस्ट! म्हणून तर चेह:यावरची लव, पिंपल्स, पुढे येणारे दात, हे सारं अनेक मुलांना आपल्या अस्तित्वाचे प्रश्न असल्यासारखे छळत आहेत.‘नव्या काळात प्रॉडक्ट इतकंच पॅकेजिंगही महत्त्वाचं’ असं ही मुलं आपल्याला ऐकवतात, ते का हे समजून घ्यायला तरी हवंच.
---------------------
फेवरिट कोण?
आलिया भट-विराट कोहली
 
फेवरिट कोण?
आलिया भट?
 
आणि हिरो?
फार नाही पण सगळ्यांमधे   वरुण धवन चिकना दिसतो. क्रिकेटर.विराट कोहली.
 
आणखी कोण आवडतं?
बाकीचे म्हातारेच आहेत सगळे.
थोडा थोडा रोहित शर्मा  आवडतो. बाकीचे सगळे ओकेजनली आवडतात. फिल्म्स कम्स अॅण्ड फिल्म गोज. त्यात हिरो-हिरॉईन असं जिवापाड आवडण्यासारखं काय आहे.
पिर चांगला असला, तर आवडतात हिरो-हिरॉईन, नाहीतर काय ओके टाईप्स आहेत सगळे. पण तरी या ‘ओके टाईप्स’मधेपण असतीलच ना कुणीतरी फेवरिट?
असा बराच खल केल्यावर मुलांनाच नाहीतर मुलींनाही आवडणारी आणि एकदम भारी वाटणारी दोन नावं समोर येतात.
1) आलिया भट
2) विराट कोहली.
बहुतांश मुलामुलींना हे दोघं आवडतात?
का आवडतात हे दोघं?
असं विचारलं तर उत्तर एकच येतं, ‘अॅटिटय़ूड’ आवडतो त्यांचा!
काही मुली सांगतात, ‘आलिया आमच्याएवढीच वाटते. एकदम यंग. चिअरफुल. सुंदर. आणि एकदम स्टायलिस्ट. कसला खतरा अॅटिटय़ूड आहे तिचा, तिला लोकांनी डंबो ठरवली पण तिनं ते किती चांगल्या स्पिरीटने घेत स्वत:चं काम सुधारलं. असा अॅटिटय़ूड पाहिजे.
मुलींपेक्षाही मुलांना जास्त आवडतो विराट कोहली.
विराट का? - तर ते म्हणतात. बॅटिंग तर तो चांगलाच करतो, बॅट्समन आहे, बॅटिंग तर चांगली करायलाच पाहिजे. त्यात काही विशेष नाही. पण तो कसला दिसतो, एकदम किलर लूक. एकदम अॅग्रेसिव्ह अॅटिटय़ूड. 
आपलं काम तर चांगलं येतंच, पण जगण्याचा अॅग्रेसिव्ह तरी स्टायलिश अॅटिटय़ूड ही या मुलांना भूरळ पाडणारी गोष्ट आहे.

Web Title: Yes, look Matters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.