..ए वतन तेरे लिए!
By Admin | Published: August 13, 2015 03:22 PM2015-08-13T15:22:36+5:302015-08-13T15:22:36+5:30
देश स्वतंत्र झालाय, पण आपण झालोय का स्वतंत्र? आणि आपल्या आजूबाजूची माणसं? त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढतोय का काळानुरूप नव्या लढाया?
>उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आपल्या कुणाहीसाठी परमोच्च आनंदाचा क्षण. राष्ट्रगीताची धून कानावर पडताच, देशभक्तीनं आपल्यातला रोम रोम जागा होतो.
आपल्या डोळ्यात आनंदाश्रू तुंबळ गर्दी करतात.
आणि ते पाणी डोळ्याआड करत
तिरंग्याला खणखणीत सलाम ठोकताना वाटतं की,
नशीबवान आहोत म्हणून या देशात जन्माला आलो.
भाग्य आपलं म्हणून या मातीत उगवलो,
वाढलो आणि एकेक श्वास जगत फुलतोय.
मात्र.
हे सारं स्वत:शीच कबूल करताना,
भारतमातेला वंदन करताना आपण
कधी विचारतो स्वत:ला की,
आपण काय करतो या देशासाठी?
या देशाचा वारसा डोईवर घेऊन चालताना
आपण कुठली अभिमानाची नवी पायवाट चालतोय?
आणि
देश स्वतंत्र झालाय,
पण आपण झालोय का स्वतंत्र?
आणि आपल्या आजूबाजूची माणसं?
त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण लढतोय का
काळानुरूप नव्या लढाया?
कुठल्या?
आपल्याच जुन्या जातीपातीच्या, भेदाच्या?
घोर अंधश्रद्धांच्या ओङयाच्या?
जुन्या गैरसमजुतींच्या?
नशेच्या विळख्याच्या
आणि त्यातून येणा:या
विपन्नावस्थेच्याही?
या सा:या जाचक बेडय़ातून
आपण कसे स्वतंत्र होणार?
कधी ज्ञानाचा प्रकाश पाहणार?
कधी विचारांच्या
आणि तर्काच्या कसोटीवर
घासूनपुसून घ्यायला शिकणार गोष्टी?
कसं?
हे सारं कसं जमावं?
कशा झुगारता येतील या जुन्या
आणि आपल्याला गुलाम बनवून ठेवणा:या,
असहाय-हतबल आणि तितकंच
परतंत्री बनवून ठेवणा:या गोष्टी?
काही दोस्त शोधताहेत त्याच वाटा,
करताहेत तसे प्रयत्न?
लढताहेत एक नव्याच
स्वातंत्र्याची लढाई.
त्यांच्याशी एक खास भेट.
उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त.
भारतमातेला सलाम करताना,
करता येईल एक वायदा की,
मनावरची, विचारांवरची
जुनाट बंधनं झुगारून आम्ही
विचारांची विवेकी वाट नक्की शोधू.
ख:या अर्थानं विचारी आणि स्वतंत्र होऊ.
प्रयत्न करायला हवा..
मनापासून!!
स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा.
जय हिंद!!
- ऑक्सिजन टीम