तुम्ही हुशारच आहात, पण..

By admin | Published: June 3, 2016 12:15 PM2016-06-03T12:15:17+5:302016-06-03T12:15:17+5:30

हुशार नाही असा मेंदूच निसर्गानं बनवलेला नाही. प्रत्येक मेंदू हुशार असतो, फक्त आपली ‘हुशारी’ कशात आहे, हे आपलं आपल्याला कळलं पाहिजे!

You are clever, but .. | तुम्ही हुशारच आहात, पण..

तुम्ही हुशारच आहात, पण..

Next
>सगळ्यांचा हॉट फेवरिट, गो गेटर महेंद्रसिंग धोनी, त्याचं शिक्षण काय? 
असा प्रश्न आपल्याला पडतो का? 
कारण त्याच्याकडे असलेल्या कुठल्याही पदवीपेक्षा त्याची खेळातली कर्तबगारी श्रेष्ठ आहे. 
 आमिर खानचे सिनेमे आपण बघतो तेव्हा त्याला अमुकतमुक अवघड स्पेलिंग येतात का, पाढे येतात का याचा विचार करत नाही, कारण अभिनय क्षेत्नातली हुशारी त्यानं सिद्ध केलेली आहे. 
श्रेया घोषालची गाणी ऐकावीत. रेहमानचं संगीत ऐकावं. रतन टाटा यांची व्यवसायातली हुशारी ऐकावी. शेतक:यांनी शेतात केलेले प्रयोग बघावेत. पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमध्ये केलेली क्र ांती बघावी. राजेंद्रसिंह यांनी जोहड या पारंपरिक पाणी साठवणुकीच्या पद्धतीचं पुनरु ज्जीवन केलं ते समजून घ्यावं.
अशी किती क्षेत्रं, त्यातली किती कर्तबगार माणसं, त्यांची त्यातली हुशारी, त्यातला अभ्यास हा नियमित पदव्यांच्या पलीकडचा असतो. 
याचाच अर्थ असा की प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्नात हुशार असतो. हुशार नाही असा कुठलाही मेंदू निसर्गानं बनवलेला नाही. 
 
एक नव्हे, आठ बुद्धिमत्ता!
 
प्रत्येक व्यक्तीत एक दोन नव्हे, तर आठ बुद्धिमत्ता कमीअधिक प्रमाणात असतात. यातली आपली बुद्धिमत्ता ज्या विषयात असेल, त्या विषयात आपल्याला रमावंसं वाटतं. त्यातलं काही शिकावंसं वाटतं.
 माणसाच्या बुद्धीकडे बघण्याची संपूर्ण नवी दृष्टी देणारा एक सिद्धांत अमेरिकन न्यूरॉलॉजिस्ट डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी जगाला दिला आहे. हा सिद्धांत आहे द थेअरी ऑफ  मल्टिपल इंटेलिजन्सेस (ळँी 3ँी18 ा ट4’3्रस्र’ी कल्ल3ी’’्रॅील्लूी2). त्यांनी  ‘इंटेलिजन्स’ हा शब्द अत्यंत जाणीवपूर्वक अनेकवचनी वापरला आहे.
काहींना जास्त बुद्धी असते, काहींना कमी बुद्धी असते या पारंपरिक समजालाच या सिद्धांतामुळे धक्का बसला आहे. बुद्धिमत्ता या अनेक असतात. आणि त्या प्रत्येकाकडे असतात. फक्त त्या बुद्धिमत्ता आपल्याला कळल्या पाहिजेत. आपल्या मेंदूत सुप्तावस्थेत काय आहे हे शोधलं पाहिजे.
म्हणजेच आपल्या बुद्धिमत्ता आपणच ओळखल्या पाहिजेत. जी बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे त्या विषयाशी संबंधित अभ्यास जास्त करायचा. तो अभ्यास करणं मेंदूला सोपं जातं. ज्या बुद्धिमत्ता तुलनेनं कमी आहेत त्यांची उणीव भरून काढायचा प्रयत्न करायचा. 
शाळा-कॉलेजमध्ये असेर्पयत वातावरण सुरक्षित असतं. अभ्यासेतर विविध गोष्टींमध्ये ज्यांना रस आहे, त्यांच्यासाठी कॉलेजचं वातावरण जास्त पूरक असतं. आपल्यातल्या कलागुणांना इथे वाव मिळू शकतो. नाटकाची आवड असेल तर नाटय़मंडळं असतात. विविध नाटय़स्पर्धा असतात. संहितालेखन इथपासून ते चित्नकला - शिल्पकला - संगीत - वाद्यवादन -नृत्य इथर्पयत अनेक  कलागुणांना संधी असू शकते. 
ज्यांना खेळांची आवड आहे त्यांना आपली चमक दाखवता येऊ शकते. बैठे खेळ, मैदानी खेळ असतात. काही कॉलेजेसमध्ये एन.सी.सी.ची परेड असते. वेगवेगळे खेळ खेळणारेही कॉलेज लेव्हलच्या स्पर्धामध्ये भाग घेऊ शकतात. कॉलेजची एक टीम असते. त्यातून मुलांना वरच्या स्पर्धामध्ये जायची संधी मिळू शकते. 
समान आवडीच्या मित्नमैत्रिणींचे ग्रुप्स तयार होऊ शकतात. एनएसएस, ट्रेकिंग, नदीस्वच्छता, टेकडीस्वच्छता, गावपातळीवर श्रमदान अशा काही माध्यमातून सामाजिक कामं करण्याची चांगली संधी मिळते. यातून विविध क्षेत्नातल्या सामाजिक कार्यकत्र्याशी ओळख होऊ शकते. समाजकार्याची आवड आपल्याला आहे का हे कळू शकतं.
आयुष्यात घडायला आणि बिघडायलाही हे वातावरण ब:याच अंशी कारण ठरतं. त्यानंतर मात्न आपली इमेज स्वत:च तयार करायची असते. सर्वस्वी नव्या, आव्हानात्मक वातावरणात स्वत:ला सिद्ध करायचं असतं. आणि हे सारं करणं म्हणजेही अभ्यासच असतो.
फक्त परीक्षेपुरता करायचा तो अभ्यास हा समज डोक्यातून काढून टाकला की सतत कराव्या लागणा:या अभ्यासाची सुरुवात होते.
हल्ली ब:याच मुलांचा असा समज असतो की कॉलेजमध्ये काय काहीही केलं तरी चालतं. अभ्यास केला नाही तरी चालतो. नुसतं कॉलेजला जायचं, कॅन्टीन किंवा हॉटेलमध्ये जाऊन गाणी ऐकत टाइमपास केला तरी काही बिघडत नाही. मात्र कॉलेजमध्ये सगळं असंच चालतं अशी ज्यांची कविकल्पना असते, तीच उराशी घेऊन जी मुलं कॉलेजला दाखल होतात ती जसा ग्रुप मिळेल तशी वाहवत जाण्याचा संभव असतो. आणि त्यामुळे आपल्याकडे असलेली बुद्धिमत्ता आपण वापरत तर नाही, आयुष्यच नासवून टाकतो.
अशी नासलेली आयुष्यं आपल्या अवतीभोवती कितीतरी दिसतातच ना?
तेव्हा आपल्याला काय आवडतं, आपली बुद्धिमत्ता नेमकी कशात आहे हे शोधा आणि ती शोधली तर आपल्या करिअरची दिशा ठरवायला सोपं जाईल.
 
 
 
आठ प्रकारच्या  बुद्धिमत्ता कोणत्या?
 
1. भाषिक बुद्धिमत्ता
2. गणिती बुद्धिमत्ता
3. संगीतविषयक
4. निसर्गविषयक
5. शरीरस्नायूविषयक 
6. व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता 
7. आंतरव्यक्ती
8. अवकाशीय बुद्धिमत्ता 
 
 
फिरा. भटका..
 
शिक्षण, कला, खेळ यानिमित्ताने एक ध्येय घेऊन आपल्या गावाबाहेर, परराज्यात अवश्य जावं. केल्याने देशाटन आपापलं क्षितिज नक्की विस्तारतं. चांगल्या- वाईट वाटांवर स्वत:च निर्णय घ्यायला लागतात. नवीन माणसं, नवीन जगणं, नवे विचार कळतात. आपली समज आणि अनुभव वाढतात. हादेखील एकप्रकारचा अभ्यासच, तो कॉलेजात असताना जरूर करावा.
 
- डॉ. श्रुती पानसे
(लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com 
 
 
 
 
 
 
 
 
 

Web Title: You are clever, but ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.