झाडं लावली तुम्ही मग ती जगवणार कोण?

By admin | Published: April 10, 2017 05:51 PM2017-04-10T17:51:35+5:302017-04-10T18:01:42+5:30

एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.

You planted trees, then you will revive it? | झाडं लावली तुम्ही मग ती जगवणार कोण?

झाडं लावली तुम्ही मग ती जगवणार कोण?

Next

दिलीप केने, काटोल

गेले काही दिवस अनेक शहरांत वृक्षतोडीच्या बातम्या येत आहेत..
आणि दुसरीकडे ऊन तापलंय. भाजून काढतं आहे..
पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे असं म्हणता म्हणता ते आपल्याला जाणवतंही आहे..
एकीकडे जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. एवढेच नाही तर मोठी-मोठी महानगरे व कारखाने हेसुद्धा याला हातभार लावत आहेत.
तसं पाहता दरवर्षी नेमानं जिकडे-तिकडे वृक्षारोपण सोहळे साजरे केले जात आहेत. वृक्षदिंडी, प्रभातफेरी यांच्या माध्यमातून शाळा व समाजपातळीवर विविध उपक्रम राबवले जातात. पण एकदा वृक्षारोपण केलं की वर्षभरात किती झाडं जगली याचा आढावा कोणी घेतं का? ती झाडं जगवतो का आपण स्वत:?
प्रत्येक माणसाने एक तरी झाड दत्तक घेतलं पाहिजे. झाडं लावली पण त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडं मरतात, त्यांना पाणी मिळत नाही, कधी-कधी भुकेली जनावरसुद्धा ही रोपं खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांची संख्या फारच थोडी होत आहे. 
या साऱ्याचा आपण कधी विचार करणार?
नुस्ती झाडं लावून उपयोग नाही.
आपण झाडं जगवली पाहिजेत.
आपण पूर्ण क्षमतेनं एक तरी झाड दत्तक घेवून मोठं केलं पाहिजे..
नाहीतर नुस्तं बोलत राहण्याला तरी काय अर्थ आहे?

 

Web Title: You planted trees, then you will revive it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.