.है तुङो भी इजाजत

By admin | Published: October 23, 2014 03:27 PM2014-10-23T15:27:01+5:302014-10-23T15:27:01+5:30

आपण म्हणजे या जगातली असून, नसल्यासारखी, न दिसणारी, मिस्टर अॅण्ड मिस इंडिया गायब जमात आहोत असं मला आता वाटायला लागलं आहे.

You too have permission | .है तुङो भी इजाजत

.है तुङो भी इजाजत

Next
हल्ली मी काही बोलतच नाही,
काय बोलणार?
आपण म्हणजे या जगातली असून, नसल्यासारखी, न दिसणारी, मिस्टर अॅण्ड मिस इंडिया गायब जमात आहोत असं मला आता वाटायला लागलं आहे.
यार, आपण म्हणजे ना आपापलं आडनाव बदलून सदारडे किंवा कुढे असं ठेवून घ्यायला पाहिजे असंही मला वाटतं.
बघा ना, आत्ता हेच बघा.मी हे असं सांगायला सुरूवात केल्याबरोबर तुम्ही इरीटेट झाला असाल, नो रोनाधोना प्लीज असा एक भाव तुमच्या चेह:यावर नकळत उमटून गेला असणार.
 
******
खरंय पण मी काय करू यार,
या ताईच्या बांगडय़ा टाईप आयुष्याचं.
जबाबदा:याच इतक्या अंगावर पडलेल्या आहेत की, जवानी दिवानी तुफानी करण्याचा काही चान्सच मला मिळाला नाही.
कॉलेजात असताना वाटायचं की, केलंच कुणी प्रपोज तर म्हणावं ‘हो’. त्याच्या बाईकवर बसून यावं मस्त फिरुन.
बरं, आम्ही संधीपासून वंचित असंही काही नाही.
म्हणजे विचारलंही एकादोघांनी पण माङो संस्कार आणि घरच्यांचा धाक दोन्हीही आडवे आले आणि इच्छा असूनही  मी ‘नाही’ म्हणाले.
कारण तेच, आपण शिकायला हवं. ते कशासाठी तर नोकरीसाठी? नोकरी कशासाठी? तर वडिलांनी मुलगी असूनही आपल्याला पोटाला टाचे देऊन शिकवलं, आपण नाठाळपणा करुन कसं चालेल.
तो विश्वासघात करणं अवघड होतं कारण मीच असं उठवळ वागले असते तर माङया पाठीवरच्या दोन बहिणींचंही शिक्षण खोळंबलं असतं, नव्हे बंदच झालं असतं.
मग काय वागा ‘शहाण्यासारखं’.
वागले.
ठरल्यावेळी कॉलेजात जायचं. नाकासमोर वर्गात शिरायचं. सगळी लेर कितीही बोअर झालं तरी मुकाट करायची. मग पुन्हा नाकासमोर वाट धरुन घरीच यायचं.
आलं की करा घरकाम.
त्यात कायम तू मोठी, तू समंजस हे पालूपद चिकटलेलंच.
धाकटय़ा भावंडांना वांडपणा करायची मुभा होती.
पण मी तसं करुन चाललं नसतं.
हे सतत ‘मोठेपणाचं’, ‘समंजसपणाचं’ आणि समजून घ्यायचं ओझंच मी वाहवत बसले.
 
******
आता मात्र मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, हे असं स्वत:लाच जबाबदा:यांत गुंडाळून हात बांधून घेणं खरंच गरजेचं होतं का?
म्हणजे वर्गात बसल्यानं, लेर केल्यानं, प्रेमात न पडल्यानं काही बिघडलं नाही. उलट फायदाच झाला.
नोकरी चांगली मिळण्याची शक्यता निर्माण झाली. आईबाबांनाही माझा अभिमानच वाटतो.
पण मग तरी मनातल्या मनात मला काय खातंय?
का मी कुढतेय?
आपण काय मिस केलं असं मला वाटतंय?
आणि ते मिस करण्याचा, कॉलेज लाईफ भरपूर न जगण्याचा, वयाप्रमाणो न वागण्याचा दोष मी कुणाला देतेय.?
घरच्यांना? परिस्थितीला? नशिबाला? की स्वत:ला?
 
******
खरंतर हा दोष मी स्वत:लाच द्यायला हवा असं नाही वाटतं?
म्हणजे आता मागे वळून पाहिल्यावर मला वाटतं दोष माझाच आहे, माङया विचार करण्याच्या पद्धतीचा आहे.
मीच स्वत:वर बंधन घातली.
माङया वयाप्रमाणो वागता मलाही आलं असतं.
मित्रमैत्रिणींबरोबर इतरजण करतात तशी माफक मजा करता आली असती.
खूप वाचता आलं असतं.
आवडीचं काम करता आलं असतं.
घरच्यांना सांगून, अभ्यास करुनही अनेक गोष्टी करत मला स्वत:ला मोकळं सोडता आलं असतं.
 
******
तसं मी केलं नाही.
मीच माङयाभोवती कुंपण घातलं आणि न झालेल्या वाढीचा दोष इतरांना माङयाही नकळत दिला.
 
******
एनीवे, आजवर जे झालं ते झालं.
आता मात्र मी ठरवलंय हसायचं खळखळून, बोलायचं.
कुढायचं नाही,
जे जमत नाही, जमणार नाही ते मन मारुन करण्यापेक्षा त्याला ‘नाही’ म्हणून बघायचं.
आणि स्वच्छंदी, मनापासून जगायचं.
 
******
हो, मनापासूनच जगायचं.
छान हसरं आयुष्य हवंय मला.
याचा अर्थ असा नाही की, माङयावरच्या जबाबदा:या कमी होती, ताण सरतील, अपेक्षा कमी होतील.
याचा अर्थ एवढाच की,
त्या सगळ्याचं ओझं घेऊन मी जगणार नाही.
माझं जगणं माङयासाठी भार होणार नाही.
जिंदगी का साथ निभाते चलेंगे यार.
जो भी मिले.खुशी से लेंगे.
-खुशी से जियेंगे भी.!
मेट्रोतले ते गाणं म्हणून मला फार आवडतं,
जे सांगतं,
है तुङो भी इजाजत
तू ख्वाब सजा.
तू जी ले जीरा.
 

 

Web Title: You too have permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.