आपण आपला मोर
By Admin | Published: October 27, 2016 03:57 PM2016-10-27T15:57:43+5:302016-10-27T15:57:43+5:30
आपल्याला मोर हवा तर आपण मोर व्हावं.. हे वाक्यं ऐकलं, वाचलेलं असतं आपण.. पण ते मोर होणं जमत नाही.. का?
आपल्याला मोर हवा तर आपण मोर व्हावं.. हे वाक्यं ऐकलं, वाचलेलं असतं आपण.. पण ते मोर होणं जमत नाही.. का? कारण उगाळत बसतो ना आपण आपल्याला जे नक्कोनक्कोसं वाटतं तेच.. आणि मग जे घडू नये असं वाटतं, तेच घडतं.. कारण आपण तेच चिंतित राहतो, तेच घडतंय अशी चित्रं डोळ्यासमोर उभी करतो, आणि वाईट घडलं की स्वत:ला पुन्हा सांगतो की, मला वाटलंच होतं की, वाईटच घडणार आहे माझ्याबाबतीत.. मग याउलट केलं तर? जे आपल्याला हवं, जे व्हायला हवं ते मनासमोर चित्र काढून ठेवावं.. पहावं स्वत:ला जिंकताना. हसताना. नाचताना. खूप यशस्वी होताना, लोकांनी आपलं कौतुक करताना आपला पेप्रात प्रसिद्ध झालेला फोटो पाहताना.. आपल्या माणसांनी आपल्याला मायेनं पोटाशी धरताना.. असे किती प्रसंग.. किती क्षण.. ते आपण डोळ्यासमोर कायम ठेवावेत आणि मग मेहनत करावी जे आपण पाहिलं आहे, ते प्रत्यक्षात येताना.. अवघड नाही हे फार.. करून पहा.. जगून पहा.. कारण, सेलिब्रेट व्हॉट यू वॉण्ट टू सी मोअर आॅफ...