आईवडिलांच्या जिवावर सतत मजा मारणारं तारुण्य, बाहेरच्या जगात लढाईच का हरतं आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 03:31 PM2019-08-22T15:31:58+5:302019-08-22T15:32:40+5:30
स्वतंत्र दिसणारी तरुण मुलं प्रत्यक्षात बांडगूळ होऊ लागली आहेत का?
विकास बांबल
मी ‘वक्त’ नावाचा एक हिंदी चित्नपट बघितला होता, ज्यामध्ये अक्षय कुमारने मुलाची तर अमिताभ बच्चन यांनी वडिलांची भूमिका निभावली. फार देखणा आणि मार्मिक सिनेमा. तर त्या चित्नपटात वडील खूप कष्टानं श्रीमंत झालेले असतात. आपल्या मुलाला त्रास नको म्हणून ते मुलाचे एवढे लाड करतात की मुलाचे पाय दुखायला नकोत म्हणून प्रसंगी मुलाला पाठीवर घेऊन फिरतात. त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून स्वतर्च अभ्यास करून देतात. त्याचे सगळे लाड पुरवतात. त्याला त्नास होऊ नये, जास्त श्रम पडू नयेत म्हणून प्रत्येक गोष्ट स्वतर् करतात.
मग मुलगा जसा जसा पुढे मोठा होतो तसा तो वडिलांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. वडीलसुद्धा आता उतरतीला आलेले असतात, त्यांच्याकडून आधी सारखं त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करणं जमत नाही.
मुलगा खूपच परावलंबी झाला म्हणून वडिलांना राग येतोय. स्वतर्चे कामदेखील त्याला स्वतर्ला करता येत नाही, लगA करून येतो तर बायकोची आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही. म्हणून वडील चिडतात. आपल्या पश्चात या मुलाचं कसं होणार, कसा हा स्वतर्च्या पायावर उभा राहणार असं वाटून छातीवर दगड ठेवून मुलाला घराबाहेर काढतात.
त्यातून त्यांच्यात रागलोभ होतात. पण मुलगा स्वतर्च्या पायावर उभं राहायला शिकतो.
म्हणायला हा सिनेमा असला तरी आपल्या अवतीभोवती हे दृश्य आपण कमीअधिक फरकाने पाहतोच आहोत. वयाची पंचविशी येते तरी मुलं आपल्या पालकांवरच अवलंबून दिसतात.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
‘मुलगा होतो ठोंब्या-भोपळ्या, अतिलाडाने निकामी !’
तेच होतं आहे का अवतीभोवती? पालक मुलांचे इतके लाड करतात, त्यांना त्रास नको म्हणून स्वतर् इतका त्रास करून घेतात, की मुलांना त्याची जाणीवही नसते. मुलांना सर्व आयतं देऊन त्यांची संघर्ष करण्याची शक्ती हिरावली जाते. कुंभार मातीच्या मडक्याला राग येतो म्हणून वरून चापट मारत नाही, किंवा एखादा शिल्पकार वेडा झाला म्हणून दगडाला हातोडय़ाने मारत नाही, तर कुंभाराला टिकाऊ मडके आणि शिल्पकाराला सुंदर शिल्प घडवायचे असते.
अशीच एक गोष्ट माझ्या वाचनात आलेली होती त्यामध्ये एका रस्त्यावरून एकाच कॉलनीमध्ये राहणारे श्रीमंत व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणारा नोकर हे दोघेही घरी लावण्यासाठी रोपवाटिकेतून लहान रोप आणतात.
श्रीमंत व्यापार्याच्या घरी उत्तम निगराणी, सर्व मुबलक त्यामुळे बाल्कनीत ठेवलेल्या कुंडय़ामधील झाडांना वेळोवेळी मुबलक विकत आणलेले खत आणि पाणी दिले जात होते.
ऊन आले की सावलीत ठेवणं, पाऊस आला की घरात ठेवणं अगदी वातानुकूलित वातावरणात ते झाड वाढत होते.
याउलट त्या नोकरांच्या घरी खाली जमिनीत ते झाड लावलं, त्याला विकतचे खत आणणे परवडणारे नव्हते म्हणून शेणखत वापरून त्याची निगराणी ठेवली जात होती.
ऊन, वारा, पाऊस यामध्ये ते झाड जगण्याचा प्रयत्न करत होते. एकाच दिवशी आणलेली झाडे; पण व्यापार्याचे झाड उत्तम बहरले, दिसायला सुंदर याउलट स्थिती नोकराच्या घरच्या झाडाची होती.
वर्ष दोन वर्षे गेली,
एके दिवशी सोसाटय़ाचा वारा आला, व्यापार्याच्या घरातील झाड कुंडीमधून पूर्णपणे उखडून वार्याबरोबर उडून गेले; पण नोकराकडील झाड तग धरून जमिनीत आपली पाळंमुळं रोवून घट्ट उभे होते.
हाच फरक मुलांमध्ये असतो, असं म्हणतात. मातीत खेळलं नाही, उन्हात फिरलं नाही, पावसात भिजलं नाही, थंडीत त्रास झाला नाही, स्वतर्च्या कष्टानं काही कमावलं नाही तर शेवट काय होणार, एकतरी परावलंबी तरी होणार नाही तर बांडगूळ तरी ! आईवडिलांची साथ असणं वेगळं आणि त्यांच्याच जिवावर तरुणांनी मजा मारणं वेगळं.
अवतीभोवती सध्या चित्र असं आहे की, अनेक मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांची एकतर जाणीव नाही आणि त्याची कदरही नाही. त्यामुळे बाहेरच्या जगात जेव्हा ते एकटय़ानं काही करू पाहतात, तेव्हा हरतात. किंवा लढण्यापूर्वीच शस्रं टाकून देतात.
हे असं होणं किती वाईट आहे.