काम करणारे तरुण हात

By admin | Published: January 22, 2015 07:21 PM2015-01-22T19:21:30+5:302015-01-22T19:21:30+5:30

येत्या वर्षभरात जगाच्या एकूण कार्यरत मनुष्यबळापैकी म्हणजे वर्कफोर्सपैकी तब्बल 25 टक्के मनुष्यबळ भारतीय असेल! जाणकारांचा दावा तर असंही म्हणतो की, आज जगातल्या एकाही देशातली एकही मल्टिनॅशनल कंपनी अशी नसेल; जिथे भारतीय माणूस काम करत नाही!

Young hand working | काम करणारे तरुण हात

काम करणारे तरुण हात

Next

विश्वास ठेवणं अवघड आहे; पण हे खरंय!

येत्या वर्षभरात जगाच्या एकूण कार्यरत मनुष्यबळापैकी म्हणजे वर्कफोर्सपैकी तब्बल 25 टक्के मनुष्यबळ भारतीय असेल! जाणकारांचा दावा तर असंही म्हणतो की, आज जगातल्या एकाही देशातली एकही मल्टिनॅशनल कंपनी अशी नसेल; जिथे भारतीय माणूस काम करत नाही!
एकीकडे भारतात सतत सव्र्हे प्रसिद्ध होत असतात की, भारतीय उमेदवार हे नोकरीसाठी डिग्री घेऊन ‘पात्र’ असले तरी ‘लायक’ नाहीत. पुस्तकी ज्ञान आहे, पण प्रत्यक्षात काम येत नाही; मात्र सुधारणोला प्रचंड वाव असूनही भारतीय मनुष्यबळानं जगाच्या पटलावर उमटवलेला आपल्या गुणवत्तेचा ठसाही चांगलाच ठळक आहे!
‘अभ्यास करा; नाहीतर भारत आणि चीनमधले तरुण उद्या तुमच्या नोक:या पळवतील’ असं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीच अमेरिकन मुलांना बजावलं होतं; अशा आशयाच्या बातम्याही आंतरराष्ट्रीय मीडीयात ब:याच गाजल्या.
जगभरातल्या अर्थव्यवस्थांचं कंबरडं जागतिक मंदीनं मोडलेलं असताना त्या मंदीचा तडाखा बसूनही  भारतीय अर्थव्यवस्था ब:यापैकी स्थिर राहिली. जगभरातली सगळ्यात प्रभावशाली उदयोन्मुख  अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जाऊ लागलं आहे.
जगातली सगळ्यात वेगानं विस्तारणारी, फास्टेट ग्रोइंग इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड म्हणून या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा उल्लेख होतो आहे.
काही कोटी माणसं ज्या देशात राहतात आणि त्यापैकी काही कोटी माणसं काम करतात; त्या प्रचंड मनुष्यबळाचा आवाका नक्की केवढा मोठा आहे, याची एक झलक म्हणजे भारतीय रेल्वे.
जगातली सर्वाधिक नोक:या देणारी संस्था म्हणून भारतीय रेल्वेचा उल्लेख होतो. देशभरातल्या सुमारे दहा लाखांहून अधिक लोकांना भारतीय रेल्वे नोक:या देते.
जे चित्र देशात दिसतं, तेच आज परदेशातही दिसतं आहेच.
भारतीय मनुष्यबळाच्या गुणवत्तेचं, कल्पकतेचं आणि कठोर मेहनतीचं कौतुक जगभर होत असताना आकडेवारीवर नजर टाकली तर तरुण भारतीय वर्कफोर्सच्या झपाटय़ाचं आकलन सहज होईल.
म्हणून ही एक धावती झलक, भारतीय वर्कफोर्सची.
जिकडे जाल तिकडे इंडियन टॅलेण्ट
 
ही एक यादी : नामवंत कंपन्यांमध्ये भारतीय अगर भारतीय वंशाच्या मनुष्यबळाचं प्रमाण किती मोठं आहे, हे सांगणारी.
* अमेरिकेतलं वैद्यकीय क्षेत्र -  38 % डॉक्टर्स
* अमेरिकेतचं संशोधन क्षेत्र - 12% शास्त्रज्ञ
* ‘नासा’ही अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था - 36% कर्मचारी 
* मायक्रोसॉफ्ट -34% कर्मचारी 
* आयबीएम - 28% .
* ‘इंटेल’ - 17% कर्मचारी 
* ‘ङोरॉक्स’- 13% कर्मचारी 
 
 
***
नुस्ता पैसाच नाही,
 
मतं आणि निर्णयही!
* जगभरातल्या पहिल्या 5क्क् फायनान्शियल ब्रॅण्डसमध्ये भारतीय बॅँकाचा समावेश होतो.
* लक्ष्मी मित्तल आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांचा समावेश ‘वर्ल्डस मोस्ट पॉवरफूल बिलियनर्स’मध्ये होतो. याचा अर्थ असा की, नुस्ता पैसाच नाही, तर त्यांच्या निर्णयाचे, मतांचे परिणाम देश-विदेशातील अधिकारपदाच्या व्यक्तींवर होतात. 
* टाटा ग्रुप, स्टेट बॅँक ऑफ इंडिया, इन्फोसिस टेक्नॉलॉजी यांच्यासह 17 भारतीय कंपन्यांचा समावेश पारदर्शक व्यवहार आणि धोरणांसाठी प्रसिद्ध असलेल्या जगातल्या पहिल्या 5क् महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये केला जातो.
* भारतातल्या ‘एसईङोड’मधून होणा:या निर्यातीत गेल्या 5 वर्षात 25 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वाढ झाली आहे.
 
***
* भारतीय सैन्यदलांचा गौरव जगातली दुस:या क्रमांकाची सेना म्हणून केला जातो. राखीव दलांचा समावेश करून सुमारे 3क्लाख सैन्य भारताकडे उपलब्ध आहे. ते ही एक प्रकारचं मनुष्यबळच. 
*जगात सर्वाधिक शस्त्रस्त्र खरेदी करणा:या देशातही भारत आघाडीवर आहे. गेल्या दशकभरात भारतानं 5क् अब्ज डॉलर्स इतका पैसा शस्त्रखरेदीवर खर्च केला आहे. * अर्थात असं असूनही गेल्या एक हजार वर्षात भारतानं कुठल्याही देशावर हल्ला केलेला नाही. 
 
निम्म्या स्टार्ट-अप्स
भारतीय तरुणांच्या!
* अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली आणि वाशिंग्टनमध्ये सध्या कार्यरत असलेल्या एकूण स्टार्ट-अप्सपैकी 49% स्टार्ट-अप्स (संपूर्णत: नव्याने सुरू झालेल्या कंपन्या) भारतीय किंवा भारतीय वंशाच्या अमेरिकन तरुणांनी सुरू केलेल्या आहेत. स्टार्ट-अप म्हणजे असा छोटा उद्योग ज्यातली आयडिया ही अत्यंत नवीन, मार्केटेबल आहे. अशा स्टार्ट-अप म्हणूनच नवनवीन बडय़ा कंपन्या हल्ली उदयास येतात. सध्या प्रचंड लोकप्रिय असलेलं व्हॉट्स-अॅप हे एक प्रकारचं स्टार्ट-अपच होतं. अशा अनेक स्टार्ट-अप सुरू करणा:यांमध्ये भारतीय तरुण इंजिनिअर्स, संशोधक, एमबीए यांचं प्रमाण मोठं आहे.
 
 
***
छुपं ‘तरुण’अस्त्र
 
* तरुण मनुष्यबळ ही आजच्या भारताची खरी ताकद आहे.  हे मनुष्यबळच भारताचं नव्या जगातलं सिक्रेट वेपन म्हणजे छुपं अस्त्र असेल.
* 2020 र्पयत भारताकडे 20 ते 24 या एवढय़ाच वयोगटातलं मनुष्यबळ असेल  11 कोटी 60 लाख इतकं!  
* अमेरिकेच्या मनुष्यबळाचं सरासरी वयोमान असेल 40 वर्षे, जपानचं 46 वर्षे, चीनचं 50 वर्षे, तर भारतातलं असेल फक्त 29 वर्षे.
* जगातलं सर्वाधिक तरुण मनुष्यबळ फक्त भारताकडेच उपलब्ध असेल आणि त्याची संख्याही इतर तरुण देशांपेक्षा जास्त असेल.
* जगात सर्वाधिक इंग्रजी बोलू शकणा:यांचा हा तरुण देश, त्यामुळे जगभरात संपर्काचं एक जास्तीचं स्किल या मनुष्यबळाकडे उपलब्ध असेल.
 
 
.. पण तरीही !
 
 
* देशभरात काही लाख लोक लखपती असताना आजही 29.8 % लोक दारिद्रय़रेषेच्या खालचं जीवन जगतात.
 
* एकीकडे तरुण होत असलेल्या देशाचं कौतुक चाललेलं असताना दुसरीकडे देशात आजही 48 % मुलांची वाढ खुंटलेली आहे, त्यातली निम्मी मुलं तर कुपोषितच आहेत.
*  ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार उपासमारीचा सामना करणा:या माणसांची जगभरातली संख्या आहे 84 कोटी 20 लाख. त्यातले 2 कोटी 10 लाख लोक भारतात उपाशी आहेत.
 

 

Web Title: Young hand working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.