‘सिस्टीम’ला तरुण धक्का

By admin | Published: January 22, 2015 07:26 PM2015-01-22T19:26:57+5:302015-01-22T19:26:57+5:30

खरं तर या देशात कसलंही जनरायङोशन अवघड आहे, अगदी तरुण मुलांचे प्रश्न आणि पर्सनॅलिटी यांच्यातही अनेक ठिकाणी जमीन-अस्मानाचं अंतर पडू शकतं. पडतंच!

Young push to 'system' | ‘सिस्टीम’ला तरुण धक्का

‘सिस्टीम’ला तरुण धक्का

Next
>‘तरुण’ देश.
तरुणांचा देश या संकल्पनेचं एवढं कौतुक कशाला?
तरुण मुलं काय एवढे दिवे लावताहेत?
- असे प्रश्न नेहमी विचारले जातात; पण जगभरातल्या देशांना या ‘तरुण’ देशात काय दिसतं?
कसा दिसतो इथल्या तारुण्याचा स्वभाव?
खरं तर या देशात कसलंही जनरायङोशन अवघड आहे, अगदी तरुण मुलांचे प्रश्न आणि पर्सनॅलिटी यांच्यातही अनेक ठिकाणी जमीन-अस्मानाचं अंतर पडू शकतं. पडतंच!
जगभरातल्या समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने भारतातली तरुणपिढी हा कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. इंटरनेटवर थोडी शोधाशोध करून पाहिलं, तर भारतातल्या तारुण्याबद्दल हे अभ्यासक काय विचार करतात, हे वाचायला मिळतं. त्यांच्या नजरेतून भारताकडे पाहिलं, तर इथल्या तारुण्याचे तीन महत्त्वाचे स्वभाव दिसतात-
 
1 ) समंजस स्वीकार
शाळेतच शिकवली जाते प्रार्थना, ‘सारे भारतीय माङो बांधव आहेत’. मोठं होता-होता विचार बदलतात, काहींचे चष्मे बदलतात, काहींच्या डोळ्यावर झापडंही चढतात; मात्र तरीही जगभरातल्या तमाम तारुण्याइतकं ‘एकारलेपण’ भारतीय तारुण्यात दिसत नाही. एकतर लहानपणापासून अठरापगड जाती, धर्म, विचारसरण्या, मतंमतांतरं, यातून अनेक गोष्टी कानावर पडत असतात, अवती-भोवती दिसत असतात. शरीराच्या ठेवणीपासून जातीधर्मार्पयत आणि भाषांच्या विविधतेपासून खाण्या-पिण्यार्पयत इतकं पराकोटीचं वैविध्य या देशात आहे की, परस्परांसोबत जगायचं तर एकमेकांना सांभाळून घेत आहे तसं स्वीकारणं हाच समंजस मार्ग असतो. 
ज्या देशात तरुणांची प्रचंड संख्या आहे, त्या देशात इतका सहिष्णुभाव ही जगभराच्या दृष्टीनं अप्रूपाची गोष्ट आहे.
 
2) रस्त्यावरचा संताप, पण विखार नाही!
गप्प बसणं हा भारतीय तारुण्याचा स्वभावच उरलेला नाही. सरकार करेल, कोणीतरी आपल्यासाठी भांडेल हा काळ मागे पडला. आता फेसबुक, व्टिटर, ब्लॉग, यूटय़ूब अशा अनेक मार्गानी हे तारुण्य ‘बोलू’ लागलंय. नियमावर बोट ठेवत कायद्यानं न्याय मागतंय. रस्त्यावर उतरतंय. 
-असं असलं तरीही या देशात अनागोंदी माजलेली नाही, देशातील तारुण्यानं देशातली व्यवस्था मोडीत काढलेली नाही. उलट त्या व्यवस्थेला अधिक प्रभावीपणो काम करायला भाग पाडलं आहे. जेसिका लाल हत्त्याकांड, निर्भया, मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, भ्रष्टाचारविरोधी लढा यासा:या चळवळीत तरुणांचा लक्षणीय सहभाग दिसला. त्यातून यंत्रणावर दबाव वाढला आणि अधिक सक्षम व्यवस्था देशात लागू होण्याची निदान सुरुवात तरी झाली.
 
3) यंत्रणोला जोरदार धक्का.
 
तरुण म्हणजे बंडखोरी हे सूत्र. मात्र, असं असलं तरी या देशात तरुणांनी बंड केलं आहे, बंडखोर हाती बंदुका घेऊन आपल्याच सरकारवर चालून गेलेत असं चित्र सरसकट दिसत नाही, याबद्दल परदेशी अभ्यासक सातत्याने लिहिता-बोलताना दिसतात. अर्थात नक्षलवादासारखे प्रश्न देशात असले, तरी अशा उठावांना सरसकट पाठिंबा मिळालेला नाही, हे या अभ्यासकांना विशेष महत्त्वपूर्ण वाटतं. 
 बहुसंख्य तरुण अनेक ठिकाणी, विशेषत: खेडय़ा-पाडय़ात यंत्रणा उत्तम काम कशा करतील, त्यातील दोष दूर होऊन अधिक सक्षम कारभार कसा होईल, यासाठी प्रयत्न करताना दिसतात. माहिती अधिकार, तंत्रज्ञान, ऑनलाइन सरकारी कारभार यातून आता अधिक पारदर्शी कारभाराला मदत होत आहे. तरुणांच्या हातात आलेल्या तंत्रज्ञानानं यंत्रणांना जागं करायला सुरुवात केली आहे. लोकशाही राष्ट्रात आजचा तरुण भारतीय नागरिक सहभागातून लोकशाही कारभार हे नवीन सूत्र रूजवायला सुरुवात करत आहे.
 
भारतातली 65 % जनता  35 वर्षे वयाच्या आतली आहे.
 
**
भारतातली 50 % म्हणजे निम्मी लोकसंख्या 25 वर्षे वयाच्या आतली आहे.
 
**
10 ते 24 या वयोगटात 35 कोटी 60 लाख  इतकी लोकसंख्या आहे.
 
***
भारतात आज कुठल्याही शहरात गेलात तर तुम्हाला भेटणा-या दर तीन माणसांत
एक व्यक्ती तरुण असेल.
 
***
नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 18 ते 23 वयोगटातल्या 15 कोटी तरुणांनी पहिल्यांदा मतदान केलं. युरोपातले अनेक देश एकत्र केले, तरी एवढी लोकसंख्या होत नाही. इतका हा आकडा मोठा आहे. या नवमतदारांचीच मतं निवडणुकीत सत्ताबदलास कारणीभूत ठरली. देशातलं तख्त बदलवण्याची ताकद  या फस्र्टटाइम व्होटर्सनी सिद्ध केली.
 
***
भारतातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 9क्,क्क्क् तरुण मतदारांनी गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केलं. तरुण म्हणजे ज्यांचं वय 18 ते 22 या दरम्यान आहे.
***
 ज्यांनी पहिल्यांदा आपली नावं मतदार यादीत नोंदवली त्यांची संख्या साधारण 1.79 लाख इतकी होती. त्यापैकी 43 हजार नवमतदार हे 18 ते 19 वयोगटातले होते.
***
या नवीन मतदारांचं वैशिटय़ म्हणजे त्यांच्यावर भूतकाळाचं कोणतंही ओझं नव्हतं.
ना ते कुठल्या विचारसरणीशी बांधलेले होते.
भूतकाळ सोडा, भविष्यात काय कराल हे सांगा, असं म्हणत त्यांनी देशाच्या विकासासाठी मतदान केलं.
भारतीय तारुण्य प्रॅक्टिकल होत, विकास आणि प्रगती या दोन सूत्रंभोवती आपलं जगणं गुंफताना दिसतं.
 
पण तरीही.
* आजही आपल्या देशात अपंगांचे प्रश्न गंभीर आहेत.  या देशात 2 कोटींहून अधिक लोक अपंगत्वाच्या प्रश्नांशी आणि सुविधा नसल्यानं येणा:या समस्यांशी झगडत आहेत.
 
*  रस्त्यावर राहणा:या, निराधार मुलांचा प्रश्नही देशात गंभीर आहे.  रस्त्यावर राहणारी 35} मुलं व्यसनाधिन झालेली आढळतात.
*  झोपडपट्टीत राहणा:या माणसांची संख्या या देशात वाढते आहे. नागरी सुविधांच्या प्रचंड अभावात ही माणसं जगतात. मुंबईसारख्या शहरात दर सहावा माणूस झोपडपट्टीत राहतो.

Web Title: Young push to 'system'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.