लुकाशेंको गो अवे! बेलारूसच्या राजधानीत तरुण रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:36 PM2020-08-20T16:36:35+5:302020-08-20T16:44:13+5:30

बेलारूसच्या राजधानीत तरुण रस्त्यावर उतरले आहेत, 25 वर्षे देशाचे सत्ताधीश असलेल्या राष्ट्रपती लुकाशेंकोच्या विरोधात आंदोलन करत ते लोकशाहीची मागणी करत आहेत. काही तरुण आंदोलनात जखमी झाले, रक्तानं माखलेले त्यांचे फोटो व्हायरल झाले आणि दोन हजारांवर तरुणांना अटकही झाली. मात्र तरीही आंदोलन सुरूच आहे.

On a young street in the capital of Belarus | लुकाशेंको गो अवे! बेलारूसच्या राजधानीत तरुण रस्त्यावर

लुकाशेंको गो अवे! बेलारूसच्या राजधानीत तरुण रस्त्यावर

Next
ठळक मुद्देलोकशाही हक्काच्या मागणीसाठी पुन्हा एकदा तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

कलीम अजीम

बेलारुसमध्ये गेल्या दोन आठवडय़ांपासून अस्वस्थतेचं वातावरण आहे. 
राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांच्याविरोधात नागरिकांनी आंदोलनाचा पवित्ना घेतला आहे. 25 वर्षाहून अधिक काळ सत्तेत असलेल्या लुकाशेंकोंची खुर्ची या बंडाने संकटात आली आहे. सत्ता वाचविण्यासाठी शेजारी राष्ट्राकडून त्यांनी सैन्य मदतीची मागणी केली आहे. बेलारुसची राजधानी मिंस्कला छावणीचं स्वरूप आलं असून, ठिकठिकाणी लष्कर व पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 
दुसरीकडे देशभरातून तरुणांचे लोंढे राजधानीत दाखल होत आहेत. संसद भवनचा परिसर तरुणाईच्या ‘चले जाव’ घोषणांनी दुमदुमला आहे. जगभरातील प्रमुख मीडिया हाउससने तरु णाईच्या आंदोलनाला मोठी जागा दिली आहे. राष्ट्रपती लुकाशेंको यांनी सत्तेविरोधातील हे आंदोलन मोडून काढण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तोर्पयत 3क्क्क् आंदोलक तरु णांना अटक झाली होती. 
कोरोनाच्या महाभयंकर संकटात जिवावर उदार होऊन युवक संघटित झाले आहेत. दमनशाहीला न जुमानता सत्तांतरासाठी त्यांचा निर्णायक संघर्ष सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

9 ऑगस्टला देशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे एक्ङिाट पोल सरकारी टीव्हीवर दाखवण्यात आले. 
वर्तमान राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांना विक्र मी बहुमत मिळाल्याचा अंदाज त्यात सांगण्यात आला. निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार राष्ट्रपतींना 8क् टक्के मते प्राप्त झाली, तर प्रमुख विरोधी नेत्याच्या खात्यात केवळ 1क्.12 टक्के मते आली.
विरोधी नेत्या स्वेतलाना तिखानोव्सना यांना हा कौल मंजूर नव्हता. मतमोजणीत पक्षपात, गोंधळ व गडबड झाल्याचा आरोप करत त्यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिला. राष्ट्रपतींनी खोटारडेपणा करून मते आपल्याकडे वळविली असा त्यांचा आरोप होता. जनतेलादेखील हे आकडे मान्य झाले नाहीत. पूर्ण निकाल जाहीर होण्यापूर्वीच सरकारला विरोध सुरू झाला.


दुस:या दिवशी सकाळीच राजधानी मिंस्कमध्ये सरकारविरोधात भलेमोठे आंदोलन उभे राहिलं. हजारो तरुणांनी संसद भवनासमोर गर्दी करून निदर्शनं केली.
शहरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने सुरू झाली. न्यू यॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, ‘नागरिक हातात सरकारविरोधी फलक प्लेकार्ड घेऊन ठिकठिकाणी रस्त्यावर उभे आहेत. त्यांच्याकडून सरकारविरोधात जोर जोरात घोषणा दिल्या जात आहेत.’
बीबीसीच्या मते ‘लुकाशेंको गो अवे!’ अशा घोषणा देत तरुण रस्ते जाम करत होते. लुकाशेंको यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, हुकूमशाही नको, निवडणुका पारदर्शक हव्या, अशा घोषणा राजधानीत ऐकायला मिळत आहेत. आंदोलक सोशल मीडियावर आपल्या मागण्या, निषेधाचे फोटो, व्हिडिओ टाकत आहेत, मतं जाहीरपणो मांडत आहेत.

स्वेतलाना बनल्या चेहरा
सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रपतींविरोधात तीन महिला होत्या. 
त्यातील एक स्वेतलाना तिखानोव्सना. 37 वर्षीय स्वेतलाना  व्यवसायाने शिक्षक. अनपेक्षितपणो त्या राजकारण आल्या.
निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणतात, ‘राजकारणात मी माङया इच्छेने आले नाही, नाइलाज म्हणून मला यावं लागलं!’
त्यांचे पती सर्गेई तिखानोवस्की ब्लॉगर आहेत. यू टय़ूब व्हिडिओच्या माध्यमातून ते सातत्याने सरकारची समीक्षा व टीका करतात. देशात लोकशाही सत्तेची मागणी लावून धरतात. त्यांनी ‘अ कण्ट्री फॉर लाइफ’ या चॅनेलवर टाकलेल्या आपल्या विविध व्हिडिओतून नागरिकांच्या मनाचा ठाव घेतला. वेळोवेळी राष्ट्रपतीच्या मनमानी धोरणाविरोधात आवाज उठवतात. आर्थिक पत घसरण, बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार आणि राजकीय सुधारांवर ते भाष्य करतात.
त्यांच्या व्हिडिओंना देशभरातून भरपूर पसंती मिळते.  लोकशाही समर्थक म्हणून ते लोकप्रिय झाले. गेल्या काही महिन्यात त्यांना भरपूर फॉलोअर्स मिळाले. जनतेच्या मागणीखातर सर्गेई तिखानोवस्की यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलं.
मात्र नामांकन दाखल करण्यापूर्वीच सरकारने त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं. त्यांचं मतदान रद्द करत त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी केली. जनभावना लक्षात घेता त्यांची पत्नी स्वेतलाना निवडणुकीच्या रिंगणात आल्या. हुकूमशाह राष्ट्रपतीला कोणीतरी विरोधक असावा, म्हणून त्यांनी निवडणूक लढविण्यास संमती दिली.
प्रचार मोहिमात जनतेकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळाला. नागरिकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांनी पूर्ण शक्ती पणाला लावून बलाढय़ सत्ताधीशाचा मुकाबला केला. जनतेने मतपेटीतून त्यांना कौल दिला. परंतु मतमोजणीत घात होऊन सगळा डाव पालटला. आपल्या मतांचा गैरवापर झाल्याचा आरोप करत जनता रस्त्यावर आली.
सरकारविरोधात निदर्शने सुरू होताच स्वेतलाना यांना देशांतर करण्यास भाग पाडण्यात आलं. सरकारने त्यांना रातोरात एका अज्ञात स्थळी स्थानबद्ध केलं. आपल्या दोन मुलांबरोबर त्या सुखरूप आहेत अशी माहिती आहे. ताब्यात घेण्यापूर्वीचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात त्या दहशतीत आणि भेदरलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

25 वर्षे एकच राष्ट्रपती

1991 साली सोविएत रशियाचे विघटन होऊन अन्य प्रदेशासह बेलारुस बाहेर पडला. तीन वर्षानी नव्या राज्यघटनेनंतर बेलारुसमध्ये निवडणुका झाल्या. सोविएतमध्ये फॉर्म हाउस मॅनेजर असलेल्या अलेक्झांडर लुकाशेंको यांनी निवडणुकीत भाग घेऊन सत्ता बळकावली. 1994पासून ते सत्तेत आहेत. 65 वर्षीय लुकाशेंको यांनी पाच वेळा फेरनिवड करून घेतली. युरोपमधला बलवान हुकूमशहा अशी त्यांची ओळख आहे. मनमानी धोरणासाठी ते प्रसिद्ध आहेत. कोरोनाला त्यांनी मनोरुग्ण म्हटलं होतं. शिवाय त्याला दूर ठेवण्यासाठी व्होडका प्यावा आणि वारंवार सोना बाथ घ्यावा, असा अजब सल्ला सूचवला होता. परंतु लोकमागणीनंतर त्यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला.
बेलारुसची जनता राष्ट्रपतींना रशियाचा हस्तक समजते. देशाला रशियात समाविष्ट करण्याच्या कारस्थाने आखण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अर्थव्यवस्था आणि विजेच्या उत्पादनासंदर्भात बेलारुस रशियावर अवलंबून आहे. 
यापूर्वी बेलारुसमध्ये 2011 साली लोकशाही सत्ता प्रस्थापनेसाठी मोठं आंदोलन झालं होतं. दोन महिने चाललेल्या या आंदोलनात राष्ट्रपतींना राजीनामा देऊन सत्ता सोडण्याची मागणी करण्यात आली होती. 2015 साली झालेल्या निवडणुकीत 8क् टक्के मते घेऊन लुकाशेंको पुन्हा राष्ट्रपती झाले. यावेळीदेखील निवडणुकीत पक्षपाताचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी विरोधकांचा बंदोबस्त केला. राष्ट्रपतींनी आताही दमनशाहीची तीच पद्धत अवलंबवली आहे. 
आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने संपूर्ण शक्ती लावली आहे. रविवारी 16 ऑगस्टला राजधानीत भव्य निदर्शने झाली. पोलिसांनी आंदोलकांवर एकाएकी हल्ला केला. यात अनेकजण गंभीर जखमी झाले. आंदोलक तरुण रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. पोलीस त्यांना फरफटत घेऊन जातानाचे अनेक फोटो व्हायरल झाले.
राजधानीत 1क्क्क् तरुणांना अटक झाली असून, इतर शहरातून 2क्क्क् हजार जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी 17 ऑगस्टलादेखील राजधानीत हजारो तरुण एकत्न यऊन सरकारविरोधात घोषणा देताना दिसली.
येत्या 25 ऑगस्टला बेलारुसला स्वतंत्न होऊन 29 वर्षे होतील. तीन दशकानंतर पुन्हा बेलारुस हुकमूशाहीतून मुक्त होण्यासाठी संघटित होत आहे. युरोपमधील हुकूमशाही सत्तेविरोधातले उघडपणो होत असलेले हे सर्वात मोठे आंदोलन आहे. त्याचे भवितव्य काय असेल हे काळ ठरवेल. पण लोकशाही हक्काच्या मागणीसाठी पुन्हा एकदा तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

 

( कलीम मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: On a young street in the capital of Belarus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.