तुमचा पासवर्ड वीक आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 05:15 PM2020-10-22T17:15:43+5:302020-10-22T17:15:54+5:30

एकदा खात्री करा,  नाहीतर पैसेच नाही, तर तुमचं खासगीपणही चोरीला जाईल!

Is your password weak? | तुमचा पासवर्ड वीक आहे का?

तुमचा पासवर्ड वीक आहे का?

Next

 - प्रसाद ताम्हनकर

कोरोनाकाळात इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या गुन्ह्यात प्रचंड वाढ झालेली आहे. महत्त्वाची माहिती चोरणं, संगणक लॉक करून त्या बदल्यात खंडणी मागणं असे गुन्हे जगभरात डोकं  वर काढत असतानाच, भारतात मोठय़ा कंपन्यांची महत्त्वाची माहिती चोरणं, खोट्या इ-मेल्स, मेसेजेसच्या माध्यमातून आर्थिक गंडा घालणं अशा गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार अनेक व्यक्तींचे कमकुवत पासवर्ड, हे असले गुन्हे घडायला मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत ठरत असल्याचं समोर आलं आहे. या संशोधनानुसार ऑनलाइन आर्थिक व्यवहार वा इंटरनेटच्या माध्यमातून इतर कार्य करणार्‍या प्रत्येक चौथ्या व्यक्तीचा पासवर्ड हा अत्यंत कमकुवत आणि ओळखण्यास सहजसोपा असा असतो. याच कारणानं हॅकर सहजपणे अशा व्यक्तींना आपलं लक्ष्य बनवतात आणि त्यांची आर्थिक फसवणूक करतात वा संवेदनशील माहिती सहजपणे चोरून नेतात. 
याला कारण वीक पासवर्ड. अनेकजण तिथंच चुकतात.


1. सायबर तज्ज्ञांच्या मते, अनेक लोक हे इंटरनेटचा वापर करताना अत्यंत साधा शब्द पासवर्ड म्हणून ठेवतात, तसेच अनेक प्लॅटफॉर्म्सवरती विविध खात्यांना एकच पासवर्ड वापरतात. 
2. अनेक लोक आपल्या मुला-मुलीचं नाव, गाडीचा नंबर अथवा आपला मोबाइल नंबर पासवर्ड म्हणून ठेवतात, जो की हॅक करणं हॅकर्सच्या डाव्या हाताचा मळ आहे. 
3. इंटरनेटचा वापर करणार्‍यांपैकी 32 टक्के लोक म्हणजे प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती आपले पासवर्ड्स हे ब्राउझरमध्येच सेव्ह ठेवते. असे पासवर्ड्स हॅकर्स सहजपणे हॅक करू शकतात. 
4. एक सामान्य व्यक्ती इंटरनेटवर जवळपास 27 वेगवेगळे खाते वापरते, असादेखील निष्कर्ष या संशोधनातून समोर आला आहे. 
5. या विविध खात्यांमध्ये ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडिया अकाउण्ट्सपासून ते त्याच्या बँक खात्यापर्यंतचादेखील समावेश असतो. 
6. अनेक इंटरनेट वापरकर्ते, हे आपले पासवर्ड्स ई-मेलमध्ये, नोटपॅडमध्ये किंवा मोबाइलमध्ये नोंद करून ठेवतात, जे अत्यंत घातक आहे. 
7. अनेक लोक वर्षानुवर्षे आपला पासवर्ड न बदलता जुनाच पासवर्ड वापरत असतात. 
8. पासवर्ड कसा हवा? तर लांबलचक पासवर्ड शक्यतो निवडावा. पासवर्डमध्ये एक वा दोन अक्षरं कॅपिटल असावीत आणि पासवर्ड शक्यतो अक्षरं आणि आकडे यांचा मेळ घालून बनवलेला असावा. आपली जन्मतारीख, नावं, मोबाइल वा गाडी नंबर त्यात नको.

(लेखक विज्ञान/तंत्रज्ञानविषयक पत्रकार आहे.)

prasad.tamhankar@gmail.com

Web Title: Is your password weak?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.