कोरोना कब खतम होगा पता नही पर घर वालों के साथ तो रहेंगे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:25 PM2020-05-28T18:25:10+5:302020-05-28T18:25:20+5:30

मजूर चालत निघाले, प्रचंड संख्या, आपण कितीजणांना मदत करणार? -असा प्रश्न पडला तेव्हा आठवली एक गोष्ट

youth from Search- help migrants to reach home | कोरोना कब खतम होगा पता नही पर घर वालों के साथ तो रहेंगे....

कोरोना कब खतम होगा पता नही पर घर वालों के साथ तो रहेंगे....

Next
ठळक मुद्दे खवळलेला समुद्र आणि स्टारफिश

- गुंजन खोरगडे

छत्तीसगढ, झारखंड, बिहार, ओरिसा, प. बंगाल या राज्यातले अनेक मजूर तेलंगणा राज्यात ठिकठिकाणी मिरची तोडण्यासाठी, बांधकाम मजूर म्हणून काम करतात.
 अचानक काम थांबलं. लॉकडाउन.  घरी परत जायचं तर किमान अकराशे किलोमीटरचा प्रवास. वाहनांची सोय नाही.
मग हे मजूर रणरणत्या उन्हातही प्रवास करायला लागले. या माणसांचे प्रश्न आपण काही प्रमाणात सोडवू शकू का ? आणि हे सोडवताना माझी भूमिका काय याचं उत्तर शोधायचं म्हणून सर्च संस्थेमध्ये चर्चा झाली.
चालत निघालेल्या मजुरांसाठी रिलीफ वर्क सुरू करण्याचं ठरलं. या उपक्रमात मी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले. 
सर्च समोरून जाणा:या राष्ट्रीय महामार्ग 630  वरून तेलंगणा राज्यातील स्थलांतरितांचे लोंढे गडचिरोली मार्गे छत्तीसगढ, झारखंड, बिहार, ओरिसा, प. बंगालकडे पायी निघाले होते. 
या लोकांकरता जेवणाची व त्यांना छत्तीसगढ राज्याच्या सीमेर्पयत पोहचवण्याचं काम आम्ही सुरू केलं.
 सकाळी 6 ते रात्नी 10 र्पयत आळीपाळीने आम्ही कामावर असायचो.
एकदा  आठ-दहा मजूर या मार्गाने पायी चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. उन्हाच्या झळा जाणवत होत्या. पिंजारलेले केस, तहानेने सुकलेले ओठ, चालून चालून पातळ जीर्ण झालेल्या नाम मात्न चपला, रस्त्यात जाताना सामानाचं ओझं नको म्हणून अर्धे सामान वाटेत टाकून फक्त एक गाठोडे घेऊन या मजुरांचा प्रवास सुरू होता. 
मला भेटले, विचारलं तर कळलं छत्तीसगढमध्ये घर असलेले हे मजूर तेलंगणाहून चालत आले होते. दोन दिवसांपासून त्यांना काही खायला मिळालं नव्हतं. आम्ही जेवणाची सोय केली. सोबत न्यायला फूड पॅकेट्स देऊन छत्तीसगढच्या सीमेर्पयत त्यांना रवाना केलं. त्याचवेळी सोशल मीडियात अमुक तमूक खाल्लं किंवा अमुक मिळालंच नाही असं लिहिलेल्या पोस्टही मी वाचत होते.
समाजाचे दोन उभे भाग मला दिसत होते. अस्वस्थ वाटत होतंच.
रस्त्यात पोलीस पकडून क्वॉरण्टाइन करतील, घरी जाता येणार नाही या भीतीने आडवळणाच्या वाटेने जंगलातून या मजुरांची पायपीट सुरू होती.  घरी का जायचं विचारल्यावर ते म्हणाले, काम बंद है, एक महिना तक इंतझार किया. फिर मालिकने पैसे नही बोलकर निकाल दिया. कोरोना कब खतम होगा पता नही पर घर वालों के साथ तो रहेंगे.’
अकराशे किलोमीटरचा प्रवास. वाटेत अन्न पाण्याची सोय नाही, घरी कधी पोहोचणार? काम परत मिळेल का? पैसे असतील का? कशाची शाश्वती नाही पण त्यांच्या पुढे एकच ध्येय होतं, बस घर जाना है.  
एक दिवस दहा-बारा लोकांचा घोळका पायी चालून येत होता. सकाळचे सात वाजले असतील म्हणून त्यांना चहा वगैरे दिला. कुठून आले, कुठे जात आहे अशी चौकशी केल्यावर कळलं की ही मंडळी झारखंडला जायला निघाली होती. चहा पिऊन मजूर म्हणाले, हम सब मिलके पैसे देते है!- माङया डोळ्यातच  पाणी आलं.  पैसा नसून, इतक्या त्नासात असूनही त्यांच्या मनाची श्रीमंती दिसली. त्यांना सांगितलं की आम्ही पैसे घेत नाही. एकीकडे भणंग झालेल्या या मजुरांच्या मनाची श्रीमंती आणि दुसरीकडे या मजुरांच्या अगतिकतेचा फायदा घेत हजारो रु पये उकळून थोडय़ा अंतरार्पयत सोडून पाहून जाणारे वाहनचालक.. 
हा उपक्रमात काम करताना सध्याच्या परिस्थतीचा या मजुरांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होत असावा याचाही अंदाज आला. कोरोनामुळे अचानक हातातून गेलेलं काम, हातात पैसे नसल्यामुळे येणारा ताण, पुढे काम मिळण्याची अनिश्चितता, कोरोना आजारामुळे वाटणारी भीती, घरी पोहचू शकू की नाही याची शाश्वती नाही, गावी परत गेल्यावर हाती काम असेल का या विचाराने  येणारी अपराधीपणाची भावना, त्यातून ‘‘उपाय’’ म्हणून सुरू झालेलं दारूचं व्यसन, निर्माण होणारे मानसिक आजार. हे सारं भयाण आहे.
मार्च महिन्यामध्ये जेव्हा कोरोनाचा धोका वाढत होता मी मुंबईत कॉलेजला (टीआयएसएसमध्ये)  होते. आईचा फोन आला होता. तिचं रडणं सुरू होतं की लवकर घरी ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय, एक दोन दिवसात मी घरी आले. मला कुणापासून लपून यावं लागलं नाही, ना मला शेकडो मैलांचा प्रवास पायी  करावा लागला. पण हे मजूर? त्यांच्यासाठी घरी जाणं इतकं सोप्पं आहे का? त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचा हा प्रवास सोयीस्कर का नसावा? 
प्रश्न फार आहेत.
पण सर्चमधल्या कामानं एक सांगितलं की, आपल्याला जे शक्य ते करावं.
 लॉरेन ऐसेली यांची  एक गोष्ट तेव्हा आठवली. 
एक मुलगा वादळानंतर समुद्राच्या काठावरील स्टारफिशेस समुद्रात टाकत असतो. 
एक माणूस ते बघतो आणि त्या मुलाला म्हणतो हा समुद्रकिनारा इतका दूरवर पसरला आहे. 
समुद्रकाठावर वाहत आलेल्या या लाखो स्टारफिशेस परत समुद्रात टाकणं शक्य नाही. 
याने काहीही बदल होणार नाही. 
ते ऐकून छान हसत त्या मुलानं एक दुसरा स्टारफिश उचलला, समुद्रात टाकला.
त्या माणसाकडे बघून म्हणाला,  सगळ्यांना सही, या एक माश्याच्या आयुष्यात तर बदल होईल.


 


 

Web Title: youth from Search- help migrants to reach home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.