झिझू
By admin | Published: June 11, 2016 05:39 PM2016-06-11T17:39:48+5:302016-06-11T17:39:48+5:30
दुर्देवानं काही चूका अशा असतात की, त्या तुमच्या साऱ्या यशावर, उत्तुंग पराक्रमापेक्षा त्या लोकांच्या जास्त लक्षात राहतात.
Next
- अनन्या भारद्वाज
भूतकाळ माणसाचा पिछा सोडत नाही.
आणि भूतकाळातल्या चूका?
त्या तर कधीच पाठ सोडत नाहीत.
दुर्देवानं काही चूका अशा असतात की, त्या तुमच्या साऱ्या यशावर, उत्तुंग पराक्रमापेक्षा त्या लोकांच्या जास्त लक्षात राहतात.
आणि तुमचं नाव घेतलं की भूतकाळातली ती घटनाच समोर येते.
त्याचंच उदाहरण म्हणजे सध्या मुंबई दौऱ्यावर असलेला फ्रान्सचा अत्यंत लोकप्रिय, जगप्रसिद्ध आणि धडाधडीचा फुटबॉलपटू म्हणजे ङिानेदिन ङिादान!
ज्याला सारं जग ङिाझू म्हणून ओळखतं.
अत्यंत लढवय्या आणि सच्च खेळाडू.
1998 मध्ये फ्रान्सनं वर्ल्डकप जिंकला तो त्याच्या दोन गोलच्या जोरावर!
जगभरात त्याचे चाहते, त्याच्या खेळाचे दिवाने होते. ( आजही आहेत.)
आणि मग उजाडला तो दिवस.
2006ची फुटबॉल वर्ल्डकपची फायनल.
वर्ल्डकप फायनल म्हणजे त्यातला थरार, दिवानगी, त्यातली गुर्मी, त्यातलं ओसंडून वाहणारं पागलपण यासा:याची आपण कल्पना करू शकतो.
तर फायनल होती इटाली आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये.
आणि तोच झिदानचा अंतिम सामनाही. त्यानं निवृत्ती जाहीर केली होती.
रिटायर्ड होताना झिझू देशाला वर्ल्डकप जिंकवणारच असे चर्चे होते.
मात्र झालं भलतंच.
सामना सुरू झाला.
टेन्शन होतंच. अपेक्षांचं ओझंही होतं.
दोन संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची सुरू झाली, एकमेकांना डिवचणं सुरूच होतं.
आणि झिदान इतका संतापला की रागाच्या भरात त्यानं इटालीचा डिफेण्डर मार्को माटेरज्जीला जोरदार हेडर अर्थात ढुशी मारली.
तो कोसळलाच. पण पंचांनी झिदानला रेड कार्ड दाखवत मैदानाबाहेर काढलं.
सामना तर फ्रान्सचा संघ तिथं हरलाच, पण याच टप्प्यावर झिदाननं फुटबॉलचा निरोप घेतला.
आता तो प्रशिक्षक झालाय, नवे खेळाडू घडवतोय. गेल्या 50 वर्षातला सर्वोत्तम युरोपिअन फुटबॉलपटू म्हणून ज्याचा गौरव करण्यात आलाय तोच हा खेळाडू!
मात्र संतापाच्या भरात, रागाच्या झटक्यात त्यानं दहा वर्षापूर्वी जे केलं, ते जग अजून विसरलेलं नाही. म्हणून तर मुंबईत आला तर त्याच्यासमोर हा प्रश्न आलाच, की त्या क्षणाविषयी आज काय वाटतं?
आणि त्यानं जाहीर मान्य केलं की, ती चूकच होती!
अत्यंत कर्तबगार, अत्यंत यशस्वी, गुणी खेळाडू, पण रागाच्या भरात केलेली एक गोष्ट, आजही त्याच्या मागावर आहे, ती आठवण तो जिथं जातो, तिथं त्याच्यासोबत जाऊन उभी राहतेच.