आपुल्या माहेरा जाईन मी आता... विठ्ठल दर्शनानंतर भाविक परतीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 03:40 AM2017-11-02T03:40:36+5:302017-11-02T03:41:14+5:30
‘आपुल्या माहेरा जाईन मी आता...निरोप या संता हाती आला...’ असे म्हणत पांडुरंगाचे दर्शन घेऊन भाविक बुधवारी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला लागले.
- प्रभू पुजारी
पंढरपूर : ‘आपुल्या माहेरा जाईन मी आता...निरोप या संता हाती आला...’ असे म्हणत पांडुरंगाचे दर्शन घेऊन भाविक बुधवारी पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला लागले.
सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस मनी घेऊन कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून एकूण चार लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. मंगळवारी कार्तिकी एकादशीदिवशी पांडुरंगाचे दर्शन घेऊन भाविकांनी हा सुखसोहळा डोळ्यात साठविला आणि बुधवारी आपले गाठोडे बांधून परतू लागले़
बाहेर जाण्यासाठी शिवाजी चौक ते स्टेशन रोड, सोलापूर मार्गावरील तीन रस्ता, गोपाळपूर, करकंब रस्ता, रेल्वे स्टेशन, मुख्य बसस्थानक व नव्याने तात्पुरत्या स्वरुपात उभारलेले चंद्रभागा बस स्टँड आदी ठिकाणी वारकºयांची गर्दी झाली होती़ बस, खासगी वाहनांना शहरातून ये-जा करण्यासाठी मार्ग आखून दिले होते.