धावत्या दुचाकीच्या डिक्कीतून लांबविले १ लाख ९५ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 06:15 PM2019-04-12T18:15:40+5:302019-04-12T18:16:22+5:30
पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी रक्कम लांबवली
परभणी- बँक खात्यातून काढलेले १ लाख ९५ हजार रुपये गाडीच्या डिक्कीत टाकून जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी ही रक्कम लांबविल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास वसमत रस्त्यावर घडली.
या संदर्भात मिळालेली माहिती तालुक्यातील पिंगळी येथील निळकंठ शंकरराव रणदिवे यांच्या बँक खात्यात उसाचे पैसे जमा झाले होते. सालगड्यांना पैसे द्यावयाचे असल्याने निळकंठ रणदिवे आणि नाथराव डुबे हे दोघे शुक्रवारी परभणीत आले. वसमत रस्त्यावरील इंडिया बँकेतील खात्यातून रणदिवे यांनी १ ुलाख ९५ हजार रुपये काढले. बँकेसमोरच उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिक्कीत त्यांनी हे पैसे ठेवले. त्यानंतर पेट्रोल भरण्यासाठी म्हणून रणदिवे हे वसमत रस्त्याने दुचाकीने जात असताना पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी चालत्या गाडीच्या डिक्कीतील पैसे घेऊन त्या ठिकाणाहून पोबारा केला.
दरम्यान, पैसे चोरी झाल्याचे समजताच रणदिवे यांनी आराडाओरडा केला; परंतु, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले; परंतु, त्यात फारसे काही हाती लागले नाही. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.