अनुदान योजनेत १० वर्षांची अट शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:29 AM2021-02-18T04:29:42+5:302021-02-18T04:29:42+5:30
ठिबक सिंचनचे अनुदान रखडले देवगावफाटा : कमी पाण्यात सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी केंद्र शासनाने ...
ठिबक सिंचनचे अनुदान रखडले
देवगावफाटा : कमी पाण्यात सिंचन क्षेत्रात वाढ होऊन उत्पादन क्षमतेत वाढ व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सिंचन योजनेअंतर्गत अनुदान तत्त्वावर ठिबक व तुषार सिंचन योजना राबवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. परंतु, सेलू तालुक्यातील ५६६पैकी १२० लाभार्थ्यांचे ३१ लाखांचे अनुदान रखडले आहे.
हेमाडपंथी मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर
गंगाखेड : तालुक्यातील धारसूर येथे असलेले प्राचीन कालीन हेमाडपंथी गुप्तेश्वर मंदिर देखभाल व दुरुस्तीअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सद्यस्थितीत झालेल्या मंदिराच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. तालुक्यातील गोदावरी नदी काठावर असलेल्या धारासूर या गावात सुमारे १३व्या शतकामध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे.
धूळ वाढल्याने नागरिक त्रस्त
परभणी : जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. जिंतूर, गंगाखेड आणि वसमत रस्ता या तिन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. जिंतूर रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे रस्ता खड्डेमय झाला असून, त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
विजेअभावी बसतोय कृषिपंपांना फटका
परभणी : उच्च दाब प्रणाली योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार कृषिपंपांना स्वतंत्र विद्युत रोहित्र त्यांच्या जल स्रोतांवर उभारून देण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांना येणाऱ्या समस्यांतून सुटका मिळणार आहे. मात्र, वीज कंपनीच्या वतीने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे कृषी पंपधारक त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.